शहरं
Join us  
Trending Stories
1
“अशोक खरात विकृत, जलदगती न्यायालयात प्रकरण चालवून फाशी द्या”; सुनील तटकरेंनी केली मोठी मागणी
2
इराणचा मोठा दावा! पायलटला शोधायला आलेले अमेरिकेचे C-130 विमान पाडले 
3
Middle East War: मध्य पूर्वेतील युद्ध भडकणार? अमेरिकेचं सर्वात घातक मिसाइल युद्धाच्या रणांगणात, इराणवर महासंकट!
4
मतदार यादीच्या कामाचा ‘शिक्षण-आरोग्य’वर ताण; ‘आरोग्य’चे ३ हजार, 'शिक्षण'च्या २ हजार कर्मचाऱ्यांचा समावेश
5
"या वेड्याला कसंही करून रोखा...!"; नोबेल विजेत्या माजी आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा एजन्सी प्रमुखांचंं खाडी देश अन् UN ला आवाहन
6
थारच्या वाळवंटातून कच्च तेल उत्पादनात विक्रमी वाढ; भारताचे आयातीवरील अवलंबित्व कमी होणार?
7
AI च्या नावाखाली layoff सुरू! Oracle, Amazon, Meta...२०२६ मध्ये हजारो कर्मचाऱ्यांना नारळ
8
मुंबई हादरवण्याचा कट उधळला, २५ सेकंदाच्या व्हिडिओनं पोलखोल; पाकिस्तानी नेटवर्कचा खेळ बिघडला
9
Ashok Kharat Case : भोंदूबाबाचा १ कोटींचा 'महाप्रताप'! अशोक खरातवर १२ वा गुन्हा दाखल; व्यावसायिकाची मोठी फसवणूक
10
शरद पवार-उद्धव ठाकरेंमध्ये चर्चा; बारामती-राहुरी पोटनिवडणुकीबाबत ठरवले? नेमके काय घडतेय?
11
ते जहाज पुन्हा भारताकडे वळले...! चीनकडे का जात होते? 'पिंग शुन'चे गुपित 
12
क्रिकेट सोडून सरकारी नोकरी करायला गेला; चप्पल घालून टाकलेल्या एका चेंडूने 'त्याचे' आयुष्यच बदललं
13
Dhruv Jurel: मास्टरमाइंड जुरेल! आधी दमदार बॅटिंग, मग डोकं लढवून जिंकला सामना, ठरला विजयाचा शिल्पकार
14
अंधश्रद्धेच्या नावाखाली मुलीचा बळी देण्याचा प्रयत्न; स्थानिकांनी वाचवला जीव, आरोपीला बेदम चोप...
15
टाटा ट्रस्टमधील वादाला नवे वळण! TVS च्या वेणू श्रीनिवासन यांचा तडकाफडकी राजीनामा; मेहली मिस्त्रींच्या एका आव्हानाने खळबळ
16
२००० किमी दूर कोलकात्यावर हल्ल्याची धमकी; पाकिस्तानच्या हाती 'अशी' कोणती मिसाइल लागली?
17
Israel Iran War: इस्रायलनं इराणवर हल्ला करण्यासाठी निवडलं मोक्याचं ठिकाण; पुढील ४८ तासांत महाभयंकर घडणार?
18
"हमने ढूंढ निकाला…"; अमेरिकेनं इराणच्या जबड्यातून आपला पायलट कसा बाहेर काढला? वाचा, थरारक मोहिमेची संपूर्ण 'इनसाइड स्टोरी'
19
"महत्त्वाच्या इमारतींमध्ये अजूनही चिनी cctv; सरकार सत्य दडवतंय"; राहुल गांधी यांचा आरोप
20
मध्य पूर्वेतील युद्धातच पाकिस्ताननं रचलं कुभांड; भारताला दिली पोकळ धमकी, कोलकाता टार्गेटवर?
Daily Top 2Weekly Top 5

बीफ फेस्टिव्हलचे आयोजन कशासाठी? उपराष्ट्रपती - उपराष्ट्रपती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 20, 2018 06:31 IST

प्रत्येकाने आपल्या आवडीनुसार हवे ते खावे, पण त्यासाठी ‘बीफ फेस्टिव्हल’ आयोजित करण्याची काय आवश्यकता आहे? उद्या कोणाचे चुंबन घ्यावेसे वाटले तर ‘किस फेस्टिव्हल’चे आयोजन करणार का

मुंबई : प्रत्येकाने आपल्या आवडीनुसार हवे ते खावे, पण त्यासाठी ‘बीफ फेस्टिव्हल’ आयोजित करण्याची काय आवश्यकता आहे? उद्या कोणाचे चुंबन घ्यावेसे वाटले तर ‘किस फेस्टिव्हल’चे आयोजन करणार का, असा सवाल उपराष्ट्रपती एम. व्यंकय्या नायडू यांनी येथे केला.के. ए. पोदार कॉलेज आॅफ कॉमर्स अ‍ॅण्ड इकॉनॉमिक्स या संस्थेच्या अमृत महोत्सवानिमित्त कार्यक्रम झाला. राष्ट्रपती प्रमुख पाहुणे होते. गृहनिर्माणमंत्री प्रकाश महेता, आ. माधुरी मिसाळ, संस्थेचे अध्यक्ष सोहनलाल जैन आणि प्राचार्या शोभना वासुदेवन उपस्थित होते.सरकारच्या गोमांसबंदीच्या निर्णयाला विविध स्तरांतून विरोध केला जात आहे. त्याचाच भाग म्हणून बीफ फेस्टिव्हलचे आयोजन करण्यात आले होते, असे ते म्हणाले.पालकांनी पाल्याकडे लक्ष द्यावे, असा मोलाचा सल्लाही त्यांनी या वेळी दिला. अनेक विद्यार्थी शिक्षण घेताना तणावाखाली असतात. पालकांनी मुलांवरचा ताण ओळखला पाहिजे, असे ते म्हणाले. मुलांवरचा ताण वेळीच ओळखल्यास त्यांना या तणावातून बाहेर काढून त्यांचे भवितव्य घडवण्यास मदत होइल, असा सल्ला त्यांनी पालकांना दिला.विद्यार्थ्यांशी संवाद साधाताना ते म्हणाले की, आपल्या आईला आणि गुरूंना कधीच विसरू नका. जन्मभूमी, मातृदेशाचा आदर ठेवा. मातृभाषेवर प्रेम करा. मातृभाषेतूनच आपण बोलायला शिकतो. ती भाषा आपल्या सहज लक्षात येते. कारण ती आपली भाषा असते. म्हणूनच तर आपण आपल्या मातृभाषेत जास्त चांगल्या प्रकारे आपले म्हणणे मांडू शकतो. त्यामुळेच मातृभाषेचा न्यूनगंड बाळगू नका, असे ते म्हणाले.देशातील २५ टक्के लोकसंख्या ही दारिद्र्यरेषेखाली आहे. या जनतेच्या समस्या कशा सोडवता येतील याचा विचार तरुणांनी करायला हवा, असा सल्ला त्यांनी दिला. देशासहजगावर आज दहशतवादाचे मोठ्या प्रमाणावर सावट आहे. ज्याने देशाची संसद उडवण्याचा कट रचला त्या अफजल गुरूचा जयजयकार का, असा संतप्त प्रश्नही नायडू यांनी या वेळी उपस्थित केला....तर ‘किस फेस्टिव्हल’चे आयोजन करणार का?प्रत्येकाने आपल्या आवडीनुसार हवे ते खावे, पण त्यांच्या आवडीसाठी फेस्टिव्हल आयोजित करण्याची आवश्यकता काय? उद्या कोणाचे चुंबन घ्यावेसे वाटले तर ‘किस फेस्टिव्हल’चे आयोजन करणार का, असा प्रश्नही उपराष्ट्रपती यांनी उपस्थित केला.

टॅग्स :Venkaiah Naiduव्यंकय्या नायडू