शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
2
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
3
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
4
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
5
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
6
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
7
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
8
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
9
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
10
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
11
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
12
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
13
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
14
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
15
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
16
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
17
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
18
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
19
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
20
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
Daily Top 2Weekly Top 5

दाती महाराजाला अटक का नाही?, तरुणीवर बलात्काराचा आरोप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 28, 2018 04:53 IST

बलात्काराचा आरोप असलेल्या दाती महाराजाविरुद्ध वॉरंट निघूनही त्याला अद्याप अटक का करण्यात आली नाही?

नवी दिल्ली : बलात्काराचा आरोप असलेल्या दाती महाराजाविरुद्ध वॉरंट निघूनही त्याला अद्याप अटक का करण्यात आली नाही? असा सवाल दिल्लीच्या न्यायालयाने पोलिसांना विचारला आहे. या प्रकरणाची पोलीस उपायुक्त दर्जाच्या अधिकाऱ्यामार्फत चौकशी करण्यात यावी आणि त्याचा अहवाल दर आठवड्याला आपणास सादर करावा, असेही निर्देश न्यायालयाने दिले आहेत.स्वत:ला दैवी अवतार म्हणवून घेणाºया दाती महाराजाने आपल्या शनी आश्रमात दोन वर्षांपूर्वी आपल्यावर बलात्कार केल्याची तक्रार एका तरुणीने केली आहे. त्यामुळे त्याच्याविरुद्ध सर्च वॉरंटही काढण्यात आले आहे. तरीही दिल्ली पोलिसांनी त्याला अद्याप अटक केलेली नाही. त्यामुळेच न्यायालयाने नापसंती व्यक्त करीत, याबद्दल अहवाल सादर करावा, असे आदेश दिल्ली पोलिसांना दिले. या प्रकरणाची पुढील सुनावणी ३ जुलै रोजी होणार आहे.महिला आयोगानेही केली विचारणातरुणीच्या तक्रारीनंतर पोलिसांनी त्याच्या दिल्ली, तसेच राजस्थानातील पाली येथील आश्रमात तपास केला होता, पण त्याने बलात्कार केल्याचा पुरावा सापडला नसल्याचे पोलीस सांगत आहेत. दाती महाराज व त्याचे तीन साथीदार यांची पोलिसांनी १९ जून तसेच काल, मंगळवारी रोजी चौकशी केली होती, असे समजते. मात्र, बलात्काराचा आरोप असूनही त्याला अटक न झाल्याबद्दल आश्चर्य व्यक्त होत आहे. दिल्ली महिला आयोगानेही दाती महाराजाला अटक का केली नाही, असे पत्र दिल्लीच्या पोलीस आयुक्तांना पाठविले आहे.मुलाखतींमध्ये निर्दोष असल्याचा दावादिल्लीच्या छतरपूर भागात दाती महाराजाचा शनी आश्रम आहे. तिथे आपणावर बलात्कार करण्यात आल्याचा २५ वर्षीय तरुणीचा आरोप असून, तिने तशी तक्रार पोलिसांकडे केली आहे. या तक्रारीनंतर त्याने अनेक वृत्तवाहिन्यांना मुलाखती दिल्या आहेत. आपण निर्दोष आहोत, पोलिसांना सहकार्य करण्याची आपली तयारी आहे, असे तो वारंवार मुलाखतीतून सांगत होता.चहाच्या दुकानापासून आश्रमापर्यंतदाती महाराजाचे मूळ नाव मदनलाल पंडित असून, आई-वडील वारल्यानंतर तो दिल्लीच्या फतेहपूरबेरी भागात चहाचे दुकान चालवत असे. त्यानंतर, त्याने विटा, वाळू, सीमेंटचा व्यवसाय केला. पुढे मंडप डेकोरेशनचा त्याचा व्यवसाय होता. नंतर त्याने कॅटरिंगचा धंदा सुरू केला. मात्र, १९९६ मध्ये त्याची एका ज्योतिषाशी ओळख झाली. त्याच्याकडून शिकून तो स्वत: ज्योतिषी झाला आणि भविष्य सांगू लागला. याच काळात त्याने स्वत:चा आश्रम सुरू केला आणि दाती महाराज म्हणून त्याची लोकांना ओळख झाली. अनेक राजकीय नेत्यांना तो सल्ले देतो, असे सांगण्यात येते. मध्यंतरी एका वृत्तवाहिनीवर तो भविष्य सांगण्याचा कार्यक्रम सादर करीत असे.