पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पश्चिम बंगालमधील दुर्गापूर येथे आयोजित सभेला संबोधित केले. यावेळी मोदींनी घुसखोरांना कडक इशारा दिला आहे. त्यांच्याविरुद्ध कठोर कारवाई केली जाईल असे म्हटले आहे. पीएम मोदी म्हणाले, तृणमूल काँग्रेसने घुसखोरांच्या बाजूने मोहीम सुरू केली आहे आणि देशभरात तृणमूल काँग्रेसचे कट उघड झाले आहे.
पंतप्रधान मोदी म्हणाले की, तृणमूल काँग्रेसचे सरकार उघडपणे घुसखोरांच्या समर्थनार्थ बाहेर पडले आहे पण जो कोणी या देशाचा नागरिक नाही त्याच्यावर निश्चितच कारवाई केली जाईल.
काल युद्धाचा इशारा, आज राजधानी सोडून पळून गेले... सिरियाचे राष्ट्राध्यक्ष अल-शारांचा अजब कारभार
शुक्रवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पश्चिम बंगालमध्ये सुमारे ५,४०० कोटी रुपयांच्या विकास प्रकल्पांची पायाभरणी केली. यामध्ये तेल आणि वायू, वीज, रेल्वे आणि रस्ते यांच्याशी संबंधित प्रकल्पांचा समावेश आहे. दुर्गापूर रॅलीतील प्रचंड गर्दीला संबोधित करताना पंतप्रधान मोदींनी राज्यातील ममता सरकारवर गंभीर आरोप केले. पंतप्रधान मोदी म्हणाले की, तृणमूल काँग्रेसच्या गुंडगिरीमुळे पश्चिम बंगालमध्ये गुंतवणूक येत नाही आणि राज्याचा विकास होत नाही.
मोदींनी घुसखोरांना इशारा दिली
रॅलीमध्ये पंतप्रधान मोदींनी घुसखोरांना कडक इशारा दिला आहे. पंतप्रधान मोदी म्हणाले, "आज देशासमोर तृणमूल काँग्रेसचे षड्यंत्र उघड झाले आहे की त्यांनी घुसखोरांच्या बाजूने एक नवीन मोहीम सुरू केली आहे. ते देशाच्या संवैधानिक संस्थांनाही आव्हान देत आहेत. तृणमूल काँग्रेस आता त्यांच्या समर्थनार्थ उघडपणे समोर आली आहे."पण मी दुर्गापूरच्या रॅलीतून उघडपणे सांगू इच्छितो की जो कोणी भारताचा नागरिक नाही, ज्याने घुसखोरी केली आहे, त्याला भारतीय संविधानानुसार न्याय्य कारवाईला सामोरे जावे लागेल, असा इशारा मोदींनी दिला.