शहरं
Join us  
Trending Stories
1
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून अज्ञात कार घुसली आत, तपास सुरू!
2
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
3
शेतकरी ते उद्योजक! मुद्रा कर्जाच्या मदतीने उभा करा स्वतःचा व्यवसाय; जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
4
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
5
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
6
अखेर ट्रायम्फने ३५० सीसीची मोटरसायकल लाँच केली! जीएसटीचा फायदा अन् किंमत पाहून म्हणाल...
7
"काळजी करू नका, एकाही कार्यकर्त्याला वाऱ्यावर सोडणार नाही, दादांचा जनता दरबार..."; सुनेत्रा पवार यांचा शब्द
8
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
9
तरुणीचा 'शोले' स्टाईल ड्रामा! असं काय घडलं की मोबाईल टॉवरवर चढून तरुणीने घरच्यांना दिली धमकी?
10
राहुरीत शरद पवार गटाचा उमेदवार ठरला, गोविंद मोकाटे निवडणूक लढवणार, प्राजक्त तनपुरेंची माघार?
11
७ दिवसांत दुप्पट झाला 'हा' शेअर; १००% पेक्षा अधिक वाढली किंमत, IPL टीमची मालक आहे कंपनी
12
इराण-इस्रायल संघर्षाचा भारतीय PMI वर परिणाम! सर्व्हिस सेक्टरची गती मंदावली; महागाईने कंबरडे मोडणार?
13
सलग तीन पराभवनानंतर CSK साठी गुड न्यूज, धोनी आणि ब्रेव्हिस ‘या’ सामन्यातून करणार पुनरागमन 
14
Petrol Price In US: ट्रम्प यांच्या निर्णयाचा अमेरिकेच्या लोकांनाच फटका; पेट्रोलच्या दरात जून २०२२ नंतरची सर्वात मोठी वाढ
15
लग्नाच्या पहिल्याच रात्री नववधूला...! नवरदेवाने थेट गाठले पोलीस स्टेशन; आग्र्यातील धक्कादायक घटना
16
बंगळुरू-चेन्नई लढतीत पाण्याच्या बाटलीवरून वाद, RCBचा कर्णधार पंचावर भडकला, नेमकं घडलं काय?
17
अमेरिका-इराणमध्ये आजच युद्धविराम?, ४८ तास महत्त्वाचे; पाकिस्तानचा पुढाकार, रातोरात सूत्रे हलली
18
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातच्या 'तृप्तबाला'वर लक्ष ठेवण्यासाठी समर्थकांची खतरनाक 'मोडस ऑपरेंडी'
19
सोन्या-चांदीच्या दरात मोठी तेजी; Gold २ हजारांपेक्षा, तर Silver ६ हजारांपेक्षा अधिकनं महागलं; टेक करा नव्या किमती
20
टोयोटा 'इनोव्हा क्रिस्टा' कायमची बंद होणार? डिझेल MPV प्रेमींना मोठा धक्का; खरेदीसाठी शेवटची संधी!
Daily Top 2Weekly Top 5

कोण खरं, कोण खोटं?... अब्दुल्ला म्हणाले 'मी नजरकैदेत'; अमित शहा म्हणाले 'ते घरात सेफ'

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 6, 2019 17:23 IST

कलम ३७० हटवण्याच्या प्रस्तावावरील चर्चेदरम्यान, सध्या लोकसभेमध्ये रणकंदन सुरू आहे.

नवी दिल्ली - कलम ३७० हटवण्याच्या प्रस्तावावरील चर्चेदरम्यान, सध्या लोकसभेमध्ये रणकंदन सुरू आहे. दरम्यान, फारुख अब्दुल्लांना नजरकैदेत ठेवण्याच्या वृत्तामुळे लोकसभेतील वातावणर तापले. जम्मू-काश्मीरच्या पुनर्रचना विधेयकावर चर्चा सुरू असताना फारुख अब्दुल्ला यांच्या अनुपस्थितीचा विषय उपस्थित झाला. यावेळी सदस्यांनी विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना गृहमंत्री अमित शहा यांनी फारुख अब्दुल्ला यांना ताब्यात घेण्यात आलेले नाही, तसेच त्यांना अटकही करण्यात आलेली नाही, असे ते त्यांच्या घरी सुखरूप आहेत असा दावा केला. मात्र फारुख अब्दुल्ला यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधत आपल्याला नजरकैदेत ठेवण्यात आल्याचा आरोप केला. मंगळवारी लोकसभेचे कामकाज सुरू असताना एनसीपीच्या नेत्या सुप्रीया सुळे यांनी फारुख अब्दुल्लांच्या अनुपस्थितीचा प्रश्न उपस्थित केला. त्याला उत्तर देताना अमित शहा यांनी सांगितले की, ''फारुख अब्दुल्ला यांना ताब्यात घेण्यात आलेले नाही, तसेच त्यांना अटकही करण्यात आलेली नाही.'' मात्र मला नजरकैदेत ठेवण्यात आले होते. गृहमंत्री अशाप्रकारे खोटे बोलत आहेत, याचे दु:ख मला वाटते, असा आरोप फारुख अब्दुल्ला यांनी केला. दरम्यान, फारुख अब्दुल्ला यांनी कलम ३७० हटवल्यानंतर पहिल्यांदाच प्रसारमाध्यमांसमोर येत प्रतिक्रिया दिली आहे. भारताने काश्मीरला दगा दिला असून, कलम ३७० हटवणे हे लोकशाही विरोधी असल्याचे फारुख अब्दुल्ला यांनी म्हटले आहे. काश्मीरला विशेष दर्जा देणारे कलम ३७० आणि कलम ३५ अ हटवण्याच्या केंद्र सरकारच्या निर्णयावर फारुख अब्दुल्ला यांनी संतप्त प्रतिक्रिया व्यक्त केली. ''असा भारत आम्हाला अपेक्षित नव्हता. आम्हाला सेक्युलर भारत अपेक्षित होता. कलम ३७० बाबत आज भारताने काश्मीरला दगा दिला आहे. कलम ३७० हटवणे ही लोकशाहीविरोधी कृती आहे. या विरोधात आम्ही न्यायायालयात धाव घेऊ,'' असे फारुख अब्दुल्ला यांनी प्रसारमाध्यमांना प्रतिक्रिया देताना सांगितले. 

टॅग्स :Farooq Abdullahफारुख अब्दुल्लाJammu Kashmirजम्मू-काश्मीरArticle 35 Aकलम 35-एArticle 370कलम 370