शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
2
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
3
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
4
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
5
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
6
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
7
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
8
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
9
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
10
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
11
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
12
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
13
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
14
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
15
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
16
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
17
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
18
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
19
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
20
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
Daily Top 2Weekly Top 5

खडसे यांचा निशाना कोणत्या आमदारावर बोगस कर्ज प्रकरण : रोख कुणावर गुलाबरावांवर की सतीश पाटलांवर

By admin | Updated: April 26, 2016 00:16 IST

जळगाव : जिल्हा बँकेतील २०० कोटींच्या बोगस कर्जवाटपात एका आमदाराने लाभ घेतला असल्याचे पालकमंत्री एकनाथराव खडसे यांनी सोमवारी झालेल्या कृषी प्रदर्शनाच्या उद्घाटनाप्रसंगी सांगितले. खडसे यांनी या आमदाराचे नाव घेणे टाळल्याने एरंडोल आणि धरणगाव तालुक्यातील या घोटाळ्यातील लाभार्थी आमदार कोण? असा प्रश्न आता निर्माण होत आहे.

जळगाव : जिल्हा बँकेतील २०० कोटींच्या बोगस कर्जवाटपात एका आमदाराने लाभ घेतला असल्याचे पालकमंत्री एकनाथराव खडसे यांनी सोमवारी झालेल्या कृषी प्रदर्शनाच्या उद्घाटनाप्रसंगी सांगितले. खडसे यांनी या आमदाराचे नाव घेणे टाळल्याने एरंडोल आणि धरणगाव तालुक्यातील या घोटाळ्यातील लाभार्थी आमदार कोण? असा प्रश्न आता निर्माण होत आहे.
गुलाबराव पाटील की डॉ.सतीश पाटील
खडसे यांनी एरंडोल आणि धरणगाव तालुक्यात हा घोटाळा झाल्याचे सांगितले. सध्या एरंडोलचे आमदार डॉ.सतीश पाटील आहेत. तर धरणगावचे आमदार गुलाबराव पाटील आहेत. गेल्या काही महिन्यांपासून गुलाबराव व पालकमंत्री खडसे यांच्यातील आरोपप्रत्यारोप सुरुच आहेत. गेल्या आठवड्यात गटसचिवांना निलंबित केले तसेच पीक कर्जाच्या वाटपावरून आमदार गुलाबराव पाटील यांनी जिल्हा उपनिबंधक कार्यालयात जिल्हा बँकेचे कार्यकारी संचालक जितेंद्र देशमुख यांना धारेवर धरले होते. तर जे.टी.महाजन सूतगिरणी (यावल) खरेदीसाठी निविदेद्वारे भरलेली दोन कोटी ७९ लाख २८ हजार ७५० रुपये ही २५ टक्के रक्कम लक्ष्मी टेक्सटाईल्सला (धरणगाव) नियमबा‘ परत करुन जिल्हा बॅँकेची फसवणूक केल्याप्रकरणी आमदार डॉ.सतीश पाटील यांच्या विरोधात काही दिवसांपूर्वी गुन्हा दाखल आहे. त्यामुळे खडसेंचा रोख नेमका कुणावर याबाबत उत्सुकता आहे.
आक्रमक खडसेंनी नाव घेणे टाळले
घरकूल प्रकरण, जामनेर येथील सागवान प्रकरण तसेच आमदार डॉ.सतीश पाटील यांच्या विरोधातील प्रकरण असो या सर्व प्रकरणात पालकमंत्री खडसे यांनी संबंधितांवर गुन्हा दाखल होण्याचे संकेत दिले होते. माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या दौर्‍यात घराणेशाहीचा आरोप केल्यानंतर पालकमंत्री खडसे यांनी चाळीसगाव येथील कार्यक्रमात डॉ.सतीश पाटील यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल होणार असल्याचे सांगितले होते. त्यानुसार डॉ.सतीश पाटील यांच्यावर गुन्हादेखील दाखल झाला. डॉ.सतीश पाटील यांनी आपल्या प्रतिक्रियेत खडसे यांनी बोलून दाखविल्याप्रमाणे गुन्हा दाखल केल्याचे सांगितले. विरोधात बोलले किंवा काम केल्यानंतर खडसे सांगतात त्यानुसार गुन्हे दाखल होत असल्याचा संदेश बाहेर जात आहे. त्यामुळे कदाचित कृषी प्रदर्शनाच्या उद्घाटन प्रसंगी खडसे यांनी त्या आमदाराचे नाव घेणे टाळले असावे.