शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धव ठाकरे अन् मविआ नेत्यांसोबत राज ठाकरे मंत्रालयात; मुख्य निवडणूक अधिकाऱ्याशी एकत्र चर्चा, 'इंजिना'ची ठरली दिशा?
2
एकनाथ शिंदेंनी सुरू केलेल्या योजना खरेच बंद होणार का? CM फडणवीसांनी सरळ सांगितले; म्हणाले...
3
टाटा मोटर्सच्या शेअर्समध्ये दिसली ४०% ची घसरण, काय आहे यामगची खरी कहाणी आणि पुढे काय होणार? जाणून घ्या
4
रोहित-विराट संदर्भातील 'त्या' प्रश्नावर गंभीर यांचं मोठं वक्तव्य; नेमकं काय म्हणाले कोच? जाणून घ्या सविस्तर
5
१० टक्के पगारवाढ राहुद्या...! दिवाळी दोन दिवसांवर आली, NHM कर्मचाऱ्यांना दोन महिन्यांपासून पगारच नाही...
6
Viral: बंगळुरुमध्ये घरकाम करणाऱ्या बाईचा पगार ₹४५,०००; महिलेच्या दाव्याने सोशल मीडियावर खळबळ...
7
धक्कादायक! पतीशी वाद, रागातून आईकडूनच जुळ्या मुलांची हत्या, स्वत: चौथ्या मजल्यावरुन मारली उडी
8
राऊत म्हणतात, राज ठाकरे सोबत जाण्यास इच्छूक; पण काँग्रेस नेते म्हणाले, मनसेबाबत चर्चा नाही!
9
टॅक्स फ्री ४० लाखांचा फंड! पोस्ट ऑफिसच्या 'या' योजनेत दरमहा इतके गुंतवा अन् कोट्यधीश व्हा
10
४ मुली पदरात, नवऱ्याने सोडलं पण 'तिने' धाडस केलं; सुरू केला व्यवसाय, आता लाखोंची मालकीण
11
भारताची खासगी बँक विकली जाणार! दुबईच्या शेखची मोठी बँक हजारो कोटी रुपये ओतणार, RBI ने दिला होकार...
12
छिंदवाडा'मध्ये झालेल्या मुलांच्या मृत्यूवर 'WHO' ने कडक कारवाई केली; या तीन सिरपबाबत इशारा दिला
13
Diwali 2025: फराळ तयार करताना तळणीच्या 'या' वेळा फॉलो करा; पदार्थ तेल कमी पितील आणि खुसखुशीत होतील!
14
VIDEO : गिलनं पहिली ट्रॉफी जिंकताच धोनी-विराट-रोहितची परंपरा जपली! पण...
15
नोकरी गमावली, वडिलांनी घराबाहेर काढलं..तरुणाने उभं केलं कोट्यवधींचे साम्राज्य, नेमकं काय करतो?
16
रिन्यूएबल्स, डिफेन्ससह फायनान्समधील 'हे' ५ स्टॉक्स देतील जबरदस्त परतावा; ब्रोकरेज फर्मने दिली टार्गेट प्राईज
17
हलगर्जीपणाचा कळस! नर्सने रागात चुकीची आयव्ही लाईन लावली, इन्फेक्शनमुळे हात कापण्याची वेळ
18
Diwali 2025: मनी प्लांटचा 'डबल धमाका'! दिवाळीत 'या' दिवशी' खरेदी करा, दुप्पट लाभ मिळवा!
19
HCL-TCS Salary Hike: एचसीएल आणि टीसीएस कर्मचाऱ्यांना मिळालं दिवाळी गिफ्ट; इनक्रिमेंट आणि बोनसची घोषणा
20
IND vs WI : दिल्लीच्या बालेकिल्ल्यात टीम इंडियाचा मोठा पराक्रम! दक्षिण आफ्रिकेच्या वर्ल्ड रेकॉर्डशी बरोबरी

छिंदवाडा'मध्ये झालेल्या मुलांच्या मृत्यूवर 'WHO' ने कडक कारवाई केली; या तीन सिरपबाबत इशारा दिला

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 14, 2025 11:36 IST

जागतिक आरोग्य संघटनेने दूषित कफ सिरपबाबत इशारा दिला आहे. मध्य प्रदेशातील छिंदवाडा येथे कोल्ड्रिफ कफ सिरपमुळे २३ मुलांचा मृत्यू झाल्यानंतर, WHO ने श्रीसन फार्मास्युटिकल्स, रेडनेक्स फार्मास्युटिकल्स आणि शेप फार्मा यांनी उत्पादित केलेल्या कफ सिरपबद्दल चिंता व्यक्त केली आहे.

जागतिक आरोग्य संघटनेने सोमवारी दूषित कफ सिरपबाबत एक सूचना जारी केली. देशांमध्ये या औषधांचा कोणताही शोध लागल्यास आरोग्य संस्थेला कळवण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

मध्य प्रदेशातील छिंदवाडा जिल्ह्यात कोल्ड्रिफ कफ सिरप घेतल्यानंतर २३ नवजात बालकांचा मृत्यू झाला. त्यानंतर, भारतातील अनेक राज्य सरकारांनी या कफ सिरपवर बंदी घातली आहे. WHO ने देखील या संभाव्य प्राणघातक कफ सिरपची दखल घेतली आहे.

बिहार निवडणूक: तेजस्वी यादव काँग्रेससोबतच्या बैठकीतून निघून आले; राहुल गांधी, खर्गेंना न भेटताच बिहारला पोहोचले...

WHO ने तीन 'कफ सिरप' विरोधात कारवाई केली

ही औषधे श्रीसन फार्मास्युटिकल्सच्या कोल्ड्रिफ, रेडनेक्स फार्मास्युटिकल्सच्या रेस्पिफ्रेश टीआर आणि शेप फार्माच्या रिलाइफच्या विशिष्ट बॅचेस आहेत. दूषित उत्पादने गंभीर धोका निर्माण करतात आणि गंभीर, संभाव्यतः प्राणघातक आजार निर्माण करू शकतात, असे जागतिक आरोग्य संघटनेने म्हटले आहे.

CDSCO ने WHO ला काय सांगितले?

दरम्यान, भारताच्या आरोग्य प्राधिकरणाने, सेंट्रल ड्रग्ज स्टँडर्ड कंट्रोल ऑर्गनायझेशनने जागतिक आरोग्य संघटनेला याबाबत माहिती दिली. हे सिरप पाच वर्षांखालील मुलांनी सेवन केले होते. कफ सिरपमध्ये विषारी डायथिलीन ग्लायकोलचे प्रमाण परवानगी असलेल्या मर्यादेपेक्षा जवळजवळ 500 पट जास्त होते, असे डब्लूएचओने सांगितले.

भारतातून कोणतेही दूषित औषध निर्यात केले नाही आणि बेकायदेशीर निर्यातीचा कोणताही पुरावा नाही. हे विषारी कफ सिरप अमेरिकेत पाठवले नाहीत, असे अमेरिकेच्या अन्न आणि औषध प्रशासनाने शुक्रवारी माहिती दिली.

English
हिंदी सारांश
Web Title : WHO Acts on Child Deaths in Chhindwara, Warns on Syrups

Web Summary : Following child deaths linked to cough syrup in Chhindwara, WHO issued a warning about contaminated products. Three syrup brands are under scrutiny due to high levels of diethylene glycol. Indian authorities stated no contaminated drugs were exported.