शीलेश शर्मा - नवी दिल्ली
भारतातील सर्वात मोठा राष्ट्रीय पक्ष असल्याची बिरुदावली मिरवणा:या व 125 वर्षाची परंपरा असलेल्या काँग्रेसला सोळाव्या लोकसभेच्या निवडणुकीत जबरदस्त तडाखा बसला. त्यामुळे या पक्षाचे अस्तित्व एखाद्या प्रादेशिक पक्षाप्रमाणो भासू लागले आह़े काँग्रेसच्या या पराभवाला नेमके कोणते घटक जबाबदार आहेत, याचे मूल्यमापन आता सुरू झाले आहे.
काँग्रेसच्या या पराभवाचे खापर कुणाच्या डोक्यावर फोडायचे, हे बोलण्यास एकही काँग्रेस नेता धजावलेला नाही़ अर्थात, खासगीत काँग्रेसचे सर्वच बडे नेते पक्ष आणि पर्यायाने संपुआच्या पराभवासाठी उपाध्यक्ष राहुल गांधी यांचे निर्णय आणि त्यांच्या कार्यशैलीला जबाबदार ठरवत आहेत़ काँग्रेस सरचिटणीस असलेल्या एका नेत्याने याबाबत ‘लोकमत’कडे बोलकी प्रतिक्रिया नोंदवली़ मला निकालाचे आश्चर्य वाटलेले नाही़ दोन वर्षापासून पक्षश्रेष्ठींना सावध करण्याचे प्रयत्न मी केले. पण, माङो कुणीही ऐकले नाही, असे या नेत्याने सांगितले. राहुल यांच्या कार्यशैलीबाबत पक्षात नाराजी व्यक्त केली जात आह़े त्यांच्या शैलीने अहमद पटेल, जनार्दन द्विवेदी, मोतीलाल व्होरा, अजित जोगी, एस.एम़ कृष्णा, गुलाम नबी आझाद यांच्यासारखे नेते काहीसे दुरावले. मोहन गोपाल, कनिष्क सिंह, रणदीप सुरजेवाला, जयराम रमेश, मधुसूदन मिस्त्री, मोहन प्रकाश यांच्यासारखे नेते सर्व निर्णय घेऊ लागले होत़े याच निर्णयांमुळे काँग्रेसवर लाजिरवाणा पराभव पाहण्याची वेळ आली.
विरोधी पक्षनेतेपदही नाही
राहुल गांधी यांच्या नेतृत्वाखाली लढण्यात आलेल्या या निवडणुकीत काँग्रेसला मोठय़ा पराभवाला सामोरे जावे लागले. काँग्रेसला विरोधी पक्षाचा दर्जासुद्धा न मिळण्याची नामुष्की ओढवली.
नेतृत्वावर प्रश्नचिन्ह
काँग्रेस मुख्यालयाबाहेर पोस्टर हातात घेतलेल्या काँग्रेसच्या कार्यकत्र्यानी ‘प्रियंका लाओ, काँग्रेस बचाओ’च्या घोषणा देत राहुल यांच्या नेतृत्वावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले. सर्व हतप्रभ राहिल़े
चुकीची धोरणो कारणीभूत
पराकोटीचा अहंकार, संवादाचा अभाव, एकापाठोपाठ एक निर्णय चुकीचे ठरल्याने काँग्रेसला फटका बसला. अण्णा हजारे यांच्या आंदोलनाने दिल्ली हादरली़ त्याच वेळी काँग्रेससाठी धोक्याची घंटा वाजली होती़