शहरं
Join us  
Trending Stories
1
एनआयए ऑन द स्पॉट : हल्ल्याचे धागेदोरे तपासणे सुरू, फॉरेन्सिक टीमही घटनास्थळी
2
हल्ल्याची छायाचित्रे पाहून भारतीयांचे रक्त उसळते आहे; दहशतवाद्यांना होईल शिक्षा, पीडितांना न्याय मिळेल : मोदी
3
संघर्ष, सीमेच्या ‘आतला’... अंतर्गत संघर्षाचा मुद्दा देशासाठी तेवढाच गंभीर
4
सीईटीच्या मॅथ्स पेपरमध्ये घोळ, निम्मे पर्याय चुकीचे; विद्यार्थ्यांचा गोंधळ, सीईटी पर्यवेक्षकांचे कानावर हात
5
रक्त संतापाने उसळते आहे, आता बास! आम्ही भारतीय लोक पोकळ धमक्या देत नसतो
6
ईडी कार्यालयाला आग; संशयाचा धूर , मुंबई साखर झोपेत असताना दुर्घटना, कारण अस्पष्ट
7
किती अधिकाऱ्यांना मंत्रालयात सुनावणीसाठी बोलावणार?
8
एनसीईआरटीच्या पाठ्यपुस्तकांतून मुघल, दिल्ली सल्तनतचे संदर्भ हटविले
9
गणेश नाईकांचा वारू शिंदेसेना रोखेल काय?; दोघेही एकमेकांना शह देण्याची संधी सोडत नाहीत
10
एकही पाकिस्तानी महाराष्ट्रात राहणार नाही : देवेंद्र फडणवीस
11
भारत-फ्रान्स यांच्यात आज होणार Rafale-M jetsचा करार; भारतीय नौदल होणार अधिक सामर्थ्यवान
12
DC vs RCB : भर मैदानात कोहली-केएल राहुल यांच्यात वाजलं? नेमकं काय घडलं? (VIDEO)
13
पाकिस्तानी नागरिकांनी दिलेल्या वेळेत भारत सोडला नाही तर बसणार मोठा दणका, काय होणार शिक्षा?
14
Shocking!! सायबर चौकात दहशत! कोल्हापुरात सराईत गुंडाकडून तलवारीने हल्ला; दोघे जखमी
15
राज्याला हादरवणाऱ्या शिक्षण घोटाळ्याची ईडीने मागविली माहिती; SIT गठीत करण्याच्या हालचालींना वेग
16
ट्रक-बोलेरोच्या भीषण अपघातात चार जण जागीच ठार; एक जण गंभीर जखमी, रुग्णालयात दाखल
17
धक्कादायक! नागपुरातील भोसले घराण्याची ऐतिहासिक तलवार आंतरराष्ट्रीय कंपनीकडून ऑनलाईन विक्रीला
18
"देशाच्या सुरक्षेसाठी शिवसैनिक जवानांसारखा लढेल, ही लढाई..."; DCM एकनाथ शिंदे यांचे वक्तव्य
19
भुवीनं साधला मोठा डाव! IPL च्या इतिहासात सर्वाधिक विकेट्स घेणारा ठरला दुसरा गोलंदाज
20
पाकिस्तानात मोठी कारवाई! खैबर पख्तूनख्वा प्रांतात घुसखोरी करणारे ५४ TTP समर्थक ठार

कोण आहेत व्हीके पांडियन? ज्यांना मिळाला कॅबिनेट मंत्री पदाचा दर्जा

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 24, 2023 15:26 IST

मुख्यमंत्री नवीन पटनायक यांचे अत्यंत जवळचे सहकारी मानले जाणारे व्हीके पांडियन अनेकदा वादात सापडले आहेत.

नवी दिल्ली : पुढील वर्षी ओडिशामध्ये विधानसभा निवडणुका होणार आहेत. याच पार्श्वभूमीवर राज्याच्या राजकारणात मोठे बदल आधीच दिसून येत आहेत. मुख्यमंत्री नवीन पटनायक यांचे विश्वासू खाजगी सचिव आणि राज्याचे ५ टी सचिव व्हीके पांडियन यांना कॅबिनेट दर्जा देण्यात आला आहे. २०२४ च्या महत्त्वाच्या निवडणुकांपूर्वी व्हीके पांडियन यांच्या वारंवार सार्वजनिक उपस्थितीवरून विरोधकांकडून वाढत असलेल्या टीकेच्या दरम्यान त्यांनी व्हीआरएस (स्वैच्छिक सेवानिवृत्ती) ची निवड केली होती. 

विशेष म्हणजे त्यांना एक दिवस आधी व्हीआरएस मिळाला होता. दरम्यान, मुख्यमंत्री नवीन पटनायक यांचे अत्यंत जवळचे सहकारी मानले जाणारे व्हीके पांडियन अनेकदा वादात सापडले आहेत. व्हीके पांडियन यांनी आपल्या पदाचा गैरवापर करून राजकीय फायदा मिळवल्याचा आरोप विरोधी पक्षांकडून करण्यात येत आहे. व्हीके पांडियन हे ओडिशा केडरचे २००० बॅचचे आयएएस अधिकारी आहेत.

राज्याचे सामान्य प्रशासन आणि सार्वजनिक तक्रार विभागाने २४ ऑक्टोबरच्या आदेशात नमूद केले आहे की, व्हीके पांडियन यांना ५ टी (परिवर्तनात्मक उपक्रम) आणि न्यू ओडिशा योजनेचे अध्यक्ष म्हणून 'कॅबिनेट मंत्री पदावर' नियुक्त करण्यात आले आहे. व्हीके पांडियन थेट मुख्यमंत्री नवीन पटनायक यांच्या अंतर्गत काम करतील, असे आदेशात म्हटले आहे. तसेच, कार्मिक आणि प्रशिक्षण विभागाने ओडिशा सरकारच्या संदर्भ पत्रानंतर २३ ऑक्टोबर रोजी व्हीके पांडियन यांच्या स्वेच्छानिवृत्तीला मान्यता दिली आहे.

व्हीके पांडियन हे तामिळनाडूचे रहिवासी २००० बॅचचे आयएएस अधिकारी व्हीके पांडियन हे मुळचे तामिळनाडू येथील आहेत. एक तरुण जिल्हाधिकारी म्हणून व्हीके पांडियन यांनी आपली ओळख निर्माण केली होती. १९९९ मध्ये ओडिशा सुपर चक्रीवादळानंतर गंजाम जिल्ह्यात अनेकांना जीव गमवावा लागला होता. त्यानंतर २०११ मध्ये मुख्यमंत्री नवीन पटनायक यांनी व्हीके पांडियन यांना मुख्यमंत्री कार्यालयात आणले होते. नवीन पटनायक यांचे एकेकाळचे विश्वासू सहकारी आणि माजी आयएएस अधिकारी प्यारी मोहन मोहपात्रा यांनी रिकामी केलेली पोकळी हळूहळू व्हीके पांडियन यांनी भरून काढण्यास सुरुवात केली.

टॅग्स :Odishaओदिशा