शहरं
Join us  
Trending Stories
1
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
2
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
3
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
4
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
5
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
6
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
7
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
8
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
9
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
10
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
11
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
12
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
13
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
14
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
15
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
16
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
17
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
18
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
19
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
20
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
Daily Top 2Weekly Top 5

भारत-पाक युद्ध थांबविणारे ट्रम्प कोण? दाल में कुछ तो काला है : राहुल गांधी

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 24, 2025 05:33 IST

संसदेतील पेच तिसऱ्या दिवशीही कायम; केंद्र सरकार ट्रम्प यांच्यासमोर नमते घेतेय का : विरोधक

नवी दिल्ली : भारत व पाकिस्तानमध्ये शस्त्रसंधी घडवून आणल्याचा अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी आतापर्यंत २५ वेळा दावा केला आहे. त्यांनी मंगळवारी देखील पुन्हा तसाच दावा केल्याने त्या अनुषंगाने लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी सांगितले की, ट्रम्प पुन्हा पुन्हा तोच दावा करत आहेत म्हणजे ‘दाल मे कुछ काला है.’ भारत-पाक युद्ध थांबविणारे ट्रम्प नेमके कोण आहेत. ट्रम्प यांच्या दाव्यावर केंद्र सरकारने आजवर एकदाही वक्तव्य केलेले नाही. याच मुद्द्यावरून काँग्रेसचे पक्षाध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी टीका केली की, भारत पाकमध्ये शस्त्रसंधी घडवल्याचा ट्रम्प वारंवार दावा करत असून, केंद्र सरकार त्याला उत्तर का देत नाही? केंद्र सरकार ट्रम्प यांच्यासमोर नमते घेत आहे का?.  या दोन देशांतील संघर्षातून अणुयुद्धही उद्भवण्याची शक्यता होती. ती मी थांबवल्याचे ट्रम्प म्हणाले.

संसदेच्या दोन्ही सभागृहांत गदारोळ बिहारमधील मतदार यादी व अन्य काही मुद्द्यांवर विरोधकांनी संसदेच्या दोन्ही सभागृहांत गदारोळ घातल्याने बुधवारी सलग तिसऱ्या दिवशी पेच कायम होता. लोकसभेत फलक घेऊन येणाऱ्या खासदारावर कारवाई करावी लागेल, असा इशारा लोकसभाध्यक्ष ओम बिर्ला यांनी दिला. तरीही विरोधकांनी घोषणाबाजी केली, फलक फडकावले. ‘लोकशाही वाचवा, मतबंदी थांबवा’बिहारमधील मतदार यादी पुनरीक्षणाच्या विरोधात विरोधी पक्षाच्या खासदारांनी बुधवारी संसद परिसरात निदर्शने केली. पुनरीक्षण मागे घेण्याची व दोन्ही सभागृहांत चर्चा करण्याची मागणी यावेळी करण्यात आली. काँग्रेस, द्रमुक, तृणमूल काँग्रेस, समाजवादी पक्ष, शिवसेना (उबाठा), झामुमो, राजद व डाव्या पक्षांसह विरोधी पक्षांचे ज्येष्ठ नेते व खासदार मकर द्वाराबाहेर जमले व निदर्शने केली. यावेळी लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी, सपाचे अखिलेश यादव, द्रमुकचे टीआर बालू, शिवसेना (उबाठा)चे संजय राऊत, तृणमूलचे कल्याण बॅनर्जी आदी नेत्यांनी ‘लोकशाही वाचवा, मतबंदी थांबवा’ अशा घोषणा दिल्या. 

५२ लाखांहून अधिक मतदार झाले गायबबिहारमध्ये मतदार यादीच्या विशेष सखोल पुनरीक्षणात ५२ लाखांहून अधिक मतदार त्यांच्या पत्त्यावर आढळले नाहीत. २६ लाख मतदार वेगवेगळ्या मतदारसंघात स्थलांतरित झाले आहेत, तर सात लाख मतदारांनी दोन ठिकाणी नोंदणी केल्याची माहिती पुढे आली.

एक लाख मतदारांचा ठावठिकाणा लागेनाबिहारमध्ये सुमारे एक लाख मतदारांचा ठावठिकाणाच लागत नाही, तर ७.१७ कोटी लोकांचे गणना अर्ज प्राप्त झाले असून, ते डिजिटल रूपात दाखल करण्यात आले आहेत. २० लाख मतदारांचा मृत्यू झाला तर २८ लाख अन्य मतदार त्यांच्या सध्याच्या पत्त्यावरून कायमस्वरूपी स्थलांतरित झाले आहेत. 

टॅग्स :Rahul Gandhiराहुल गांधीMonsoon Session Of Parliamentसंसेदेचे पावसाळी अधिवेशनDonald Trumpडोनाल्ड ट्रम्प