शहरं
Join us  
Trending Stories
1
इस्रायलचे पहिले टार्गेट ठरले! इराणच्या रेल्वे उडविणार, नागरिकांना रेल्वेमार्गांपासून दूर राहण्याचा इशारा...
2
सर्व नागरिकांनी ऊर्जा प्रकल्पांना घेराव घाला...! ट्रम्प यांच्या धमकीवर इराणची नवी चाल, वाटाघाटी नाजूक वळणावर...
3
दिल्ली विधानसभेत का घुसवली कार? पोलिसांच्या चौकशीत सरबजीतने केला धक्कादायक खुलासा! म्हणाला..
4
भारतातील राजदूताला व्हाईट हाऊसमध्ये स्पेशल आमंत्रण; इराणची डेडलाइन तेव्हाच संपणार, योगायोग की...
5
Bonus Share News: पहिल्यांदाच मिळणार बोनस शेअर्सचं गिफ्ट; मिळणार ५ शेअर्स, २८५९% वाढलाय शेअर
6
शालेय सहलींनी भरली एसटीची तिजोरी, मिळाले तब्बल १२७ कोटी रुपयांचे उत्पन्न
7
धक्कादायक! भावाच्या पत्नीवर अत्याचार; आईनेच दिली मुलाविरोधात साक्ष, न्यायालयाचा कठोर निर्णय
8
IPLमध्ये सर्व संघ कुणाविरोधात २ तर कुणाविरुद्ध एकच सामना का खोळतात? असं आहे यामागचं गुपित
9
तुफान राडा! भाजपातील वाद चव्हाट्यावर, नेते आपापसात भिडले; शिवीगाळ करत दिली धमकी
10
Crime: नाशिक, वसई पाठोपाठ नागपुरातही भोंदूबाबाचा मोठा कांड; तंत्र-मंत्राच्या नावाखाली महिलेवर बलात्कार
11
ट्रम्प यांची इराणला 'डेडलाईन'! रात्री ८ वाजेपर्यंत होर्मुज खुला करा, अन्यथा युद्ध अटळ; भारतासह आशियाई देश चिंतेत
12
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
13
इराणचा अमेरिकेला '१० कलमी' प्रतिप्रस्ताव! होर्मुजमधून जाणाऱ्या जहाजावर २० लाख डॉलर टॅक्स आकारणार? आता ट्रम्प काय करणार?
14
Mumbai Metro: मुंबईच्या बाहेर जाणारी पहिली मेट्रो! आता अंधेरी ते मिरा भाईंदर थेट प्रवास, तिकीट किती? स्थानकं किती? A टू Z माहिती...
15
युद्ध इराणमध्ये, फटका पाकिस्तानात! रात्री ८ नंतर बाजारपेठा बंद; डिझेल ५२० तर महागाईने मोडले कंबरडे
16
वेळ संपत चालली! इराणच्या भीतीने सौदीने बहारिनला जोडणारा पूल बंद केला; रात्री काय घडणार... 
17
VIRAL : लेकाच्या कष्टाचे फळ! मुलगा घरी घेऊन आला पहिला फ्रीज; आईच्या चेहऱ्यावरचा आनंद पाहून व्हाल भावुक 
18
Video - संतापजनक! फक्त एक पेरू तोडला म्हणून ४ वर्षांच्या मुलीला दोरीने बांधून बेदम मारहाण
19
भिवंडीत तरुणाचा मृत्यू झाल्यानंतर विशेष सुरक्षा; भाड्यात दरवर्षी १० टक्के वाढ
20
Middle East War: "होर्मुझ सामुद्रधुनी उघडा नाही तर, गंभीर परिणाम भोगा" अमेरिकेचा इराणला शेवटचा अल्टिमेटम!
Daily Top 2Weekly Top 5

"मुसलमानांना भारतात राहण्याची परवानगी देणारे हे कोण?" भागवतांच्या वक्तव्यावरून ओवेसी भडकले

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 11, 2023 14:27 IST

'मुस्लिमांना भारतात राहण्याची अथवा आम्हाला आमच्या धर्माचे पालन करण्याची परवानगी देणारे मोहन भागवत कोण? अल्लाहच्या इच्छेमुळेच आम्ही भारतीय आहोत.

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांच्या वक्तव्यानंतर आता एआयएमआयएमचे नेते असदुद्दीन ओवेसी यांनी पलटवार केला आहे. मुस्लिमांना धर्माचे पालन करण्याची परवानगी देणारे मोहन भागवत कोण? असा सवाल असदुद्दीन ओवेसी यांनी केला आहे. याच बरोबर, 'हिंदुस्तानने हिंदुस्तानच रहायला हवे, सहमत. पण ‘माणसानेही माणूस रहायला हवे,’ अशा शब्दाद राज्यसभा खासदार कपील सिब्बल यांनीही सरसंघचालकांवर निशाणा साधला आहे.

ओवेसी म्हणाले, 'मुस्लिमांना भारतात राहण्याची अथवा आम्हाला आमच्या धर्माचे पालन करण्याची परवानगी देणारे मोहन भागवत कोण? अल्लाहच्या इच्छेमुळेच आम्ही भारतीय आहोत. आमच्या नागरिकत्वावर प्रश्न उपस्थित करण्याची त्यांची हिंमत कशी केली. आम्ही आमची श्रद्धा सामावून घेण्यासाठी अथवा नागपुरातील काही कथित ब्रह्मचाऱ्यांच्या समूहाला खुश करण्यासाठी नाही.'

काय म्हणाले होते मोहन भागवत? - हिंदुस्थान हा हिंदुस्थानच राहिला पाहिजे, हे सत्य आहे. परंतु, भारतात राहणाऱ्या मुस्लिम समाजाला येथे कोणताही धोका नाही. मुस्लिम बांधवांनी मनात कोणतीही भीती ठेऊ नये. भारतात इस्लामला कोणताही धोका नाही. मात्र, मुस्लिम बांधवांनी आपल्या श्रेष्ठत्वाशी संबंधित विधाने करणे सोडायला हवे, असा सल्ला मोहन भागवत यांनी दिला. आपण एकत्र राहू शकत नाही, हे नरेटिव्ह मुस्लिम समाजाने सोडून द्यायला हवे. खरे तर इथे राहणार्‍या प्रत्येकाने असा विचार एकत्र नांदण्याचाच विचार केला पाहिजे. मग तो हिंदू असो वा कम्युनिस्ट असो, असे मोहन भागवत म्हणाले. 

जे दीर्घकाळापासून लढत आहेत त्यांनी आक्रमक होणे स्वाभाविक -जगभरातील हिंदूंमध्ये एक प्रकारची आक्रमकता दिसून येत आहे. कारण १ हजार वर्षांपासून सतत युद्धात असलेल्या या समाजात एक जागरुकता आली आहे. तुम्ही पाहिले असेल की हिंदू समाज १ हजारे वर्षे युद्धाच्या छायेत राहिला. हा लढा परकीय आक्रमणे, परकीय प्रभाव आणि परकीय कारस्थानाविरुद्ध चालला. या लढ्याला संघाने पाठिंबा दिला. इतर लोकांनीही पाठिंबा दिला. या कारणांमुळे हिंदू समाज जागृत झाला आहे. तसेच जे दीर्घकाळापासून लढत आहेत त्यांनी आक्रमक होणे स्वाभाविक आहे, असे मोहन भागवत यांनी नमूद केले आहे. 

टॅग्स :Asaduddin Owaisiअसदुद्दीन ओवेसीMohan Bhagwatमोहन भागवतRSSराष्ट्रीय स्वयंसेवक संघMuslimमुस्लीमHinduहिंदू