शहरं
Join us  
Trending Stories
1
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
2
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
3
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
4
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
5
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
6
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
7
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
8
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
9
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
10
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
11
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
12
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
13
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
14
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
15
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
16
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
17
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
18
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
19
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
20
Jasprit Bumrah Unwanted Records : बुमराहच्या नावे लाजिरवाणी 'हॅटट्रिक'! ८ वर्षांनी आली 'ही' वेळ
Daily Top 2Weekly Top 5

घाबरतोय कोण? मैदानात दोन हात करू, अमित शहा यांनी राहुल गांधींना दिले आव्हान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 8, 2023 10:44 IST

संसदेचे कामकाज विस्कळीत करणाऱ्या विरोधकांना देश माफ करणार नाही!

कौशांबी (उत्तर प्रदेश) : काँग्रेस नेते राहुल गांधी यांचे लोकसभा सदस्यत्व अपात्र ठरविल्याबद्दल संसदेचे कामकाज विस्कळीत करणाऱ्या विरोधकांना देश माफ करणार नाही, अशी घणाघाती टीका केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी शुक्रवारी केली. यावेळी त्यांनी राहुल गांधी यांना खुले आव्हानही दिले. कौशांबी महोत्सवाचे उद्घाटन केल्यानंतर आयोजित जाहीर सभेत ते म्हणाले, देशाच्या कोणत्याही नेत्याने परदेशात देशाचा अपमान करावा का?.

राहुल गांधींवर निशाणा साधत ‘‘घाबरतोय कोण? मैदान खुले आहे. भारतात कोणतेही मैदान तुम्ही ठरवा, दोन-दोन हात करायला भाजपवाले तयार आहेत,” असे आव्हानही त्यांनी दिले. पुन्हा एकदा मोदीजी ३०० पेक्षा जास्त जागा जिंकून सरकार स्थापन करणार आहेत,” असा दावा त्यांनी केला.

अमित शाह म्हणाले...

  • जेव्हा-जेव्हा मोदीजींना शिव्या दिल्या जातात, तेव्हा जनतेने या शिव्या अधिक ताकदीने कमळाच्या चिखलात फुलवल्या आहेत.
  • काँग्रेसचे लोक म्हणतात की लोकशाही धोक्यात आहे, लोकशाही धोक्यात नाही, तुमचे कुटुंब धोक्यात आहे. कौटुंबिक राजकारण धोक्यात आहे.

असे इतिहासात कधीच घडले नाही...

विरोधकांवर निशाणा साधत शाह म्हणाले, “देशाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाचे सत्र चर्चेविना संपले, असे स्वातंत्र्याच्या इतिहासात कधीच घडले नव्हते. विरोधी पक्षांच्या नेत्यांनी अधिवेशन चालू दिले नाही, त्याचे कारण म्हणजे राहुल गांधींना संसदेच्या सदस्यत्वावरून अपात्र ठरविणे.आता या मुद्द्यावर काळे कपडे घातलेल्या काँग्रेसवाल्यांनी संपूर्ण संसद बंद पाडली.’’

काँग्रेस म्हणते...

‘भारत जोडो’च्या माध्यमातून राहुल गांधींनी राष्ट्रीय स्तरावर एक शक्तिशाली वातावरण तयार केले जे परिवर्तनकारी होते. हताश भाजप त्यावरून लक्ष वळवण्याचा प्रयत्न करत आहे. यात निष्पक्ष असावे अशी अपेक्षा असलेल्या उच्च पदांवरील काही मान्यवरांचाही समावेश आहे. -जयराम रमेश, काँग्रेस सरचिटणीस  

टॅग्स :Amit Shahअमित शाहRahul Gandhiराहुल गांधी