उत्तर प्रदेशात भाजपा आणि बसपाची कठोर परीक्षा बाजी कुणाची ? : निवडणुकीचे पहिले दोन टप्पे निर्णायक
By admin | Updated: January 31, 2017 02:06 IST
मीना-कमल/ लखनौ : उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीच्या पहिल्या दोन टप्प्यात भाजपा आणि बसपाला कठोर परीक्षा द्यावी लागणार असून या टप्प्यातील १४० पेक्षा जास्त जागा या दोन पक्षांसाठी निर्णायक सिद्ध होतील. भाजपला २०१४ च्या लोकसभा निवडणुकीतील करिष्मा दाखवायचा असून मुझफ्फरनगर दंगलीनंतर बदलेली परिस्थिती या पक्षाला कितपत साथ देते, हेही या निमित्ताने दिसून येईल.
उत्तर प्रदेशात भाजपा आणि बसपाची कठोर परीक्षा बाजी कुणाची ? : निवडणुकीचे पहिले दोन टप्पे निर्णायक
मीना-कमल/ लखनौ : उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीच्या पहिल्या दोन टप्प्यात भाजपा आणि बसपाला कठोर परीक्षा द्यावी लागणार असून या टप्प्यातील १४० पेक्षा जास्त जागा या दोन पक्षांसाठी निर्णायक सिद्ध होतील. भाजपला २०१४ च्या लोकसभा निवडणुकीतील करिष्मा दाखवायचा असून मुझफ्फरनगर दंगलीनंतर बदलेली परिस्थिती या पक्षाला कितपत साथ देते, हेही या निमित्ताने दिसून येईल.या दोन टप्प्यातील ४२ जागा बसपाकडे असून भाजपने लोकसभा निवडणुकीत मिळविलेले घवघवीत यश पाहता दोहोंची प्रतिष्ठा पणाला लागली आहे. समाजवादी- काँग्रेसची युती मुस्लिमांची पारंपरिक मते कितपत ताब्यात ठेवण्यात यशस्वी होते यावर समीकरण अवलंबून राहील. लोकसभा निवडणुकीत भाजपने ५० टक्क्यांपेक्षा जास्त मते मिळविली होती. मुझफ्फरनगरच्या जातीय दंगलीनंतर मतांच्या ध्रुवीकरणाचा मोठा लाभ भाजपला झाला. पश्चिम उत्तर प्रदेशातील यशामुळेच भाजपाने लोकसभेच्या ८० पैकी ७१ जागा जिंकत नवा विक्रम नोंदला. त्या तुलनेत सपा, बसपा, काँग्रेस आणि राष्ट्रीय लोकदलाला अत्यल्प मते मिळाली होती.-------------------------२६ जिल्ह्यांमध्ये भाजपसमोर सपा-काँग्रेस युतीचे आव्हान२६ जिल्ह्यांमध्ये भाजपला सपा- काँग्रेसच्या युतीच्या तगड्या आव्हानाचा मुकाबला करावा लागेल. मुझफ्फरनगर, बागपत, मेरठ, गाजियाबाद, गौतम बुद्ध नगर, अलीगड, आग्रा, फिरोजाबाद भागात सपा आणि बसपाने समान ३३ टक्के जागा जिंकल्या होत्या. मुस्लीमबहुल रुहेलखंडचे नऊ जिल्हे सपाचे पारंपरिक बालेकिल्ले मानले जातात.-----------------दोन टप्प्यात दिग्गज रिंगणात...पहिल्या दोन टप्प्यांमध्ये भाजपचे सुरेश खन्ना, श्रीकांत वर्मा, सुरेश राणा, संगीत सोम, पंकज मलिक, लक्ष्मीकांत वाजपेयी, पंकजसिंग, समाजवादी पक्षाचे मोहम्मद आझम खान, त्यांचे पुत्र शाहिद, राममूर्ती वर्मा, बसपाचे रामवीर उपाध्याय काँग्रेसचे प्रदीप माथूर आदी दिग्गजांचे भवितव्य सीलबंद होणार आहे.