शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
2
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
3
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
4
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
5
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
6
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
7
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
8
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
9
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
10
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
11
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
12
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
13
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
14
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
15
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
16
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
17
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
18
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
19
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
20
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
Daily Top 2Weekly Top 5

लोकांनी काय खायचे हे ठरविणारे तुम्ही कोण?; मांसाहारावरून न्यायालयाने फटकारले

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 11, 2021 05:47 IST

घराबाहेर कोणी काय खायचे हे तुम्ही कसे काय ठरवू शकता? कोर्टाचा संतप्त सवाल

अहमदाबाद : लोकांनी घराबाहेर पडल्यानंतर काय खायचे, हे तुम्ही का ठरवत आहात? असा सवाल करीत गुजरात उच्च न्यायालयाने अहमदाबाद महापालिकेला फटकारले आहे. या शहरात रस्त्यावर मांसाहारी पदार्थ विकणाऱ्या फेरीवाल्यांच्या विरोधात महापालिकेने मोहीम उघडली होती. त्याविषयी न्यायालयाने तीव्र नाराजी व्यक्त केली.  आम्ही रस्त्यावरील फेरीवाल्यांवर कारवाई करताना कोणताही भेदभाव केला नाही, असे अहमदाबाद महापालिकेने गुजरात उच्च न्यायालयाला सांगितले होते. याबाबत मानवी हक्क कार्यकर्ते व वकील के. आर. कोष्टी म्हणाले की, वैयक्तिक स्वातंत्र्यावर गदा आणण्याचा कोणालाच अधिकार नाही. त्यामुळे अहमदाबाद महापालिकेला उच्च न्यायालयाने फैलावर घेतले, हे योग्यच झाले. 

लोकांना त्यांचा आहार ठरवू द्यागुजरात उच्च न्यायालयाचे न्या. बिरेन वैष्णव यांनी अहमदाबाद महापालिकेला खडसावताना म्हटले आहे की, घराबाहेर कोणी काय खायचे हे तुम्ही कसे काय ठरवू शकता? सत्तेवर असलेल्या लोकांच्या मनात आले, त्याप्रमाणे तुम्ही मोहिमा राबवता काय? उसाच्या रसामुळे मधुमेहाचा धोका असल्याने तो पिऊ नका, असे महापालिका आयुक्त उद्या मला सांगू लागतील. मुळात असे सांगण्याचा महापालिकेला अधिकारच काय? असाही सवाल न्यायाधीशांनी केला. 

टॅग्स :High Courtउच्च न्यायालय