शहरं
Join us  
Trending Stories
1
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
2
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
3
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
4
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
5
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
6
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
7
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
8
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
9
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
10
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
11
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
12
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
13
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
14
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
15
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
16
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
17
जीवाशी खेळ! एक्स्पायरी डेट बदलून विकत होते कोल्ड ड्रिंक्स, बिस्किट; मोठ्या रॅकेटचा पर्दाफाश
18
Bhagwant Mann : "समोसा-पिझ्झाचा मुद्दा..."; राघव चड्ढांवर पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान कडाडले, आतिशींचा गंभीर आरोप
19
'सिंधू' करार स्थगितीनंतर पाकिस्तानला आणखी एक धक्का! पुन्हा सुरू होतोय 'मोहरा प्रकल्प', जाणून घ्या
20
IPL 2026: चेन्नईला होतोय पश्चाताप! ज्याला संघातून काढलं, तोच खेळाडू दिल्लीसाठी ठरतोय मोठा जॅकपॉट
Daily Top 2Weekly Top 5

महाराष्ट्रातील मंत्र्यांना कोणते खाते?; मुरलीधर मोहोळ, रक्षा खडसेंवर मोठी जबाबदारी

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 10, 2024 20:44 IST

Portfolio for PM Narendra Modi-led Union Cabinet: मोदींच्या तिसऱ्या कार्यकाळात महाराष्ट्रातील ६ मंत्र्यांचा समावेश असून त्यांनाही महत्त्वाच्या खात्यांची जबाबदारी देण्यात आली आहे. 

नवी दिल्ली - लोकसभा निवडणुकीत एनडीएला बहुमत मिळाल्यानंतर रविवारी पंतप्रधान नरेंद्र मोदींसह ७१ मंत्र्यांचा शपथविधी राष्ट्रपती भवनात पार पडला. या नव्या मंत्र्यांना आता खातेवाटप जाहीर करण्यात आलं असून यात महत्त्वाची खाती भाजपाच्या वाट्याला आल्याचं दिसून येते. मोदींच्या नेतृत्वाखालील या मंत्रिमंडळात महाराष्ट्रातील ६ मंत्र्यांचा समावेश होता. त्यातील २ कॅबिनेट, १ स्वतंत्र प्रभार राज्यमंत्री आणि ३ राज्यमंत्री यांचाही शपथविधी रविवारी झाला. 

महाराष्ट्रातील नितीन गडकरी, पीयूष गोयल यांना केंद्रीय मंत्रिमंडळात कॅबिनेट खात्याची जबाबदारी देण्यात आली. तर  शिवसेनेच्या प्रतापराव जाधव यांच्याकडे स्वतंत्र प्रभार असलेल्या राज्यमंत्रिपदाची जबाबदारी आहे. त्याचसोबत रामदास आठवले, रक्षा खडसे आणि मुरलीधर मोहोळ यांच्याकडे राज्यमंत्रिपद सोपवण्यात आले आहे.

महाराष्ट्रातील मंत्र्यांना मिळालेली खाती

नितीन गडकरी - रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रीपीयूष गोयल - वाणिज्य आणि उद्योग मंत्रीप्रतापराव जाधव - केंद्रीय राज्यमंत्री (स्वतंत्र प्रभार), आयुष मंत्रालय, आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयरामदास आठवले - केंद्रीय राज्यमंत्री, सामाजिक न्याय आणि सक्षमीकरण मंत्रालयरक्षा खडसे - केंद्रीय राज्यमंत्री युवा व्यवहार आणि क्रीडा मंत्रालयमुरलीधर मोहोळ - केंद्रीय राज्यमंत्री सहकार मंत्रालय आणि नागरी विमान वाहतूक मंत्रालय

यंदाच्या लोकसभा निवडणुकीत रक्षा खडसे या तिसऱ्यांदा रावेर मतदारसंघातून खासदार म्हणून निवडून आल्यात तर पुण्यातून मुरलीधर मोहोळ हे पहिल्यांदा खासदार बनले आणि त्यांना मंत्रि‍पदाची लॉटरी लागली आहे. सहकार खात्याची जबाबदारी कॅबिनेट मंत्री म्हणून अमित शाह यांच्याकडे आहे. त्यात मोहोळ यांच्यावर या खात्याच्या राज्यमंत्रिपदाची जबाबदारी देण्यात आली आहे. महाराष्ट्रात सहकार चळवळ ही मोठ्या प्रमाणात असून विशेषत: पश्चिम महाराष्ट्रात सहकाराचं मोठं वर्चस्व आहे. त्यामुळे मोहोळ यांना भाजपाकडून ही मोठी जबाबदारी मिळाल्याचं दिसून येते.  दरम्यान, एनडीए सरकारच्या मंत्रिमंडळात एकूण कॅबिनेट मंत्र्यांपैकी २५ भाजपाचे आणि ५ इतर घटक पक्षांचे आहेत. तर स्वतंत्र प्रभार असणारे ५ राज्यमंत्री आहेत. ज्यात ३ भाजपा, जयंत चौधरी यांच्या रुपाने एक आरएलडी आणि प्रतापराव जाधव यांच्या रुपाने एक शिवसेना यांचा समावेश आहे.  

टॅग्स :Narendra Modiनरेंद्र मोदीmurlidhar moholमुरलीधर मोहोळraksha khadseरक्षा खडसेRamdas Athawaleरामदास आठवलेPrataprao Jadhavप्रतावराव जाधव