शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतीय संगीतविश्वाचा स्वर हरपला! 'महाराष्ट्र भूषण' ज्येष्ठ गायिका आशा भोसले काळाच्या पडद्याआड
2
शांतता चर्चा फिस्कटल्याने डोनाल्ड ट्रम्प चिडले; आता इराणची खैर नाही, घेराव टाकण्याची दिली धमकी
3
NCB ची मोठी कारवाई! गांजा तस्करी रॅकेटचा पर्दाफाश; २१० किलो गांजा जप्त, चौघांना अटक
4
“आशाजी, लवकरात लवकर बऱ्या व्हा”; पंतप्रधान मोदींकडून तब्येतीची विचारपूस अन् केली प्रार्थना
5
अमेरिका-इराण चर्चा फिस्कटली; काय होत्या अमेरिकेच्या प्रमुख मागण्या? आता पाकिस्ताननं दोघांकडे केली नवी मागणी
6
डॉक्टर, मला मृत्यू हवाय..., लिविंग विल हा पर्याय किती उपयुक्त?
7
Lakshya Mishra : Video - हॉस्टेलमध्ये लेकाचा गूढ मृत्यू; खिडकी पाहताच वडील म्हणाले, "माझ्या मुलाची हत्या झालीय"
8
सुविधा देताना रेल्वेचे 'सावत्र' प्रेम!; मध्य-पश्चिम रेल्वेत दुजाभाव होतोय, प्रवाशांची भावना
9
ट्रम्प यांना चैन पडेना, इराण चर्चेची प्रत्येक अपडेट घेतली; व्हान्स यांना हॉटलाइनवर फोनाफोनी!
10
IPL 2026: सुरुवात धमाकेदार, पण 'वैभव'शाली प्रवासाचा दीर्घ पल्ला शिल्लक
11
पाणी हेच पहिले औषध... पण किती आणि केव्हा प्यावे?
12
"अमेरिकेच्या अवास्तव मागण्या...!" इराणने अमेरिकेवर फोडलं शांतता चर्चा फिसकटण्याचं खापर; व्हॉन्स म्हणाले...
13
Ashok Kharat : औषधे आणि केबिनमधील ठसे; भोंदू अशोक खरातच्या कार्यालयाची पथकाकडून पुन्हा झडती
14
Manav Shah : Video-"एकटेपणा, जेलसारखं वाटायचं"; ४० लाखांचं पॅकेज सोडून भारतात परतला तरुण, काय घडलं?
15
खळबळजनक! अंगणवाडीत मुलांनी खाल्लं उंदीर मारण्याचं औषध, ५ जणांची प्रकृती बिघडली
16
पुन्हा युद्ध भडकणार? अमेरिका-इराण यांच्यात तोडगा नाहीच; पुढे काय होणार? जगाचे लक्ष लागले!
17
काळाचा घाला! हायवेवर गाडी पंक्चर, टायर बदलताना ट्रकने चिरडलं; ५ जणांचा मृत्यू
18
परळ- सीएसएमटी रेल्वे मार्गासाठी स्वदेशी मिल भागातील चाळी पडणार, ७१४ बाधित कुटुंबांचे पुनर्वसन पूर्ण
19
महिला मतदारांचा वाढता टक्का; यंदाच्या निकालात ठरणार ‘गेमचेंजर’, आसाम, केरळ आणि पुद्दुचेरीत यंदा 'या' मुद्द्यावर महिलांनी केले मतदान
20
NIRDPR मध्ये जॉब मिळवण्याची संधी; जाणून घ्या पात्रता आणि अर्ज प्रक्रिया!
Daily Top 2Weekly Top 5

दिल्लीचेही तख्त जिंकतो महाराष्ट्र माझा! 'हे' नेते प्रचारासाठी राजधानीत तळ ठोकून होते

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 9, 2025 08:57 IST

भाजपने खोटी आश्वासने देण्यापेक्षा मौखिक प्रचारावर भर दिला होता, असेही गोपछडे यांनी सांगितले. 

नवी दिल्ली : दिल्ली विधानसभेच्या निवडणुकीत भाजपला मिळालेल्या विजयात महाराष्ट्राचा खारीचा वाटा उचलला असल्याची भावना राज्यसभेचे खासदार डॉ. अजित गोपछडे यांनी व्यक्त केली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह महाराष्ट्रातील अनेक नेते प्रचारासाठी दिल्लीत तळ ठोकून होते, हे येथे उल्लेखनीय.

‘दिल्लीचेही तख्त राखतो महाराष्ट्र माझा’ या गीताप्रमाणे महाराष्ट्राने दिल्ली विधानसभेच्या निवडणुकीत भाजपचा गड मिळवून दिला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय रस्ते व परिवहन मंत्री नितीन गडकरी, वाणिज्य मंत्री पीयूष गोयल, राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ आणि रक्षा खडसे यांनी वेगवेगळ्या मतदारसंघांत प्रचार केला होता.

दिल्लीचा निकाल म्हणजे भाजपच्या मायक्रो-मॅनेजमेंटची कमाल होय, असे मत खा. डॉ. अजित गोपछडे यांनी व्यक्त केले आहे. त्यांच्याकडे करोलबाग जिल्ह्याची जबाबदारी होती. दिल्लीची जनता आपच्या अलिबाबा आणि ४० चोरांच्या पक्षाला कंटाळली होती. त्यांना भाजपच्या रूपात पर्याय दिसत होता. भाजपने खोटी आश्वासने देण्यापेक्षा मौखिक प्रचारावर भर दिला होता, असेही गोपछडे यांनी सांगितले. 

या नेत्यांनी केला प्रचार 

गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत, केंद्रीय मंत्री श्रीपाद नाईक, आयुष खात्याचे मंत्री प्रतापराव जाधव, माजी अर्थ राज्यमंत्री डॉ. भागवत कराड, राज्यातून लोकसभा आणि राज्यसभेतील भाजपचे खासदार प्रचार करायला होते. यात उदयनराजे भोसले, अनुप धोत्रे, स्मिता वाघ, डॉ. हेमंत सावरा, राज्यसभेच्या खासदार डॉ. मेधा कुलकर्णी, शिवसेनेचे डॉ. श्रीकांत शिंदे, संदिपन भुमरे, श्रीरंग आप्पा बारणे, नरेश म्हस्के आदी नेत्यांनी दिल्लीच्या रणांगणात प्रचार केला.

२४१ खासदारांची ड्युटीराष्ट्रीय मराठा संघाचे आनंद रेखी यांच्यानुसार, दिल्लीत भाजपने पक्षाच्या मुख्यमंत्र्यांबरोबरच २४१ खासदारांची ड्युटी लावली होती. ५ तारखेपर्यंत दिल्लीतच थांबा, असे खासदारांना सांगण्यात आले होते.  

टॅग्स :BJPभाजपाAAPआपDelhi Assembly Election 2025दिल्ली निवडणूक 2025Devendra Fadnavisदेवेंद्र फडणवीस