शहरं
Join us  
Trending Stories
1
मुख्यमंत्री अतिशय उद्विग्न, मंत्र्यांना सज्जड दम; बेशिस्त खपवून घेणार नाही, २० मिनिटे खडेबोल
2
लाडकी बहीण योजनेत पुरुष कसे काय घुसले?: मुख्यमंत्री, ‘लोकमत’च्या वृत्ताचे मंत्रिमंडळ बैठकीत पडसाद
3
एकही चूक न करायच्या अटीवर कोकाटेंना अभय, मंत्रिपद टेम्पररी, दर १५ दिवसांनी आढावा: अजित पवार
4
‘ऑपरेशन सिंदूर’ थांबवा, असे जगातील कोणत्याही नेत्याने सांगितले नाही: पंतप्रधान नरेंद्र मोदी
5
स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुका टप्प्याटप्प्याने घेणार; आधी जिल्हा परिषद, नंतर मनपा होणार
6
ठाकरे बंधुंना सलामी दिली, प्रो-गोविंदा स्पर्धेतून बाहेर; जय जवान पथक व्यवस्थापकांचा आरोप
7
गृहराज्यमंत्री योगेश कदम यांच्याविरूद्ध अनिल परबांनी दिले पुरावे; CM फडणवीसांकडे सादर
8
आजी-माजी खासदार आमने-सामने; विचारेंना मानसोपचार तज्ज्ञांची गरज; तर म्हस्के ‘वाचाळ रत्न’!
9
गणेशोत्सवासाठी ST सज्ज; ५,२०० जादा बस उपलब्ध करून देण्याचे नियोजन सुरू, मुंबईतून ६०० बस
10
उंचीच्या सक्तीमुळे उडणार मंडळांची धांदल; दोन विसर्जनस्थळे गाठण्यासाठी कसरत
11
वसई-विरार पालिकेचे माजी आयुक्त ईडीच्या कचाट्यात; सोमवारी निरोपाचा सत्कार, मंगळवारी धाड
12
लोकलमध्ये बसल्यावर मिळते तिकीट; UTSचा गैरवापर, QR कोड सुविधा बंद करण्यासाठी रेल्वेला पत्र
13
AI, कॉम्प्युटर इंजिनीअरिंगच्या साडेचार हजार जागा वाढल्या; प्रवेशासाठी १ लाख ७६ हजार जागा
14
भर सभागृहात निशिकांत दुबे आणि वर्षा गायकवाड यांच्यात तू- तू मै मै!
15
भीक मागण्यासाठी पुण्यातून चिमुरडीचे अपहरण; तुळजापुरातील ५ जणांची टोळी गजाआड
16
नागपुरात चोरट्यांचा आतंक; दिवसाढवळ्या कारची काच फोडून २५ लाख पळवले!
17
२२ एप्रिलचा बदला २२ मिनिटांत घेतला, भारतीयांना अपेक्षित कारवाई केली- पंतप्रधान नरेंद्र मोदी
18
ऑपरेशन सिंदूरदरम्यान भारताने PoK परत का घेतला नाही? काँग्रेसच्या प्रश्नावर मोदींनी दिलं असं उत्तर  
19
१० मे रोजी युद्धविरामाचा निर्णय कुणाच्या सांगण्यावरून झाला? अखेर पंतप्रधान नरेंद्र मोदीचं लोकसभेत मोठं विधान
20
"बबिताजींसोबत माझं शूटिंग असतं तेव्हा..."; 'तारक मेहता' फेम जेठालालने सांगितली 'मन की बात'

भाजपाने 'भारता'चं नाव बदललं तर आम्ही कुठे जाऊन राहणार ? ममता बॅनर्जी संतापल्या

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 17, 2017 15:22 IST

ममता बॅनर्जी यांनी भाजपावर निशाणा साधत म्हटलं आहे की, 'भारतीय संस्कृती आणि वारसा संपवण्यासाठी भाजपाने आखलेला हा राजकीय अजेंडा आहे'. ममता बॅनर्जी यांनी भाजपा आमदार संगीत सोम यांनी ताजमहालसंबंधी केलेल्या वक्तव्याचा निषेध केला.

कोलकाता - पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री आणि तृणमूल कांग्रेसच्या अध्यक्षा ममता बॅनर्जी यांनीदेखील ताजमहालवरुन सुरु असलेल्या वादात उडी घेतली आहे. ममता बॅनर्जी यांनी भाजपावर निशाणा साधत म्हटलं आहे की, 'भारतीय संस्कृती आणि वारसा संपवण्यासाठी भाजपाने आखलेला हा राजकीय अजेंडा आहे'. ममता बॅनर्जी यांनी भाजपा आमदार संगीत सोम यांनी ताजमहालसंबंधी केलेल्या वक्तव्याचा निषेध केला. 'मुगलसराय स्थानकाचं नाव बदलून पंडित दिन दयाल उपाध्याय स्थानक करणा-या भाजपाने ताजमहालला का सोडलं ? त्याचं नाव का बदललं नाही ?' असा टोला ममता बॅनर्जी यांनी लगावला. यासोबतच जर भाजपाने देशाचं नाव बदललं तर आम्ही राहायचं कुठे ? असा उपहासात्मक सवालही त्यांनी विचारला. 

ममता बॅनर्जी यांच्या वक्तव्यावर सोशल मीडियावर वेगवेगळ्या प्रतिक्रिया पहायला मिळत आहेत. काही युझर्सनी ममता बॅनर्जी यांनी बांगलादेशला जाण्याचा सल्ला देऊन टाकला आहे. तर काहीजणांनी 'मग तुम्ही पश्चिम बंगालचं नाव का बदलत आहात ?' असा प्रश्न विचारला आहे. 

भाजपाचे आमदार संगीत सोम यांनी ताजमहालच्या इतिहासावर प्रश्नचिन्ह निर्माण करत नव्या वादाला तोंड फोडले. ते म्हणाले की, ज्या सम्राटाने आपल्या वडिलांना तुरुंगात बंद केले होते आणि हिंदुंना लक्ष्य केले होते त्या सम्राटाने हा ताजमहाल उभारला आहे. त्यामुळे मुगल सम्राटांची नावे मिटविण्यासाठी इतिहास नव्याने लिहिण्यात येईल.

इतिहास मात्र, नेमका याच्या उलट आहे. शाहजहां यांनी आपली पत्नी मुमताज यांच्या स्मरणार्थ ताजमहाल उभारला होता. शाहजहां यांचे पुत्र औरंगजेबाने त्यांच्या आयुष्याच्या अखेरच्या काळात शाहजहां यांना तुरुंगात बंद केले होते. पण आमदार सोम म्हणाले की, मुगल सम्राट बाबर, अकबर आणि औरंगजेब यांची नावे इतिहासातून हटविण्याचे काम सरकार करीत आहे. उत्तर प्रदेश सरकारने पर्यटन पुस्तकात ताजमहालचा समावेश केलेला नाही.

या पार्श्वभूमीवर सिसोली गावात ते म्हणाले की, महाराणा प्रताप आणि शिवाजी महाराज यांच्यासारख्या महापुरुषांबाबत शाळा, महाविद्यालयातून शिक्षण द्यायला हवे. 

ताजमहाल यापुढे पाहायचा नाही का?भाजपा आमदार संगीत सोम यांनी ताजमहालच्या इतिहासावर प्रश्नचिन्ह उपस्थित केल्यानंर एमआयएमचे असदुद्दीन ओवैसी यांनी सवाल केला आहे की, ताजमहाल पाहण्यासाठी जाऊ नका, असे आवाहन सरकार पर्यटकांना करणार आहे काय?, असा सवाल केला आहे. भाजपाच्या म्हणण्यानुसार विश्वासघातकी असलेल्या लोकांनी लाल किल्लाही बनविला आहे. या ठिकाणी झेंडावंदन करणे मोदी बंद करणार आहेत का? असा प्रश्नही ओवैसी यांनी विचारला.

संसद, राष्ट्रपती भवन, कुतूब मिनार, लाल किल्लाही गुलामीची निशाणी, मिटवून टाका - आझम खानसमाजवादी पक्षाचे नेते आझम खान यांनी वक्तव्यावर प्रतिक्रिया देताना, फक्त ताजमहालच का....संसद, राष्ट्रपती भवन, कुतूब मिनार, लाल किल्लादेखील गुलामीची निशाणी आहेत, त्या मिटवून टाका असं म्हटलं आहे. 'गुलामीच्या सर्व निशाण्या मिटवल्या पाहिजेत हे मी सुरुवातीपासूनच सांगत आलो आहे. फक्त ताजमहालच कशासाठी ? संसद, राष्ट्रपती भवन, कुतूब मिनार, लाल किल्ला का नाही ? या सगळ्याही गुलामीच्या निशाणी आहेत. जर या देशद्रोहींना बांधल्या आहेत तर मग त्यांना मिटवून टाकलं पाहिजे', असं आझम खान बोलले आहेत.  

टॅग्स :Mamata Banerjeeममता बॅनर्जीTaj Mahalताजमहाल