शहरं
Join us  
Trending Stories
1
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
2
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
3
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
4
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
5
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
6
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
7
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
8
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
9
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
10
IIT बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
11
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
12
Astro Tips: तुमच्या हाताची ५ बोटं आहेत ५ ग्रहांचे प्रतिनिधी; कोणत्या बोटात अंगठी घालणे अधिक लाभदायी?
13
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
14
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
15
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
16
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
17
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
18
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
19
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
20
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
Daily Top 2Weekly Top 5

जेथे संख्याबळ कमी, तेथूनच फुंकणार बिगुल; PM मोदी लोकसभा निवडणुकीचा प्रचार येथून करणार सुरू

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 2, 2024 07:56 IST

२०२४ ला सुरुवात होताच तीन महिन्यांनी होऊ घातलेल्या लोकसभा निवडणुकीसाठी तयारी सुरू झाली आहे.

संजय शर्मा -

नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यंदा लोकसभा निवडणुकीच्या प्रचाराची सुरुवात दक्षिण भारतातून करणार आहेत. २२ जानेवारीला अयोध्येत प्राणप्रतिष्ठा सोहळ्यापूर्वी पंतप्रधान काही दिवस मुक्काम करून जनतेला संदेश देणार आहेत. 

२०२४ ला सुरुवात होताच तीन महिन्यांनी होऊ घातलेल्या लोकसभा निवडणुकीसाठी तयारी सुरू झाली आहे. जागांचा ताळमेळ आणि नेत्याच्या नावावर विरोधी पक्ष इंडिया आघाडीत एकमत होऊ शकले नसताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लोकसभेच्या प्रत्येक जागेचे मूल्यमापन करून रणनीती तयार केली आहे. मोदी यांनी या महिन्यात तीन ते चार दिवस अयोध्या दौऱ्याचे नियोजन केले आहे. ३० डिसेंबरला पंतप्रधानांनी अयोध्येत रोड शो, सभा, रेल्वे स्टेशन, विमानतळाचे उद्घाटन आणि अनेक योजनांचा शुभारंभ केला होता. 

उत्तर भारताची चिंता नाही  - पंतप्रधान मोदी यांनी यंदा लोकसभा निवडणुकीच्या प्रचाराची सुरुवात दक्षिण भारतातून करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यांनी तमिळनाडू, केरळ, लक्षद्वीपला भेट देण्याची योजना आखली आहे. - पंतप्रधानांना उत्तर भारतातील राज्यांची फारशी चिंता नाही. या राज्यात २०१४ व २०१९ च्या दोन निवडणुकांमध्ये भारतीय जनता पक्षाला चांगल्या जागा मिळाल्या आहेत. २०२४ मध्येही आव्हान नाही. - गेल्यावेळी भाजपला दक्षिणेतून लोकसभेच्या ३० जागा मिळाल्या होत्या. तेलंगणात गतवेळी ४ जागा जिंकल्या होत्या. यंदा १० जागांचे लक्ष्य ठेवले आहे. 

दक्षिणेत भाजप करणार युती    ज्या राज्यांत भाजप एकट्याने निवडणूक जिंकण्याच्या स्थितीत नाही तेथे तो युती करू शकतो. तेलगू देसम पक्ष अद्याप इंडिया आघाडीत सामील झालेला नाही. टीडीपीसोबत आघाडी झाल्यास तेलंगणा आणि आंध्र प्रदेश या दोन्ही राज्यांत भाजपला फायदा होईल. तमिळनाडूमध्ये अण्णा द्रमुकसोबत पुन्हा एकदा बोलणी सुरू आहे.

 

टॅग्स :Narendra Modiनरेंद्र मोदीlok sabhaलोकसभाElectionनिवडणूक