मुंबई : विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर शिवसेना-भाजपा प्रणीत महायुती आणि काँग्रेस-राष्ट्रवादी प्रणीत आघाडीमधील जागावाटपाचा तिढा प्रत्यक्षरीत्या सुटत नसला तरी व्हॉट्सअँप युर्जसनी मात्र एका गमतीदार मेसेजद्वारे अप्रत्यक्षरीत्या जागावाटपाचा तिढा सोडविण्याची कमाल केली आहे. धमाल उडवून देणारा हा मेसेज सध्या वेगाने व्हायरल होत आहे.विधानसभा निवडणुकीच्या उमेदवारी अर्जांवर सध्या पितृपक्षाचे सावट असल्याने कोणताही उमेदवार अर्ज भरण्यास धजावत नसल्याचे चित्र आहे. तरीही मुंबईच्या उपनगर जिल्हाधिकारी कार्यालयात अणुशक्तीनगर आणि विलेपार्ले या विधानसभा मतदारसंघातील दोन अपक्ष उमेदवारांनी पितृपक्षाला न जुमानता उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत; तर दुसरीकडे आघाडीपेक्षा महायुतीमधील जागावाटपाचा तिढा दिवसेंदिवस वाढत चालला आहे. याच पार्श्वभूमीवर व्हॉट्सअँप युर्जसनी मात्र एका गमतीदार मेसेजद्वारे जागावाटपाचा तिढा सोडविण्याची कमाल केली आहे. ऐन रविवारचा सुटीचा दिवस साधत टेक्नोसॅव्ही तरुणाईने हा गमतीदार मेसेज व्हॉट्सअँपवर वार्याच्या वेगाने पसरविला असून, राजकीय पक्षांमधील जागावाटपाचा तिढा न सुटेपर्यंत हा मेसेज गंमत म्हणून घेण्यातच हीत आहे. (प्रतिनिधी) असा आहे मेसेज.. ब्रेकिंग न्यूज..जागावाटपाचा तिढा न सुटल्याने निवडणुका रद्द..!!! पाच वर्षांमधीलएक वर्ष काँग्रेस एक वर्ष राष्ट्रवादीएक वर्ष भाजपाएक वर्ष शिवसेना उर्वरित एक वर्ष महायुतीतील घटक पक्षांना (आरपीआय, स्वाभिमानी, शिवसंग्राम व आरएसपी) वाटून देण्यात येत आहे.राज ठाकरे यांना राज्यपाल करण्याचे ठरले आहे. या पक्षांचा मुख्यमंत्री राहणार आहे.
जागावाटपाचा तिढा व्हॉट्सअँपवर सुटतो तेव्हा..
By admin | Updated: September 22, 2014 04:47 IST