शहरं
Join us  
Trending Stories
1
“बारामती पोटनिवडणुकीत पाठिंबा द्या”; सुनेत्रा पवार यांचा उद्धव ठाकरेंना फोन, घडामोडींना वेग
2
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अधीर रंजन चौधरी यांच्यावर हल्ला, बंगालमध्ये काँग्रेस-तृणमूलचे कार्यकर्ते भिडले  
3
खळबळजनक!!! २०० किलो बनावट पद्धतीने पिकवलेले आंबे जप्त; श्वसनाच्या आजारांचा होता धोका
4
Gold-Silver Price Fall: खुशखबर! सोनं-चांदी झाली स्वस्त; खरेदी करणाऱ्यांसाठी 'गोल्डन चान्स'
5
दोन लढाऊ विमाने पाडली, २ चॉपर उद्ध्वस्त, पायलट बेपत्ता, २४ तासांत इराणचा अमेरिकेला जबर दणका
6
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
7
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
8
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
9
Tarot Card: अंकशास्त्र अन् टॅरोची युती: एप्रिलचा दुसरा आठवडा तुमच्या मुलांकासाठी काय घेऊन येतोय? वाचा!
10
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
11
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
12
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
13
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
14
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
15
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
16
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
17
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
18
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
19
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
20
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
Daily Top 2Weekly Top 5

पॅराडाइज पेपर्समध्ये नाव आल्यानंतर भाजपा खासदाने कागदावर लिहून दिली प्रतिक्रिया, धारण केलं मौनव्रत

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 6, 2017 14:31 IST

पॅराडाइज पेपर्समध्ये नाव आल्यानंतर बिहारमधील भाजपाचे राज्यसभा खासदार रविंद्र किशोर सिन्हा यांनी कागदावर लिहून आपली प्रतिक्रिया देत, आपलं मौनव्रत असल्याचं सांगितलं आहे.

नवी दिल्ली - पॅराडाइज पेपर्समध्ये नाव आल्यानंतर बिहारमधील भाजपाचे राज्यसभा खासदार रविंद्र किशोर सिन्हा यांनी कागदावर लिहून आपली प्रतिक्रिया देत, आपलं मौनव्रत असल्याचं सांगितलं आहे. एएनआयच्या रिपोर्टरने जेव्हा रविंद्र किशोर सिन्हा यांच्याकडून प्रतिक्रिया मागितली, तेव्हा सिन्हा यांनी रिपोर्टरला इशारा करत पेन मागितलं आणि कागदावर लिहिलं की, 'सात दिवसांसाठी मौनव्रत आहे'. पनामा पेपर्सप्रमाणे लीक झालेल्या पॅराडाइज पेपर्समध्ये भाजपाचे राज्यसभा खासदार रविंद्र किशोर सिन्हा यांचं नाव आहे. 

सिन्हा 2014 मध्ये बिहारचे राज्यसभा खासदार म्हणून निवडले गेले. सर्वात श्रीमंत खासदारांमध्ये सिन्हा यांचा समावेश आहे. सिन्हा एक माजी पत्रकार आहे. त्यांनी सेक्युरिटी अॅण्ड इंटेनिजन्स सर्व्हिसेस नावाने एक खासगी सेक्युरिटी कंपनीची (एसआयएस) स्थापना केली आहे. सिन्हा एसआयएस ग्रुपचे प्रमुख आहेत. सिन्हा यांच्या कंपनीचे संबंध आंतरराष्ट्रीय कंपन्यांशीही आहेत. माल्टाच्या नोंदणी विभागातील कागदपत्रांनुसार, एसआयएस एशिया पॅसिफिक होल्डिंग्स लिमिटेड (एसएपीएचएल) 2008 रोजी माल्टामध्ये रजिस्टर झाली आहे. ही एसआयएसची सहकारी कंपनी आहे. रविंद्र किशोर सिन्हा या कंपनीचे छोटेसे शेअरहोल्डर आहेत, तर त्यांची पत्नी रिटा किशोर सिन्हा एसएपीएचएल कंपनीच्या संचालिका आहेत. 

 

पॅराडाइज पेपर्स प्रकरण -इंडियन एक्सप्रेसच्या वृत्तानुसार, 96 नामांकित माध्यम समूहांनी मिळून 'पॅराडाइज पेपर्स'चा खुलासा करण्यात महत्त्वपूर्ण कामगिरी बजावली आहे. पॅराडाइज पेपर्समध्ये 1.34 कोटी दस्तऐवजांचा समावेश आहे. या खुलाशाद्वारे बनावट कंपन्यांबद्दल माहिती समोर आली आहे, ज्याद्वारे जगभरातील श्रीमंत आणि सामर्थ्यशाली मंडळी आपला पैसा परदेशात पाठवण्यासाठी वापर करत होते.  'पॅराडाइज पेपर्स'मध्ये भारतातील 714 जणांचा समावेश आहे.  पॅराडाइज पेपर्स लीकमध्ये पनामाप्रमाणे कित्येक भारतीय राजकीय नेते, अभिनेते आणि व्यावसायिकांच्याही नावाचा समावेश असल्याची धक्कादायक माहिती उघड झाली आहे. 

तर, यादीमध्ये जगभरातील एकूण 180 देशांच्या नावाचा समावेश आहे. यामध्ये भारत 19व्या क्रमांकावर असल्याची माहिती समोर आली आहे. बर्म्युडामधील 'अॅपलबाय' या कायदेशीर सेवा पुरवणाऱ्या कंपनीची सर्वाधिक कागदपत्रं उघड करण्यात आली आहेत. 

 जागतिक पातळीवर अमेरिकेतील  डोनाल्ड ट्रम्प प्रशासनातील उद्योग मंत्रालयाचे सचिव विलबर रॉस, कॅनडाचे पंतप्रधान जस्टीन टुडो यांच्यासाठी निधी संकलन करणाऱ्यांचे नावही या यादीत आहे. याशिवाय ट्विटर आणि फेसबुकमध्ये रशियातील कंपन्यांची गुंतवणूक केल्याचा उल्लेखही या पेपर्समध्ये आहे.

या भारतीयांच्या नावाचा आहे समावेश-नागरी हवाई राज्यमंत्री जयंत सिन्हा, बॉलिवूड अभिनेते अमिताभ बच्चन, विजय माल्या, नीरा राडिया, संजय दत्तची पत्नी मान्यता दत्त यांच्यासारख्या ख्यातनाम मंडळींचा यात समावेश आहे. अमिताभ बच्चन यांचे बर्म्युडामधील एका कंपनीत समभाग असल्याचा धक्कादायक खुलासाही झाला आहे.

टॅग्स :Paradise Papersपॅराडाइज पेपर्स