शहरं
Join us  
Trending Stories
1
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
2
आयआयटी बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
3
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
4
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
5
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
6
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
7
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
8
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
9
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
10
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
11
सोने-चांदीवरील आयात शुल्कात मोठी कपात! दागिन्यांचे दर उतरणार? तोळ्यामागे ११,७०० रुपयांचा दिलासा
12
शेतकरी ते उद्योजक! मुद्रा कर्जाच्या मदतीने उभा करा स्वतःचा व्यवसाय; जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
13
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
14
Divya Singh : अभूतपूर्व! कडाक्याची थंडी, खांद्यावर सायकल; माउंट एव्हरेस्ट बेस कॅम्प गाठून दिव्या सिंहने रचला इतिहास
15
लोकप्रिय मराठी अभिनेत्रीने दुसऱ्यांदा बांधली लग्नगाठ, इंडस्ट्रीतलाच आहे नवरा; ओळखलंत का?
16
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
17
अखेर ट्रायम्फने ३५० सीसीची मोटरसायकल लाँच केली! जीएसटीचा फायदा अन् किंमत पाहून म्हणाल...
18
"काळजी करू नका, एकाही कार्यकर्त्याला वाऱ्यावर सोडणार नाही, दादांचा जनता दरबार..."; सुनेत्रा पवार यांचा शब्द
19
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
20
तरुणीचा 'शोले' स्टाईल ड्रामा! असं काय घडलं की मोबाईल टॉवरवर चढून तरुणीने घरच्यांना दिली धमकी?
Daily Top 2Weekly Top 5

गहू- तांदूळ महागणार! देशातील धान्याचा साठा पाच वर्षातील नीचांकी पातळीवर, वाचा सविस्तर

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 14, 2022 15:09 IST

देशातील सरकारी गोदामांमधील अन्नधान्याचा साठा गेल्या पाच वर्षांतील नीचांकी पातळीवर आहे. त्यामुळे अनुदानावर अन्नधान्य उपलब्ध करून देणाऱ्या सरकारी यंत्रणेवर येत्या काही दिवसांत ताण येणार आहे.

नवी दिल्ली : देशातील सरकारी गोदामांमधील अन्नधान्याचा साठा गेल्या पाच वर्षांतील नीचांकी पातळीवर आहे. त्यामुळे अनुदानावर अन्नधान्य उपलब्ध करून देणाऱ्या सरकारी यंत्रणेवर येत्या काही दिवसांत ताण येणार आहे. शेतकर्‍यांनी अजुनही गव्हाची पेरणी केलेली नाही आणि पुढील पीक १५ मार्चनंतरच बाजारात येण्याची अपेक्षा आहे. 

रोजच्या वापरातील वस्तू, आणि भाजीपालांचे दर गगनाला भिडले आहेत. आता भारतीय अन्न महामंडळच्या अहवालानुसार, या हंगामातील हिवाळ्यात पेरणी केलेले गहू आणि तांदूळ दोन्ही पिके खराब झाली आहेत. त्यामुळे किंमती २२ महिन्यांच्या उच्चांकीवर पोहोचल्या आहेत.

 

कोट्यवधीची रोकड, सोने, दागदागिने, अधिकाऱ्यांच्या घरावरील EDच्या धाडीत सापडले घबाड

१ ऑक्टोबर रोजी सरकारी गोदामांमध्ये गहू आणि तांदळाचा एकूण साठा ५११.४ लाख टन होता. वर्षभरापूर्वी हा आकडा ८१६ लाख टन होता. देशात गहू आणि तांदळाच्या किमती वाढू नयेत आणि देशांतर्गत बाजारपेठेत त्यांचा पुरेसा पुरवठा व्हावा यासाठीच सरकारने गहू आणि तांदळाच्या निर्यातीवर बंदी घातली आहे.

१ ऑक्टोबर रोजी सरकारी गोदामांमध्ये २२७.५ लाख टन गव्हाचा साठा होता. गेल्या ६ वर्षातील गव्हाच्या साठ्याची ही सर्वात कमी पातळी आहे. तर तांदळाचा साठा आवश्यक्तेपेक्षा जवळपास २.८ पट जास्त होता. सप्टेंबर २०२२ अन्नधान्य उत्पादनांचा महागाई दर ११.५३ टक्के होता. 

त्यामुळे आता पुन्हा गव्हाचे दर वाढण्याची शक्यता वर्तवली जात आहे. याचा परिणाम सर्वसामान्यांवर बसणार आहे. गव्हाच्या आट्याचे दर वाढण्याची शक्यता आहे. सप्टेंबर महिन्यातील महागाईची आकडेवारी पाहिल्यास गहू आणि पिठाचा वार्षिक किरकोळ महागाई दर १७.४१ टक्क्यांवर गेल्याचे दिसते. गेल्या आठ महिन्यांतील ही उच्चांकी आहे. 

टॅग्स :Inflationमहागाई