शहरं
Join us  
Trending Stories
1
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
2
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
3
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
4
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
5
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
6
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
7
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
8
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
9
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
10
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
11
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
12
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
13
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
14
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
15
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
16
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
17
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
18
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
19
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
20
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
Daily Top 2Weekly Top 5

Jammu & Kashmir: 370 कलम रद्द करण्याने काय बदल होणार?

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 6, 2019 06:30 IST

कलम ३७० रद्द केल्यानं जम्मू-काश्मीरमधील परिस्थितीत मोठे बदल पाहायला मिळतील.

नवी दिल्ली : केंद्र सरकारने जम्मू काश्मीरला ३७० कलम रद्द करत विभाजन करण्याचा प्रस्ताव आज राज्यसभेत मांडला होता. यावर राज्यसभेत आज चर्चा करण्यात आली. विरोधकांनी काश्मीरच्या विभाजनावर मत विभागणीची मागणी केल्याने राज्यसभेत चिठ्ठीद्वारे मतदान घेण्यात आले. 

तत्पूर्वी अमित शहा यांनी राज्यसभेत विरोधकांच्या प्रश्नांना उत्तरे दिली. जम्मू-काश्मीरचे कलम ३७० रद्द करण्याच्या प्रस्तावावर भाजपा व्होटबँकेचे, जातीयवादाचे राजकारण करत असल्याची टीका करण्यात येत आहे. मात्र, काश्मीरमध्ये केवळ मुस्लिमच राहतात का? तुम्हाला काय म्हणायचे आहे. काश्मीरमध्ये मुस्लिम, हिंदू, शीख, जैन, बुद्धिस्टही राहतात. जर ३७० कलम चांगले असेल तर ते सर्वांसाठी चांगले आणि जर वाईट असेल तर सर्वांसाठी वाईटच असणार असल्याचे अमित शहा यांनी सांगितले. कलम ३७० रद्द केल्याने जम्मू-काश्मीरमधील परिस्थितीत मोठे बदल पाहायला मिळतील.

आधी-(१) जम्मू-काश्मीरला मिळाले होते विशेष अधिकार.(२) दुहेरी नागरिकत्व.(३) जम्मू-काश्मीरचा स्वतंत्र ध्वज.(४) आर्थिक आणीबाणीविषयक ३६० कलम लागू नव्हते.(५) काश्मीरातील हिंदू, शीख यासारख्या अल्पसंख्याकांना आरक्षण लागू नव्हते.(६) देशातल्या इतर राज्यांतील नागरिकांना काश्मीरमध्ये जमीन किंवा मालमत्ता खरेदी करण्याचा अधिकार नव्हता.(७) माहिती अधिकार कायदा लागू नव्हता.(८) विधानसभेची मुदत ६ वर्षांची होती.(९) जम्मू-काश्मीरमधील महिलेने इतर राज्यांतील किंवा विदेशातील व्यक्तीशी लग्न केले तर तिचे काश्मीर राज्याचे नागरिकत्व संपुष्टात येत असे.(१०) पंचायतींना काहीही अधिकार नव्हते.(११) शिक्षणाचा अधिकार लागू नव्हता.आता-(१) विशेष अधिकार संपुष्टात आले.(२) एकेरी नागरिकत्व.(३) तिरंगा हाच एकमेव राष्ट्रध्वज.(४) आता ते कलम ३६० लागू होणार.(५) काश्मिरातील अल्पसंख्याकांना १६ टक्के आरक्षण लागू होणार.(६) इतर राज्यांतील नागरिकही जम्मू-काश्मीरमध्ये जमीन, मालमत्ता खरेदी करू शकतील.(७) माहिती अधिकार कायदा लागू होणार.(८) जम्मू-काश्मीर विधानसभेची मुदत ५ वर्षांची होणार.(९) त्या महिलेने इतर राज्यातील किंवा विदेशातील व्यक्तीशी विवाह केला तरी तिचे सर्व हक्क शाबूत राहातील तसेच ती भारतीय नागरिक असेल.(१०) मिळणार अन्य राज्यांतील पंचायतींसारखेच अधिकार(११) काश्मीरमधील मुलांना शिक्षण अधिकाराचा फायदा.

टॅग्स :Jammu Kashmirजम्मू-काश्मीरArticle 370कलम 370