शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2026 : राजस्थान रॉयल्सचा 'वैभवशाली' विजय; 'ध्रुवतारा'ही चमकला! रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा पहिला पराभव
2
Video: दांड्याने मारले, कपडे फाडले; खाली ओढून लाथांनी तुडवले; ठाण्यात बसचालकाला अमानुष मारहाण
3
२६ चेंडू अन् ४१ मिनिटांचा ब्लॉकबस्टर शो! RCB चा पिक्चर पडला; वैभव सूर्यवंशी Orange Cap सह हिरो ठरला
4
नारायण राणे म्हणजे शून्यातून विश्व निर्माण करणारे नेतृत्व; मुख्यमंत्री फडणवीसांकडून कार्याचा गौरव
5
वैभव सूर्यवंशीचा आणखी एक धमाका! भुवी-जोश हेजलवूडची धुलाई; फक्त १५ चेंडूत ठोकली फिफ्टी
6
Tiger Attack Gondia: घराबाहेर खेळत असतानाच वाघाने घातली झडप, सहा वर्षांचा प्रज्वल ठार
7
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
8
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
9
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
10
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
11
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
12
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
13
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
14
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
15
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
16
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
17
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
18
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
19
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
20
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
Daily Top 2Weekly Top 5

‘माध्यम-मांजरे’ ताटाखाली असतील तर त्यांचा उपयोग काय?

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 1, 2020 02:17 IST

इंडिया टीव्ही या वाहिनीचे चालक रजत शर्मा यांनी मला अटलबिहारी वाजपेयी यांच्याविषयीची एक आठवण सांगितली होती. ती सगळ्यांनी जाणून घ्यावी अशीच आहे; म्हणून माझ्या मित्राचा हवाला घेऊन ती सांगतो

पवन वर्मा ।इंडिया टीव्ही या वाहिनीचे चालक रजत शर्मा यांनी मला अटलबिहारी वाजपेयी यांच्याविषयीची एक आठवण सांगितली होती. ती सगळ्यांनी जाणून घ्यावी अशीच आहे; म्हणून माझ्या मित्राचा हवाला घेऊन ती सांगतो. रजत सूत्रसंचालन करत असलेला ‘आपकी अदालत’ हा कार्यक्रम लोकप्रिय आहे. विविध क्षेत्रांतील नामवंत व्यक्तींना या कार्यक्रमात बोलावले जाते. रजत त्यांची चांगलीच उलटतपासणी करतात. पंतप्रधान असताना वाजपेयी यांनी या कार्यक्रमासाठी मुलाखत देण्याचे मान्य केले. संवाद उत्तम रंगला.. म्हणजे, रजत यांना तसे वाटले ! पण निघताना अटलजी म्हणाले, ‘मी तुमच्यावर नाराज आहे. माझ्याघरी येऊन मला भेटा!’

रजत यांना थोडी भीतीच वाटत होती.. आपण प्रश्न विचारताना जरा जास्तच आक्रमक झालो का? आपल्या बोलण्यातले काही तरी अटलजींना खटकले असावे का?- मग रजत यांनी रीतसर अटलजींची भेट मागितली, ती त्यांना मिळालीही. भेटल्यावर अटलजी नेहमीप्रमाणे प्रसन्न हसले आणि करड्या स्वरात म्हणाले, ‘आपने मुझे बहोत आसानीसे छोड दिया, तुमच्या कार्यक्रमात कठीण प्रश्न विचारलेच नाहीत, हे काही तुम्ही बरे केले नाही!’- या गोष्टीचे तात्पर्य सध्याचा सत्तारूढ पक्ष आणि माध्यमातील काहीना अगदी अचूक लागू पडते. माध्यमांशी अधिक खुला संवाद करू पाहणारे नेते, संभाषणाच्या ओघात उत्स्फूर्त, अडचणीचे प्रश्न आले तर त्यांची विश्वासार्हता गमावतात असे मला मुळीच वाटत नाही. खरे तर अशा रोखठोक संवादातून त्यांची विश्वासार्हता वाढते. माध्यमांनीही सत्तारूढ पक्षाच्या भूमिकेची री आंधळेपणाने ओढली नाही, तर त्यांची विश्वासार्हता कमी होण्याऐवजी उलट वाढतेच! भाजपचे माध्यम समन्वयक हे साधे सत्य समजून का घेत नाहीत? याचे मला नेहमी आश्चर्य वाटते. बीबीसीवर म्हणे एक नीतिवचन ऐकवले जाते. त्याचा भावार्थ असा : तुम्हाला तुमच्या मोठ्या असत्यावर पांघरूण घालायचे असेल तर तुमची छोटी सत्ये लपवू नका!

अनेक दुबळ्या वाहिन्या सतत सत्तारूढ पक्षाची तळी उचलून धरत आहेत. हे इतके सातत्याने घडते आहे, की या वाहिन्या जे सांगतात त्यावरचा लोकांचा विश्वासही उडू लागला आहे, हे भाजपला कळत कसे नाही? विरोधी मतप्रवाहात आपला मुद्दा पुढे नेण्याचे कौशल्य हुशार माध्यम व्यवस्थापनात असावे लागते. आरडाओरडा करून विरोधाचा सूर दडपणे ही तात्पुरती पळवाट असली, तरी त्यात दीर्घकालीन फायदा नसतो.दूरदर्शनवर कोणी विश्वास ठेवायचे नाही हे आधीच्या पिढीतील लोकांना आठवत असेल. ‘खरी बातमी’ हवी असेल तर लोक त्याकाळात बीबीसी लावायचे. पण दूरदर्शन सरकारी प्रसारण माध्यम; ते सरकारची री ओढण्याव्यतिरिक्त दुसरे काय करू शकणार होते? आपल्या बिनसरकारी माध्यमांनी स्वत:हून आपल्या पायात हा खोडा अडकवून का घ्यावा? खरे पाहाता सतत ‘स्वगत’ बोलत राहाण्याची सवय सोडून खुद्द पंतप्रधानांनी स्वतंत्र माध्यमांंना सामोरे जात लोकांशी खुला संवाद साधला तर तो त्यांच्याच पथ्यावर पडेल.‘सुदर्शन टीव्ही’च्या ‘बिनधास्त बोल’ कार्यक्रमाचे उदाहरण घ्या. सनदी परीक्षांमध्ये मुस्लीम उमेदवार अधिक संख्येने उत्तीर्ण होऊ लागले यात या वाहिनीला ‘जिहादी कट’ दिसला. वाहिनीच्या द्वेषपूर्ण, दुखावणाऱ्या, खोट्या निष्कर्षांना सर्वोच्च न्यायालयाने फटकारले ते योग्यच होते. विचारस्वातंत्र्य अमर्याद नाही तसेच एकतर्फीही नाही. लोकशाहीत सरकारच्या दृष्टिकोनाची तपासणी करणे, असहमती दर्शवणे, विरोधी मत नोंदवण्याला स्थान असलेच पाहिजे. प्रश्न उपस्थित करण्याचे, खुल्या चर्चेचे माध्यमे हे महत्त्वाचे साधन आहे.केवळ पक्षाची तळी उचलून धरणाºया माध्यमांनाच आश्रय, प्रोत्साहन देण्याकडे असलेला भाजपचा ओढा आता नेमका उलट परिणाम घडवू लागला आहे. हे धोरण आता भाजपच्याच अंगलट येऊ लागले आहे.सत्य सांगणाºयावरच लोकांचा विश्वास उरला नसेल तर त्याच्या सत्याच्याही चिंधड्या उडवल्या जातात. माध्यमे हाताळणाºयासाठी इतकी वाईट अवस्था दुसरी नाही. अटलबिहारी वाजपेयी यांनाही आपल्या सरकारची माध्यमांमध्ये उजळ प्रतिमा असावी, असेच वाटत असणार यात शंका नाही. सर्व नेते, सरकारे यांना तेच हवे असते. पण जे बोलले/सांगितले जात आहे, ते ‘विश्वासार्ह’ नसेल तर त्या ‘उजळ प्रतिमे’ला फारसा अर्थ नसतो हे वाजपेयी पक्के जाणून होते. म्हणून तर वाजपेयींना ‘अवघड प्रश्नां’ची अपेक्षा होती. भाजपने यातून धडा घेतला पाहिजे.(लेखक राजकीय विषयांचे विश्लेषक आहेत)

टॅग्स :Mediaमाध्यमेNarendra Modiनरेंद्र मोदी