शहरं
Join us  
Trending Stories
1
Manoj Jarange Patil Maratha Morcha Live: बस… आता थांबा, नामुष्की टाळायची असेल तर आंदोलन संपवा, सरकारला सहकार्य करा; जरांगेंना कुणाचा सल्ला?
2
Manoj Jarange: '...तोपर्यंत मुंबई सोडणार नाही', नोटीसनंतर मनोज जरांगेंचा मुख्यमंत्री फडणवीसांना इशारा
3
काय आहे शी जिनपिंग यांचा 'GGI फॉर्म्युला'?, अमेरिकेला थेट आव्हान; रशिया-भारताचा तात्काळ होकार
4
भारतानं रोखलं आमचं SCO सदस्यत्व! मुस्लीम देश भडकला; म्हणाला, 'पाकिस्तान...'
5
औषधांवर २०० टक्क्यांपर्यंत टॅरिफ लावण्याचा डोनाल्ड ट्रम्प यांचा प्लॅन; भारतावर किती होणार परिणाम?
6
सोन्याने गाठली विक्रमी पातळी! तुमच्या शहरात एक तोळ्याचा आजचा भाव काय? अचानक का आली तेजी?
7
४ शुभ योगात परिवर्तिनी एकादशी: तुळशीचा १ उपाय करा, पूर्ण पुण्य मिळवा; श्रीविष्णू कृपा करतील
8
MI च्या ताफ्यातून स्टार झालेल्या पोलार्डची शाहरुखच्या संघाकडून 'हिरोगिरी'! ८ चेंडूत ७ गगनचुंबी षटकार (VIDEO)
9
तुळजाभवानीच्या पुजारी मंडळावरून पेटला वाद, आजी-माजी पदाधिकारी आमने-सामने
10
आंदोलनात बेकायदेशीर कृत्ये, लवकरात लवकर मैदान रिकामं करा; मनोज जरांगेंना पाठवलेल्या पोलिसांच्या नोटीसमध्ये काय?
11
UAE चा कॅप्टन Muhammad Waseem नं साधला मोठा डाव! हिटमॅन रोहित शर्माचा वर्ल्ड रेकॉर्ड मोडला
12
भारत-रशिया मैत्री पाहून अमेरिका भडकली, ट्रम्प यांचे सल्लागार संतापले; म्हणाले, 'आमच्यासोबत...!'
13
Video: "ती काम करत नाही, पण मी...", मृणालने अनुष्कावर साधला निशाणा? सलमानचा 'सुलतान' नाकारल्याचा दावा
14
Parivartani Ekadashi 2025: ज्यांना आयुष्यात परिवर्तन घडवायचे आहे, त्यांनी 'असे' करा एकादशी व्रत!
15
अनंत चतुर्दशी २०२५: गणेशोत्सवाची सांगता; पाहा, मान्यता, २०२६ मध्ये कधी येणार गणपती बाप्पा?
16
Mitchell Starc T20I Retirement : आगामी टी-२० वर्ल्ड कप आधी स्टार गोलंदाजाने घेतला निवृत्तीचा निर्णय; जाणून घ्या त्यामागचं कारण
17
GST बैठकीच्या पार्श्वभूमीवर शेअर बाजारात तेजी; रिलायन्समध्ये सर्वाधिक वाढ तर 'हे' स्टॉक्स घसरले
18
अनवाणी चालत बाप्पाच्या दर्शनाला पोहोचला सलमान खान, पळत पळतच कारजवळ आला अन्...
19
Punjab Flood: अर्धा पंजाब पाण्यात! १३०० गावांना पुराचा वेढा, हजारो लोक बेघर; २९ जणांचा मृत्यू
20
Parivartani Ekadashi 2025: परिवर्तनी एकादशी; चातुर्मासाचा मध्यंतर, यादिवशी श्रीहरी श्रीविष्णूंची बदलतात कूस!

मंगळसूत्र घालावं का? प्रश्न विचारणा-या टिव्ही कार्यालयावर बॉम्बहल्ला !

By admin | Updated: March 12, 2015 16:25 IST

महिलांनी मंगळसूत्र घालायला हवं का? असा प्रश्न उपस्थित केल्यानं न्यूज चॅनेलच्या कार्यालयावर एका हिंदूवादी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी बॉम्बहल्ला केला आहे.

ऑनलाइन लोकमत चेन्नई, दि. १२ - हिंदू संस्कृतीत मंगळसूत्राला विशेष असं स्थान असताना महिलांनी मंगळसूत्र घालायला हवं का? असा प्रश्न उपस्थित करीत या विषयी एका न्यूज चॅनेलने चर्चा (डिबेट )केल्यानं न्यूज चॅनेलच्या कार्यालयावर एका हिंदूवादी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी गावठी बॉम्ब फेकल्याची घटना घडली आहे. चेन्नईतील तमीळ भाषेतील 'पुथीया थालाईमरई' असे न्यूज चॅनेलचे नाव असून या चॅनेलने जागतिक महिला दिनानिमित्त 'महिलांनी मंगळसूत्र घालावं का? याविषयी चर्चाचे आयोजन केले होते. मंगळसूत्र घालण्याविषयी प्रश्नचिन्ह उपस्थित केल्याने संतापलेल्या आयगनार सेनेच्या चार कार्यकर्त्यांनी बुधवारी मोटारसायकलवर येवून टिफिन बॉक्सच्या साहाय्याने गावठी बॉम्बद्वारे ऑफिसवर हल्ला केला. या हल्याची जबाबदारी या कार्यकर्त्यांनी स्वीकारली असून त्यांनी पोलिसांसमोर आत्मसर्मपणही केले आहे. पुथीया थालाईमरई या चॅनेलचे मुख्य कार्यकारी अधिकारी आरबीयू शाम कुमार यांनी माहिती देताना सांगितले की, साधारणत: ३.१५ वाजता दोन मोटारसायकलवर अज्ञात चार जण आले व त्यांनी बॉक्सेसमधून कार्यालयावर गावठी बॉम्ब फेकले. सुदैवाने या हल्ल्यात कोणीही जखमी झाले नाही. आमच्या टिव्हीवर 'थाली' आणि 'मंगळसूत्र' या दोन अशा चांगल्या विषयावर चर्चा करण्यात आली होती. परंतू या विषयाला आक्षेप घेत काही हिंदूवादी संघटनांनी कार्यालयावर हल्ला चढवला. या हल्याची तीवृता कमी असली तरी या घटनेचा आम्ही तीव्र शब्दांत निषेध नोंदवित असल्याचे शाम कुमार यांनी म्हटले आहे.