शहरं
Join us  
Trending Stories
1
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
4
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
5
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
6
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
7
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
8
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
9
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
10
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
11
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
12
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
13
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
14
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
15
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
16
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
17
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
18
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
19
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
20
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

कावेरी व्यवस्थापन मंडळ स्थापनेसाठी काय पावले उचलली?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 4, 2018 05:52 IST

तमिळनाडू, कर्नाटक, केरळ आणि पुडुचेरी यांच्यात कावेरी नदीच्या पाणी वाटपावर आम्ही दिलेल्या निवाड्याच्या अमलबजावणीसाठी कावेरी व्यवस्थापन मंडळ स्थापन करण्याबाबत काय पावले

नवी दिल्ली : तमिळनाडू, कर्नाटक, केरळ आणि पुडुचेरी यांच्यात कावेरी नदीच्या पाणी वाटपावर आम्ही दिलेल्या निवाड्याच्या अमलबजावणीसाठी कावेरी व्यवस्थापन मंडळ स्थापन करण्याबाबत काय पावले उचलली याची माहिती ८ मे रोजी आम्हाला द्यावी, असे सर्वोच्च न्यायालयाने गुरुवारी केंद्र सरकारला सांगितले.कर्नाटक विधानसभा निवडणुकीनंतर या विषयावर सुनावणी घ्यावी, कारण आराखडा योजना केंद्रीय मंत्रिमंडळासमोर संमतीसाठी ठेवायची आहे, असे केंद्र सरकारने न्यायालयाला मागील सुनावणीत सांगितले होते. त्यावर कावेरी व्यवस्थापन योजनेचा आराखडा तयार करून तीन मे रोजी सादर करावा, असे न्यायालयाने केंद्र सरकारला सांगितले होते.अ‍ॅटर्नी जनरल के. के. वेणुगोपाल यांनी सरन्यायाधीश दीपक मिस्रा यांच्या अध्यक्षतेखालील खंडपीठाला सांगितले की, पंतप्रधान नरेंद्र मोदी व त्यांचे मंत्रिमंडळातील सहकारी कर्नाटकात प्रचारात गुंतलेले असल्यामुळे केंद्रीय मंत्रिमंडळासमोर आराखडा संमतीसाठी सादर करता आलेला नाही. तमिळनाडूच्या वतीने वरिष्ठ वकील शेखर नाफडे यांनी बाजू मांडली. त्यांनी केंद्राच्या या मागणीला तीव्र आक्षेप घेतला. ते म्हणाले, हे म्हणजे संघराज्यवाद व कायद्याचे राज्य संपुष्टात आल्यासारखेच आहे. न्या़ डी. वाय. चंद्रचूड व ए. एम. खानविलकर यांचा खंडपीठाने प्रारंभी कर्नाटक सरकारला कावेरी नदीचे चार टीएमसी पाणी तमिळनाडूला आठ मेपर्यंत द्यावे, असे सांगितले होते. किती पाणी सोडले जाऊ शकते हे कळवा, असे म्हटले होते.