शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराण यांच्यात 45 दिवसांचा युद्धविराम? ट्रम्प यांच्या धमकीनंतर आलेल्या वृत्ताने सर्वच चकित; पडद्यामागे नेमकं घडतंय काय? 
2
सामान्य अमेरिकनही होरपळले...! ट्रम्प यांनी इराणवर नाही जगावर युद्ध लादले...
3
"निवडणूक लादली तर शप्पथ सांगतो की..."; बारामतीत सुनेत्रा पवारांसाठी सुनील तटकरेंचा ऐतिहासिक संकल्प
4
ओदिशा-झारखंड सीमेवर नक्षलवाद्यांनी घडवला स्फोट, एक जवान जखमी
5
इरानमध्ये अमेरिकेचे रेस्क्यू मिशन; पण मदतीला धावली इस्रायलची 'सायरेत मतकल'! कोण आहे ही सीक्रेट फोर्स?
6
डोनाल्ड ट्रम्प यांची जीभ घसरली आणि अमेरिकेत राजकीय भूकंप! राष्ट्राध्यक्षपद जाण्याची भीती; काय आहे तो '२५वा घटना दुरुस्ती' नियम?
7
इराणने अमेरिकेची एका दिवसात १० विमाने कशी पाडली? माजी CIA अधिकाऱ्याचा खळबळजनक दावा!
8
नोटांच्या बंडलवर लोळतोय डॉक्टर अफजल; किडनी रॅकेटमधील आरोपीचा धक्कादायक Video व्हायरल
9
रणबीर कपूरच्या 'रामायण'ची निर्मिती करणाऱ्या कंपनीच्या शेअर सुसाट! एका वर्षात २६२% परतावा
10
प्रसिद्ध टीव्ही अभिनेत्रीने उचललं टोकाचं पाऊल, आदल्या रात्रीच झालेला पतीसोबत वाद
11
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
12
Param Ashawar : ग्रामीण भागातील मुलींना नॅशनल फुटबॉल लीगमध्ये पोहोचवण्यासाठी कोचने घेतलं १० लाखांचं कर्ज
13
रिटायरमेंटनंतर दर महिना ५०००० रुपयांची पक्की व्यवस्था! सुरक्षित भविष्यासाठी अशा पद्धतीने करा 'स्मार्ट' गुंतवणूक
14
"होर्मुझच्या चाव्या हरवल्यात!" इराणचा ट्रम्प यांना खोचक टोला; अमेरिकेच्या अल्टिमेटमनंतर जागतिक व्यापारावर टांगती तलवार!
15
३५ दिवसांनी मुलाचे अवशेष मुंबईत आणले; अंत्यसंस्कारापूर्वी कुटुंबाची हायकोर्टात धाव, कारण काय?
16
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
17
लग्नानंतर १२ वर्षांनी शेजाऱ्याच्या प्रेमात पडली पत्नी; पती अडसर ठरत होता म्हणून रचला खळबळजनक कट!
18
इराणविरुद्धच्या युद्धादरम्यान व्हाईट हाऊस जवळ गोळीबार, ट्रम्पसुद्धा जवळच होते उपस्थित
19
कंपनी असावी तर अशी! कर्मचाऱ्याच्या निधनानंतरही १० वर्षांपर्यंत कुटुंबाला देते ५० टक्के सॅलरी, जाणून घ्या
20
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
Daily Top 2Weekly Top 5

खासगी अधिकारात इंटरनेट माहिती हटविण्याचा समावेश आहे काय?

By admin | Updated: May 2, 2016 01:50 IST

खासगीपणाच्या अधिकारात अप्रासंगिक माहिती इंटरनेटवरून हटविण्याचा समावेश आहे काय, अशी विचारणा दिल्ली उच्च न्यायालयाने केंद्र सरकार आणि गुगलला केली आहे.

नवी दिल्ली : खासगीपणाच्या अधिकारात अप्रासंगिक माहिती इंटरनेटवरून हटविण्याचा समावेश आहे काय, अशी विचारणा दिल्ली उच्च न्यायालयाने केंद्र सरकार आणि गुगलला केली आहे.न्या. मनमोहन यांनी एका अनिवासी भारतीयाच्या याचिकेवरून दूरसंचार आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालय, गुगल, गुगल इंडिया प्रायव्हेट लिमिटेड आणि ई-कानून सॉफ्टवेअर डेव्हलपमेंट प्रायव्हेट लिमिटेडला उत्तर सादर करण्यास सांगितले आहे. आपली पत्नी सामील असलेल्या परंतु आपण पक्षकार नसलेल्या एका फौजदारी प्रकरणातील संबंधित माहितीमधून आपल्याला वेगळे करण्यात यावे, अशी मागणी अर्जदाराने या याचिकेत केली आहे.माहितीत आपले नाव असल्याने त्याचा आपल्या रोजगाराच्या संधीवर प्रतिकूल परिणाम होत आहे. कारण कंपन्या संभावित कर्मचाऱ्याबद्दल सहसा इंटरनेटवरच सर्च करीत असतात आणि इंटरनेटवर आपले नाव टाकताच एक फौजदारी प्रकरण पुढे येत असल्याने आपणही त्या प्रकरणात सामील आहोत, असा समज होऊ शकतो, असे अर्जदाराचे म्हणणे आहे.‘गुगलसारखा डाटा नियंत्रक किंवा मध्यस्थांना अशाप्रकारची अप्रासंगिक माहिती हटविण्याची विनंती करण्यात आल्यास ती माहिती हटविणे आवश्यक आहे काय,’ असा प्रश्न या याचिकतून निर्माण झाला आहे. अर्जदाराने अ‍ॅड. रोहित मदन आणि अ‍ॅड. आकाश वाजपेयी यांच्या माध्यमातून ही याचिका दाखल केली होती. आपले नाव इंटरनेटवर सर्च केल्यावर आपली पत्नी आणि तिच्या आईचा सहभाग असलेले फौजदारी प्रकरण समोर येते, असे अर्जदाराने म्हटले आहे. अर्जदाराने प्रतिवादी नंबर चारसोबत(ई-कानून) संपर्क साधण्याचा प्रयत्न केला आणि २५ जानेवारी २०१६ रोजी पत्र पाठवून उपर्निदिष्ट निकाल हटविण्याची विनंती केली. कारण हा निकाल प्रतिवादी नंबर चारच्या वेबसाईटवरून हटविण्यात यावा, अशी अर्जदाराची इच्छा असल्याचे या याचिकेत म्हटले आहे.अर्जदाराने प्रतिवादी नंबर दोन आणि तीन (गुगल आणि गुगल इंडिया) यांच्याशीदेखील संपर्क साधला होता आणि सर्च परिणामाशी संबंधित युनिफॉर्म रिसोर्स लोकेटर (यूआरएल) हटविण्यासाठी एक ई-मेलही पाठविला होता, असे या याचिकेत स्पष्ट केले आहे. (वृत्तसंस्था)