शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
3
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
4
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
5
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
6
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
7
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
8
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
9
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
10
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
11
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
12
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
13
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
14
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
15
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
16
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
17
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
18
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
19
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
20
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
Daily Top 2Weekly Top 5

१२५ वर्षांच्या पद्मश्री स्वामी शिवानंद यांच्या दीर्घायुष्याचे रहस्य काय? अनेकांच्या मनात कुतहूल

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 23, 2022 06:42 IST

स्वामी शिवानंद यांची देशभरात चर्चा आहे. स्वत: माेदी त्यांच्यापुढे नतमस्तक झाले. त्यामुळे त्यांच्याबाबत जाणून घेण्यासाठी अनेकांमध्ये जिज्ञासा निर्माण झाली.

नवी दिल्ली : स्वामी शिवानंद... वय १२५ वर्षे... पद्मश्री पुरस्कार घेण्यासाठी हे याेगमहर्षी समाेर आले त्यावेळी पंतप्रधान नरेंद्र माेदींनी स्वत: त्यांना वाकून नमस्कार केला. राष्ट्रपती रामनाथ काेविंद हेदेखील पुढे आले आणि त्यांना उभे राहण्यास मदत केली. स्वामी शिवानंद यांची देशभरात चर्चा आहे. स्वत: माेदी त्यांच्यापुढे नतमस्तक झाले. त्यामुळे त्यांच्याबाबत जाणून घेण्यासाठी अनेकांमध्ये जिज्ञासा निर्माण झाली. या याेगमहर्षींबाबत चकीत करणाऱ्या काही गाेष्टी जाणून घेऊया.पद्मश्री पुरस्काराने सन्मानित हाेणारे स्वामी शिवानंद हे सर्वाधिक वयाेवद्ध व्यक्ती आहेत. त्यांचा जन्म वाराणसीत ऑगस्ट १८९६ मध्ये झाल्याचे बोलले जाते. या वयातही दरराेज तासानतास याेगसाधना करण्याचे त्यांच्यात सामर्थ्य आहे. त्यांच्या निराेगी आणि दीर्घायुष्यामुळे राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय संघटनांचे लक्ष वेधले गेले. साधे राहणीमान आणि साधा आहार, असे त्यांचे आयुष्य आहे.स्वामी दरराेज पहाटे ३ वाजता उठतात. काेणाचीही मदत न घेता ते दरराेज याेगासने करतात. काेणतीही वैद्यकीय गुंतागुंत नसून, ते पूर्णपणे फिट आहेत. स्वामी ६ वर्षांचे हाेण्यापूर्वीच त्यांचे आई-वडील आणि बहिणीचा मृत्यू झाला. त्यांनी कुटुंबीयांचे अंत्यसंस्कार करण्यास नकार दिला आणि ब्रह्मचर्याचा मार्ग निवडला. स्वामींनी आयुष्य समाजासाठी अर्पण केले. ते म्हणतात, विश्व हे माझे घर आहे. या जगातील सर्व लाेक माझे आई-वडील आहेत. त्यांच्यावर प्रेम करणे आणि सेवा करणे, हाच माझा धर्म आहे.निराेगी आयुष्यासाठी याेगसाधनेचाच मार्ग आहे, असा स्वामींचा ठाम विश्वास आहे. याेगामुळे मन, इच्छा आणि संवेदनांवर नियंत्रण मिळवता येते. इश्वर आणि ज्ञानाकडे जाण्याचा हा मार्ग आहे.योगसाधनास्वामींचे वय १२५ वर्षे आहे.  दरराेज याेगसाधना, तेलरहीत आणि उकडलेला आहार, मानवाप्रती नि:स्वार्थ सेवा हे त्यांच्या निराेगी आणि शिस्तप्रिय आयुष्याचे रहस्य आहे. गेल्या तीन दशकांपासून ते काशीच्या घाटांवर स्वत: याेग करतात आणि इतरांना शिकवतात. गेल्या ५० वर्षांपासून ते पुरी येथील कृष्ठराेग्यांची सेवा करीत आहेत.