शहरं
Join us  
Trending Stories
1
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
2
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
3
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
4
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
5
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
6
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
7
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
8
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
9
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
10
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
11
धोक्याची घंटा! तुम्हीही जेवताना फोन वापरताय? एका चुकीमुळे आतड्यांचं होतं गंभीर नुकसान
12
Travel : हिमालयातील निळ्याशार पाण्याचा स्वर्ग! 'चंद्रताल'ला जाण्याचा प्लॅन करताय तर 'हे' नक्की वाचा
13
फी भरण्यासाठी नाही, तर एअर होस्टेस गर्लफ्रेंडसाठी आयुषने विकली १० एकर जमीन; 'किडनी' कथेमागचे वास्तव ऐकून हादराल...
14
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
15
टाटापासून मारुतीपर्यंत 'या' आहेत देशातील टॉप ५ स्वस्तात मस्त कार! ५ लाखांच्या आत घरी आणा; मायलेजही खास
16
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
17
Manipur Violence : रॉकेट हल्ल्यात २ मुलांचा मृत्यू, मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार; बिष्णुपूरमध्ये कर्फ्यू, ५ जिल्ह्यांत इंटरनेट बंद
18
"डॉलर वर असो किंवा खाली..." राजपाल यादवला पैशांवरुन टोमणा मारणाऱ्यांना सलमानने सुनावलं
19
Feng shui: समृद्धीचं प्रतीक की पर्यावरणाचा रक्षक? बेडूक घराजवळ दिसणं तुमच्यासाठी किती शुभ आहे?
20
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
Daily Top 2Weekly Top 5

धनुष्यबाण चिन्हाबाबत पुढील रणनीती काय?; खासदार अनिल देसाईंनी दाखवला विश्वास

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 8, 2022 12:07 IST

चिन्ह गोठवणे याला मोठी प्रक्रिया आहे. केंद्रीय निवडणूक आयोगाने पक्षात २ गट झाल्यास त्यांनी सादर केलेले दावे, कागदपत्रे, सखोल चौकशी केली असेल त्यानंतर निष्कर्षापर्यंत येऊ शकते.

नवी दिल्ली - शिवसेनेच्या धनुष्यबाण चिन्हाबाबत कुठलाही निर्णय घाईगडबडीने होणार नाही. केंद्रीय निवडणूक आयोग या प्रकरणात सखोल चौकशी करून निर्णय घेतील अशी खात्री वाटते. त्यामुळे पुढे काय पाऊल उचलायची याचा विचार अद्याप केला नाही असं सांगत खासदार अनिल देसाई यांनी विश्वास व्यक्त केला आहे. दुपारी २ वाजेपर्यंत केंद्रीय निवडणूक आयोगाने दोन्ही गटाला आवश्यक कागदपत्रे सादर करण्याची मुदत दिली आहे. त्यामुळे धनुष्यबाणाचं भवितव्य काय असेल याची उत्सुकता सगळ्यांना लागली आहे. 

याबाबत अनिल देसाई म्हणाले की, शिवसेनेने निवडणूक आयोगाला वेळेत कागदपत्रे सादर केली होती. हा विषय इतका गंभीर आहे. याकडे देशाचे लक्ष लागलं आहे. १९९० पासून शिवसेनेला धनुष्यबाण चिन्ह मिळालं. त्याचे नेतृत्व शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे करत होते. आज उद्धव ठाकरे करतायेत. याबाबत वाद सुप्रीम कोर्टात आहे. आम्ही कागदपत्रे देऊनसुद्धा ती मिळाली नसल्याचा मेल आम्हाला पाठवण्यात आला होता. चिन्ह गोठवणे याला मोठी प्रक्रिया आहे. केंद्रीय निवडणूक आयोगाने पक्षात २ गट झाल्यास त्यांनी सादर केलेले दावे, कागदपत्रे, सखोल चौकशी केली असेल त्यानंतर निष्कर्षापर्यंत येऊ शकते. कुठलीही संधी न देता चिन्ह गोठवत असाल तर असं होण्याची शक्यता फार कमी आहे. केंद्रीय निवडणूक आयोग स्वायस्त संस्था आहे. या देशात लोकशाही आहे. त्यामुळे तातडीने निर्णय घेणार नाहीत असं त्यांनी सांगितले. 

तसेच शिंदे गटाने जी कागदपत्रे सादर केली आहेत ती अपूर्ण आहेत असं निवडणूक आयोगाने म्हटलं आहे. त्याची प्रत आम्हालाही मिळायला हवी. निवडणूक आयोगाने दोन्ही गटाला दुपारी २ पर्यंत वेळ दिली आहे. ३ ऑक्टोबरला पोटनिवडणूक जाहीर झाली आहे. ३ ऑक्टोबरपर्यंत जे राजकीय पक्षाची स्थिती होती. याकडे निवडणूक आयोगाला लक्ष द्यावं लागेल असंही अनिल देसाईंनी म्हटलं. 

आमच्याकडे शिंदे गटापेक्षा जास्त सदस्य आमच्याकडे १५ आमदार आहेत. १२ विधान परिषदेचे आमदार आहेत. शिंदे गटाच्या १२ खासदार, ४० आमदारांचा प्रश्न सुप्रीम कोर्टात प्रलंबित आहेत. १ लाख ६६ हजार पदाधिकारी असल्याचा दावा शिंदे गटाने केलाय मात्र त्या दुप्पट आमच्याकडे प्रतिज्ञापत्र आहेत. १९ जून २०२२ ला सदस्य अभियान सुरू झालं. आतापर्यंत १० लाखांहून अधिक सदस्य नोंदणी झाली आहे. त्याची माहिती केंद्रीय निवडणूक आयोगाला देण्यात आली आहे तशी कागदपत्रे सादर करण्यात आली आहेत असं अनिल देसाईंनी सांगितले. 

टॅग्स :Shiv SenaशिवसेनाAnil Desaiअनिल देसाईEknath Shindeएकनाथ शिंदे