शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! भारताकडे निघालेला रशियन तेलाचा टँकर समुद्रातून अचानक माघारी वळला; रिफायनरींची चिंता वाढली...
2
आजोबांच्या संपत्तीवर नातवंडांचा जन्मसिद्ध हक्क नाही; मुंबई हायकोर्टाचा मोठा निर्णय, प्रकरण काय?
3
Mutual Funds मध्ये गुंतवणूक करणाऱ्यांचा होणार फायदा; सेबीचा नवा प्रस्ताव, गुंतवणूकदारांना काय मिळणार?
4
भारताचा हिटमॅन 'जगात भारी'! वनडेमध्ये रोहित शर्मा अव्वल, गिलला मागे टाकत रचला विश्वविक्रम
5
पाकिस्तान करणार हमासचा खात्मा? अमेरिकेची 'चलाख' खेळी; असीम मुनीर २० हजार सैन्य उतरवणार
6
इथं १ ग्रॅम घेताना घाम फुटतोय! मग ७ महिन्यात ६४००० किलो सोनं भारतात कोणी आणलं?
7
फक्त १० वर्षांच्या फरकाने तुमच्या SIP रिटर्न्समध्ये ४७ लाखांचा मोठा फरक; तोटा होण्याआधी गणित पाहा
8
Viral News: रस्त्यावरून खरेदी केले जुने बूट; ब्रँडचं नाव पाहिलं आणि किंमत तपासली; महिला झाली शॉक!
9
Guru Upasna: गुरु उच्च राशीत असेल तर उपासना कोणती करावी किंवा कशी वाढवावी? वाचा 
10
Shreyas Iyer : श्रेयस लवकर बरा व्हावा! सूर्याच्या आईची देवासमोर प्रार्थना; व्हिडिओ व्हायरल
11
जो तो एआयच्या मागे लागलाय...! इंटेलच्या CEO नी यासाठी राजीनामा दिला; आता ₹९१५ कोटी लावून...
12
भारत-अमेरिका टॅरिफ वॉर थांबणार, US सोबत खास डील होणार? ट्रम्प यांचे मोठे संकेत
13
सरकार पुन्हा विकणार LIC चे शेअर्स! केव्हा आणि कसं? जाणून घ्या संपूर्ण डिटेल्स
14
Indian Currency Facts : भारतीय चलनी नोटांच्या मध्यभागी खरंच चांदीची तार असते का? जाणून घ्या...
15
PPF Vs NPS Investment: पैशांची गुंतवणूक करायची आहे, एनपीएस निवडू की पीपीएफ? नक्की काय करावं
16
शाब्बास पोरा! ना कॉलेज, ना कोचिंग... UPSC सह क्रॅक केल्या १२ सरकारी नोकऱ्या, झाला IPS
17
"बंगल्यात झालेल्या चोरीतून सीडी, पेनड्राईव्ह, कागदपत्रे लांबवली", एकनाथ खडसेंचा मोठा गौप्यस्फोट
18
भाभा अणुसंशोधन केंद्रात हेरगिरीचा डाव, शास्त्रज्ञ बनून फिरत होते आदिल आणि अख्तर, असं फुटलं बिंग 
19
अदानी ग्रुपचे शेअर्स पुन्हा रॉकेट! 'या' स्टॉकमध्ये १३% ची छप्परफाड वाढ; नेमकं काय घडलं?
20
बच्चू कडूंनी चर्चेला यावं! लोकांना, रुग्णांना त्रास होईल असं काही करू नये - देवेंद्र फडणवीस

हवेत हे चाललंय तरी काय? ती हवा संपत्तीची असू शकेल!

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 15, 2023 11:22 IST

हवा डोक्यात जाणे कधीही वाईटच. ती हवा संपत्तीची असू शकेल. स्वत:ला तोफखाना समजणारेही असतात. वेगळ्या हवेत वावरणारी ही माणसं हवेत जाऊन काय गुण उधळतात, याची कल्पना अलीकडील काही घटनांनी येते. विमानातील या घटनांनी कंपन्यांची हवा मात्र टाइट केली आहे.

राजेश पिल्लेवार

पल्याकडे रेल्वेत सीट बळकावण्यावरून बाचाबाची होते. हाणामाऱ्या होतात. आधी वाक् युद्धाला, मग प्रत्यक्ष युद्धाला तोंड फुटते. कचकच आवाज करणाऱ्या बसेसमध्ये लोक कचाकचा भांडतात. लोकलमध्ये तर रोज अशा हजारो घटना घडत असतील. फार कशाला, शेअर ऑटोतही दाटी झाली की ‘जरा सरको ना भाई’ म्हणत दमदाटी होते. पण, हे झालं जमिनीवरचं. हवेतही तेच? विमानातील हे असले प्रकार ऐकणाऱ्या कुणालाही हा प्रश्न पडेल. खरं म्हणजे विमानवाऱ्या करणाऱ्यांच्या बाबतीत एक वेगळा ‘आदरभाव’ सामान्यांच्या मनात दाटलेला असतो. हे हवाहवाई लोक बऱ्यापैकी पैसेवाले असतात. शिकले-सवरलेही असावेतच. त्याहीपलीकडे ते खूप सुसंस्कृत आणि ‘मॅनर्स’ अंगी बाणलेले असतात, असा एक आपला भाबडा समज असतो. त्यांचं चालणं, बोलणं, आविर्भाव यातून बऱ्याचदा त्याचं दर्शनही घडतं. सिनेमा-नाटकांतून सजवलेल्या अशा प्रतिमा आपण बघितलेल्या असतात. साहजिकच सुटा-बुटातला, हाती चामड्याची लॅपटॉप बॅग घेतलेला आणि आयफोनवर फॉरीन स्टाईलमध्ये इंग्रजी फडकावणारा माणूस बघितला की, बसमध्ये भांडणारे पामर चपापून असतात. या लोकांकडून असले घृणास्पद उद्योग होणे, हीच मुळी धक्कादायक बाब ठरते. सहप्रवाशाच्या अंगावर लघवी? आणि त्यातही महिलेच्या? इतका किळसवाणा प्रकार? बिझनेस क्लासमध्येसुद्धा? त्यांना काय शिकवण मिळाली असेल, माहीत नाही. पण श्रीमंती, पद, मान-मरातब, उच्च शिक्षण आणि माणुसकी, सुसंस्कृतपणा यांचा अर्थाअर्थी संबंध नसतो, हेच या घटना ऐकल्यानंतर अधोरेखित होते.

आता या झाल्या बाहेर आलेल्या गोष्टी. ज्या कधी बाहेरच आल्या नाहीत, त्यांचं काय? अनेकदा फुकट झंझट नको म्हणून प्रकरणे आपसात मिटवली जातात. बदनामीची भीती असते. बरेचदा विमान कंपन्याही झटकून देतात. त्यांना आर्थिक हिशेब महत्त्वाचा. वरच्यावर मिटवून टाकले जाते.

अर्थात, सगळ्याच एलीट क्लासला हा दोष देता येत नाही, हेही लक्षात घेतले पाहिजे. तांदळात खडे असतातच. हे खडे ‘नो फ्लाय लिस्ट’मध्ये टाकून दिलेलेच बरे... रेल्वे-बस प्रवासात जशी मद्यप्राशनाला बंदी आहे, तशी विमानात का नसावी? काय म्हणता?

एअर इंडिया एआय-१०२ 

२६ नोव्हेंबरची घटना. एअर इंडियाच्या एआय-१०२ फ्लाइटमध्ये घडलेली. हे विमान न्यूयॉर्कच्या जेएफके विमानतळावरून निघाले. दुपारच्या जेवणानंतर दिवे मंद झाले. एक महिला तिच्या सीटवर पहुडलेली असताना एक पुरुष प्रवासी तिच्याजवळ आला. तो पूर्णपणे झिंगलेल्या अवस्थेत होता. त्याने पँटची झीप उघडली. महिलेच्या अंगावर लघुशंका केली आणि निघून गेला. महिलेने भानावर येत तक्रार केली. आठवडाभरापूर्वी ही घटना उघड झाली. मोठा गदारोळ झाला. त्या दिवट्याचे फरार होणे, पोलिसात तक्रार, नंतर अटक, त्याची नोकरी जाणे वगैरे नंतरच्या घडामोडी तुम्हाला ठाऊक आहेतच.

आणखी एक लघुशंका 

त्यानंतर एकेक घटना उघड होऊ लागल्या. लगेचच उजेडात आलेली दुसरी घटनाही एअर इंडियाच्या विमानातच घडली. हे विमान होते पॅरिसहून दिल्लीला येणारे. एका मद्यधुंद महाभागाने महिला प्रवाशाच्या ब्लँकेटवर लघवी केली. पण त्याने लेखी माफी मागितली आणि तेथेच सुटला. कारवाई झाली नाही. दिल्लीत सीआरपीएफने त्याला धरले. पण महिलेने तडजोड केली आणि तो निसटला.

बांगलादेश एअरलाइन्स  बोईंग ७७७

लघुशंकेच्या या घटनांचे शिंतोडे अजून उग्र असतानाच दोन विमान प्रवाशांमध्ये हाणामारी झाल्याचा एक व्हिडीओ व्हायरल झाला. हे विमान होतं बांगलादेश एअरलाइन्सचं बोईंग ७७७. ते जात होतं ढाक्याला. काही प्रवाशांमध्ये चिरकूट कारणावरून तंटा झाला. शिव्यांतून एकमेकांच्या माय-बहिणीचा उद्धार करून झाल्यावर प्रकरण हातघाईवर आलं. एका मर्दानं काय करावं? कपडे फाडून बसला दुसऱ्याच्या उरावर. त्याला बुकलला. विरोधी पार्टीनं ‘ईंट का जवाब पत्थर से’ दिला. विमान ढाक्यात उतरेपर्यंत हे हवाई युद्ध सुरू होतं…

बांगलादेश एअरलाइन्स  बोईंग ७७७

लघुशंकेच्या या घटनांचे शिंतोडे अजून उग्र असतानाच दोन विमान प्रवाशांमध्ये हाणामारी झाल्याचा एक व्हिडीओ व्हायरल झाला. हे विमान होतं बांगलादेश एअरलाइन्सचं बोईंग ७७७. ते जात होतं ढाक्याला. काही प्रवाशांमध्ये चिरकूट कारणावरून तंटा झाला. शिव्यांतून एकमेकांच्या माय-बहिणीचा उद्धार करून झाल्यावर प्रकरण हातघाईवर आलं. एका मर्दानं काय करावं? कपडे फाडून बसला दुसऱ्याच्या उरावर. त्याला बुकलला. विरोधी पार्टीनं ‘ईंट का जवाब पत्थर से’ दिला. विमान ढाक्यात उतरेपर्यंत हे हवाई युद्ध सुरू होत.