शहरं
Join us  
Trending Stories
1
सीमेवरील तणावादरम्यान भारताचं मोठं पाऊल, राफेल-एम विमानांसाठी फ्रान्ससोबत करार, अशी आहेत वैशिष्ट्ये
2
मोठा खुलासा! पहलगाममध्ये हल्ल्यावेळी लष्कराचा मोठा अधिकारी तिथेच होता; गेटकडे धावणाऱ्या लोकांना रोखले...
3
पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेस नेत्यांच्या विधानांवर राहुल गांधी नाराज; मल्लिकार्जुन खरगे समज देणार
4
जसं त्याला कळलं, आम्ही हिंदू आहोत, त्याने...; लेफ्टिनंटच्या पत्नीचा पहिल्यांदाच खुलासा
5
मुकेश अंबानी यांच्या एका शेअरने मार्केट फिरवलं; बाजाराची जोरदार उसळी; कुठे सर्वाधिक वाढ?
6
पर्यटकांच्या सुरक्षेसाठी 'महाराष्ट्र पर्यटन सुरक्षा दल' स्थापना; राज्य सरकारचा निर्णय
7
Bank of Baroda मध्ये जमा करा १,००,००० रुपये आणि मिळेल ₹१६,१२२ चा फिक्स्ड रिटर्न, पाहा डिटेल्स
8
५०० रुपयांपेक्षा कमी वार्षिक प्रीमियमवर २ लाख रुपयांचा विमा मिळवा, कोण घेऊ शकतो लाभ?
9
दहशतवादी हल्ला करताना धर्म विचारतात का? वडेट्टीवारांचे विधान; CM फडणवीस म्हणाले, "इथे बसून…"
10
'धनंजय मुंडे यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला, मग...', अंजली दमानियांचे सरकारला दोन सवाल
11
मुंबई- लखनौ सामन्यानंतर जसप्रीत बुमराहच्या पत्नीला राग अनावर, नेमके काय घडलं?
12
LIC च्या 'या' पॉलिसीत एकदाच गुंतवणूक करा अन् दरमहा २० हजार पेन्शन मिळवा; किती गुंतवणूक करावी लागेल?
13
"काँग्रेस नेते दहशतवाद्यांना 'निर्दोष' ठरवण्याचा प्रयत्न करताहेत का?", बावनकुळे वडेट्टीवारांवर कडाडले
14
चीनला का पडतेय भारतीय कंपन्यांची गरज? 'या' कामासाठी मागताहेत मदत
15
तुम्ही होम लोन घेतलेलं असेल, तर पर्सनल लोन मिळू शकते का? जाणून घ्या
16
एकही युद्ध जिंकले नाही; मग पाकिस्तानी अधिकारी छातीवर पदके लावून का फिरतात? जाणून घ्या...
17
एकट्याने पाकिस्तानी आक्रमण परतवलेले, त्यानंतर रहस्यमयी मृत्यू; आजही भारतीय सैन्याला सियाचिनमध्ये वाचवितात ओपी बाबा
18
नाशिक: मुलासोबत ट्रेकिंगला गेले अन् पांडव लेणीच्या डोंगरावर अडकले; नंतर...
19
Gold Price on 28 April : अक्षय्य तृतीयेपूर्वी सोनं झालं स्वस्त, पाहा १० ग्रॅम सोन्यासाठी किती खर्च करावा लागणार
20
'पंचायत'च्या मेकर्सची आणखी एक हटके वेबसीरिज, 'ग्राम चिकित्सालय'मधून उडणार हास्याचे फवारे!

सर्जिकल स्ट्राइक आणि लाँच पॅड्स म्हणजे नेमके काय?

By admin | Updated: September 30, 2016 01:39 IST

पाकव्याप्त काश्मीरमध्ये घुसून भारतात घुसण्याच्या तयारीत असलेल्या दहशतवाद्यांच्या गटांविरुद्ध गुरुवारी पहाटे केलेल्या कारवाईची माहिती देताना लष्करी कारवाई महासंचालक

पाकव्याप्त काश्मीरमध्ये घुसून भारतात घुसण्याच्या तयारीत असलेल्या दहशतवाद्यांच्या गटांविरुद्ध गुरुवारी पहाटे केलेल्या कारवाईची माहिती देताना लष्करी कारवाई महासंचालक लेफ्ट. जनरल रणवीर सिंग ‘सर्जिकल स्ट्राइक’ आणि ‘लॉन्च पॅड््स’ असे दोन शब्द वापरले. ही कारवाई प्रत्यक्षात कशी फत्ते केली गेली याचा तपशील उघड करणे लष्करी सज्जता आणि राष्ट्रीय सुरक्षेच्या दृष्टीने मारक असल्याने तो स्वाभाविकपणे गुलदस्त्यात ठेवण्यात आला. ‘सर्जिकल स्ट्राइक’ व ‘लॉन्च पॅड’ म्हणजे काय हे समजून घेतले, तर आपल्या सैनिकांनी नेमके काय केले याची ढोबळमानाने कल्पना येऊ शकेल.पूर्वनिर्धारित लष्करी लक्ष्यावर अत्यंत अचूकतेने व चपळाईने केलेल्या हल्ल्यास युद्धशास्त्रात ‘सर्जिकल स्ट्राइक’ असे म्हटले जाते. वैद्यकशास्त्राच्या परिभाषेतून हा शब्द आलेला आहे. एखादा कुशल शल्यचिकित्सक तरबेज हातांचा आणि खास शल्यक्रिया आयुधांचा वापर करून जिकिरीची पण प्राणरक्षक शस्त्रक्रिया करून व्याधीस कारणीभूत ठरणारे शल्य लगद दूर करतो. त्याच प्रमाणे ‘सर्जिकल स्ट्राइक’ ही लष्कराने केलेली जोखमीची शल्यक्रिया असते. सोप्या भाषेत त्याला वैद्यकीय शस्त्रक्रियेचे लष्करी भावंड म्हणता येईल. यात ठरलेल्या लक्ष्याचा परिपात करणे, हेच एकमेव उद्दिष्ट असते. कारण अशा कारवाईचे स्वरूप आणि त्यातील जोखीम पाहता त्यात अपयश येणे आत्मघाती ठरणारे असते.अर्थात कोणतीही शस्त्रक्रिया करण्याआधी नेमके शल्य काय आहे हे जाणून घेण्यासाठी जशा नानाविध चाचण्या आणि तपासण्या केल्या जातात, तशी जय्यत पूर्वतयारी हा लष्करी ‘सर्जिकल स्ट्राइक’च्या यशाचा भक्कम पाया असतो. गुप्तहेर आणि खबऱ्यांकडून पक्की माहिती घेऊन ज्या लक्ष्याचा नि:पात करायचा आहे त्याची इत्थंभूत खबर आधी गोळा केली जाते. यात लक्ष्य नेमके कुठे आहे, त्याची बलस्थाने व कमकुवत जागा कोणत्या, कारवाईसाठी सर्वांत परिणामकारक वेळ कोणती, प्रतिहल्ल्याची शक्यता किती व त्याचे स्वरूप काय असू शकेल, कारवाईच्या चक्रव्यूहात शिरल्यावर फत्ते करून सुखरूप बाहेर कसे यायचे, प्रसंगी कारवाई फसली किंवा अर्धवट सोडावी लागली, तरी स्वत:ची कमीतकमी हानी होईल, अशा प्रकारे शिताफीने माघार कशी घ्यायची, या आणि अशा कितीतरी गोष्टी या पूर्वतयारीत येतात. (वृत्तसंस्था)सर्जिकल स्ट्राइकफक्त लक्ष्य टिपायचे, पण ते करताना अनुषंगिक हानी (कोलॅटरल डॅमेज) अजिबात होऊ द्यायचे नाही किंवा झालेच तरी ते कमीतकमी ठेवायचे, हे ‘सर्जिकल स्ट्राइक’चे वैद्यकीय शल्यक्रियेशी नाते सांगणारे दुसरे व्यवच्छेदक लक्षण म्हणता येईल. लक्ष्य ही एखादी व्यक्ती अथवा व्यक्तिसमूह असेल, तर शक्यतो फक्त त्यांनाच टिपायचे व आजूबाजूच्या परिसराची, इमारतींची, वाड्या-वस्त्यांची हानी होऊ द्यायची नाही. यावरून स्पष्ट होते की, पारंपरिक पद्धतीची शस्त्रायुधे वापरून ‘सर्जिकल स्ट्राइक’ साध्य होऊ शकत नाही. त्यासाठी खास प्रशिक्षण दिलेल्या सैन्यदलाच्या जाँबाज तुकड्या वापरल्या जातात व शस्त्रायुधेही सरसकट व्यापक संहार करण्याऐवजी अचूक आणि बिनचूक मारा करणारी असावी लागतात.गेल्या काही महिन्यांत ‘एलओसी’ ओलांडून भारतात शिरलेल्या किंवा शिरू पाहणाऱ्या १२५हून अधिक पाक प्रशिक्षित दहशतवाद्यांना लष्कराने काश्मीरमध्ये सीमेवरच किंवा सीमेलगत कंठस्नान घातले आहे. आताची ताजी कारवाई हे यापुढे टाकलेले पाऊल होते. या वेळी हे दहशतवादी सीमेच्या पलीकडे असतानाच त्यांना लक्ष्य केले गेले. लष्कराकडे असे करण्याचे दोन पर्याय होते. सीमा न ओलांडताच तोफखाना व क्षेपणास्त्रांचा मारा करून पलीकडचे लक्ष्य टिपायचे किंवा जोखीम पत्करून खास प्रशिक्षित सैनिकांची तुकडी सीमा ओलांडून प्रत्यक्ष लक्ष्यापर्यंत पाठवायची. भारतीय लष्कराने यापैकी दुसरा पर्याय निवडल्याचे दिसते. उपलब्ध संकेतांनुसार यासाठी छत्रीधारी सैनिक (पॅराट्रुपर्स) पाठविले गेले. ते प्रतिस्पर्ध्याला सुगावा लागणार नाही, अशा बेताने निबिड काळोखात लक्ष्याच्या जवळपास उतरले आणि आपली कामगिरी फत्ते करून झुंजुमुंजू व्हायच्या आत सुखरूप परतले. लॉन्च पॅड्स : लॉन्च पॅड्स म्हणजे दहशतवाद्यांच्या तुकडीचे प्रत्यक्ष सीमा ओलांडण्यापूर्वी एकत्र जमून कूच सुरू करण्याच्या पडावाचे ठिकाण. भारताविषयी विखार पाजून भडकविलेल्या अठरापगड अतिरेकी संघटनांच्या दहशवाद्यांना प्रशिक्षण देणारी केंद्रे पाकव्याप्त काश्मीरमध्ये सीमेपासून बरीच आतील भागात आहेत. त्या तुलनेने लॉन्च पॅड्स सीमेच्या जवळपास आहेत. सीमेवरील पाकिस्तानी चौक्यांच्या छत्रछायेत ही लॉन्च पॅड्स आहेत, असे म्हणता येईल. प्रशिक्षण केंद्रांमध्ये प्रशिक्षित केलेल्या दहशतवाद्यांपैकी कोणाला सीमेच्या पलीकडे पाठवायचे हे ठरले की त्यांचे गट वा तुकड्या करून त्यांना या लॉन्च पॅडच्या ठिकाणी आणले जाते. तेथे त्यांना शस्त्रे व अन्य रसद पुरविली जाते व शेवटच्या सूचना देऊन प्रत्यक्ष मोहिमेवर रवाना केले जाते.