शहरं
Join us  
Trending Stories
1
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
2
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
3
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
4
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
5
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
6
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
7
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
8
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
9
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
10
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
11
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
12
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
13
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
14
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
15
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
16
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
17
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
18
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
19
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
20
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
Daily Top 2Weekly Top 5

काय करणार तलैवा? भाजपात जाणार की भाजपापासून दूर?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 2, 2018 04:58 IST

तामिळनाडू जनतेचा नवा ‘तलैैवा' (क्रांतिकारी नेता) सुपरस्टार रजनीकांतचा ‘काला' चित्रपट प्रदर्शित होत

चेन्नई : तामिळनाडू जनतेचा नवा ‘तलैैवा' (क्रांतिकारी नेता) सुपरस्टार रजनीकांतचा ‘काला' चित्रपट प्रदर्शित होत आहे ७ जूनला. आध्यात्मिक राजकारण करू पाहाणारा रजनीकांत भाजपचाच समर्थक असल्याचे अनेकांना वाटत असले तरी त्याची ‘काला'तील भूमिका आहे गरिबांसाठी लढणाऱ्या, पण प्रसंगी मवालीगिरीही करणाºया माणसाची. त्याआधीच्या ‘कबाली' चित्रपटात त्याने साकारला होता आंबेडकरी अनुयायी.

या भूमिकांचा भाजपच्या राजकारणाशी कुठेच मेळ बसत नाही. त्यामुळे रजनीकांत ‘काला'च्या प्रदर्शनानंतर भाजपपासून दूर जाणार की आध्यात्मिक राजकारणाच्या स्वत:च्या भाषेला न्याय देण्यासाठी भाजपाला पाठिंबा देणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. चित्रपटात रजनीकांतने रंगविलेला काला गरिबांच्या रक्षणासाठी रस्त्यावर उतरला आहे. तो मवालीगिरीही करतो. ही भूमिका व रजनीकांतला करायचे असलेले आध्यात्मिक राजकारण यांच्यात प्रचंड अंतर आहे. त्यात चाहत्यांनी देवाचा दर्जा दिला आहे. त्याने द्राविडी बाज सोडून हिंदुत्वाचे राजकारण केले तर चाहते त्याला खाली आपटतील. त्यामुळेच कालाच्या प्रदर्शनानंतर रजनीकांतवर राजकीय भूमिका घेताना मोठे दडपण असणार आहे.तो द्रमुक व अण्णा द्रमुकबरोबर जाऊ इच्छित नाही. तामिळनाडूमध्ये काँग्रेस संपल्यात जमा आहे. त्यामुळे तिथे जाण्याचाही प्रश्न उद्भवत नाही. कमल हासन याचे राजकारण भाजपाविरोधी असेल, हे स्पष्टच झाले आहे. त्यामुळे द्रमुक-अण्णा द्रमुकविरोधी राजकारणासाठी रजनीकांत काय करणार, याची सर्वत्र चर्चा सुरू आहे.

टॅग्स :rajinikanthरजनीकांत