शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

गुजरातमध्ये काँग्रेस आमदारांनी केले क्रॉस व्होटिंग का ?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 8, 2017 17:47 IST

गुजरात राज्यसभा निवडणुकीसाठीचे मतदान संपले असून, आता फक्त निकालाची प्रतिक्षा उरली आहे

सूरत, दि. 8 - गुजरात राज्यसभा निवडणुकीसाठीचे मतदान संपले असून, आता फक्त निकालाची प्रतिक्षा उरली आहे. तीन जागांसाठी भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा, स्मृती इराणी, बलवंतसिंह राजपूत आणि अहमद पटेल हे चार उमेदवार रिंगणात आहेत. भाजपाकडे आवश्यक संख्याबळ असल्याने अमित शहा आणि स्मृती इराणी यांचा विजय निश्चित मानला जात आहे. 

तिस-या जागेसाठी बलवंत सिंह आणि काँग्रेसचे उमेदवार अहमद पटेल यांच्यामध्ये चुरस आहे. पक्षांतर्गत बंडखोरीमुळे या निवडणुकीत काँग्रेसची प्रतिष्ठा पणाला लागली आहे. काँग्रेसमधून फुटून बाहेर पडलेले शंकरसिंह वाघेल आणि त्यांच्या सहा समर्थक आमदारांनी भाजपा उमेदवार बलवंतसिंह राजपूत यांच्याबाजूने मतदान केल्याची शक्यता आहे. अहमद पटेल हरणार आहेत त्यामुळे मी त्यांना मतदान केले नाही असे वाघेलांनी स्पष्टपणे सांगितले. 

काँग्रेसच्या 44 आमदारांसोबत बंगळुरुला न जाणारे राघवजी पटेल यांनी बलवंतसिंह राजपूत यांच्याबाजूने मतदान केले आहे. वाघेल समर्थक धर्मेंद्रसिंह जाडेजा यांनी सुद्धा भाजपा उमेदवाराला मत दिले आहे. 44 आमदारांपैकी कोणी क्रॉस व्होटिंग किंवा नोटाचा पर्याय वापरला नाही तर, काँग्रेसला अहमद पटेल यांच्या विजयासाठी फक्त एका आमदाराच्या पाठिंब्याची गरज भासेल. 

तीन जागांसाठी एकूण चार उमेदवार रिंगणात आहेत. शहा आणि इराणी वगळता भाजपाने बलवंतसिंह राजपूत यांना रिंगणात उतरवले आहे. त्यांनी अलीकडेच काँग्रेससोडून भाजपामध्ये प्रवेश केला. पटेल यांच्या विजयासाठी काँग्रेस गुजरात विधानसभेतील राष्ट्रवादीचे दोन आमदार, संयुक्त जनता दल आणि गुजरात परिवर्तन पार्टीच्या प्रत्येकी एका आमदारावर  अवलंबून आहे.

अहमद पटेल उमेदवारी अर्ज दाखल करताना राष्ट्रवादी आणि जदयूचा आमदार त्यांच्यासोबत होता. काँग्रेसच्या 51 आमदारांपैकी सात आमदार बंगळुरुला गेले नव्हते. हे आमदार वाघेल यांच्या गटातील असून त्यांच्यापैकी एक आमदार मदत करेल असा काँग्रेसला विश्वास आहे. 182 सदस्यांच्या गुजरात विधानसभेत काँग्रेसचे 57 आमदार होते. त्यातील सहा आमदारांनी राजीनामा दिल्यामुळे काँग्रेसचे संख्याबळ 51 झाले.