शहरं
Join us  
Trending Stories
1
‘बांगलादेशी आहेस का?’, केरळमध्ये परप्रांतीय दलित तरुणाला बेदम मारहाण, रुग्णालयात मृत्यू 
2
रशियाला युद्धादरम्यान मोठा धक्का ! सैन्याचे लेफ्टनंट जनरल सर्वारोव्हचा कार स्फोटात मृत्यू
3
Vijay Hazare Trophy स्पर्धेत दिसणार रोहित-विराटचा जलवा! ही जोडी कधी अन् कोणत्या मैदानात खेळणार सामना?
4
युजवेंद्र चहलने विकत घेतली आलिशान BMW Z4 कार; भारतात त्याची किंमत ऐकून धक्काच बसेल!
5
नवीन वर्षाच्या सुरूवातीला कमी हाेणार थंडीचा जोर; हवामान तज्ज्ञांनी व्यक्त केला अंदाज
6
बांगलादेशातील हिंदू तरुणाच्या हत्येप्रकरणी मोठा खुलासा; ईशनिंदेचा आरोप खोटा, 'हे' होते कारण
7
महाराष्ट्रापाठोपाठ गोव्यातील निवडणुकीतही भाजपाची मुसंडी, काँग्रेसची पीछेहाट, आपचा धुव्वा
8
AI शक्तिशाली सहाय्यक, मात्र मानवी मेंदूला पर्याय नाही; सर्व तज्ज्ञांचे एकमताने शिक्कामोर्तब
9
भारतीय ऑलराउंडरची क्रिकेटच्या सर्व प्रकारातून निवृत्ती! IPL लिलावात CSK नं लावली होती विक्रमी बोली
10
"पालिका निवडणुकांमध्येही देवेंद्र फडणवीसच ‘धुरंधर’; उद्धव ठाकरे 'रेहमान डकैत"; भाजपाची टीका
11
IPL 2026: Axar Patel ला धक्का! कर्णधारपदावरून हटवलं, आता 'हा' Delhi Capitals चा 'कॅप्टन'
12
Video: उकळत्या तेलात हात घालून काढते गरमागरम पकोडे... 'समोसा गर्ल' ची रंगलीये तुफान चर्चा
13
झाडू मारण्यासाठी सॉफ्टवेअर इंजिनिअरने सोडली हाय-फाय नोकरी; आता महिन्याला १.१ लाख पगार
14
हाण की बडीव! रुग्णालयात डॉक्टर-रुग्ण भिडले, एकमेकांच्या जीवावर उठले; लाथाबुक्क्यांनी मारहाण
15
VIDEO: तुर्की संसदेत जोरदार राडा ! आधी खासदारांमध्ये बाचाबाची अन् लाथाबुक्क्यांनी हाणामारी
16
नगरपरिषद निवडणुकीतील यश भाजपाचंच की 'इनकमिंग'चं?; सुप्रिया सुळेंनी मांडला 'हिशेब'
17
मंत्रिपदाचा आणि जिंकण्याचा संबंध नाही, आत्मचिंतनाची गरज; बावनकुळेंचा मुनगंटीवारांवर निशाणा?
18
"ज्यांच्याकडे मुख्यमंत्रिपद तेही कायम नाही, मी योग्य क्षणी..."; सुधीर मुनगंटीवारांनी थेटच सांगितले
19
"…तर तुला कोणीच संघाबाहेर काढू शकणार नाही!" १९८३ च्या वर्ल्ड चॅम्पियनकडून संजू सॅमसनला सल्ला
20
बाजारात जोरदार उसळी! गुंतवणूकदारांनी कमावले ३.५ लाख कोटी रुपये; 'ही' ६ कारणे ठरली गेमचेंजर
Daily Top 2Weekly Top 5

सीएए, एनआरसी, एनपीआर म्हणजे काय रे भाऊ?

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 1, 2020 03:05 IST

देशात सध्या सीएए, एनआरसी, एनपीआरवरुन गदारोळ सुरू आहे

- चक्रधर दळवी / सूर्यकांत पळसकरआसाममध्ये राबविण्यात आलेल्या प्रक्रियेत २२ प्रकारच्या पुराव्यांची कागदपत्रे सादर करण्यास सांगितले होते. नागरिकत्व सिद्ध करण्यात असमर्थ ठरले, त्यांना ‘विदेशी नागरिक लवादा’कडे अपील करण्याची मुभा आहे. लवादाच्या निर्णयालाही आव्हान देण्याचा अधिकार आहे. नागरिकत्व सिद्ध करू न शकलेल्या लोकांना ताबा केंद्रांत (डिटेन्शन सेंटर) ठेवण्यात येणार आहे. त्यानंतर, केंद्र सरकार घुसखोरांच्या देशाशी संपर्क करेल. पकडण्यात आलेल्यांचा तपशील संबंधित देशाने स्वीकारला, तर त्यांना मायदेशी पाठविले जाईल.काय आहे सीएए?सीएए म्हणजे सिटीजनशिप (अ‍ॅमेंडमेंट) अ‍ॅक्ट म्हणजेच नागरिकत्व सुधारणा कायदा. या विधेयकाला लोकसभेने १0 डिसेंबर रोजी मंजुरी दिली. राज्यसभेत मंजुरीनंतर राष्ट्रपतींनी त्यावर शिक्कामोर्तब केले. बांगलादेश, अफगाणिस्तान व पाकिस्तानमधून छळामुळे भारतात पळून आलेल्या हिंदू, ख्रिश्चन, शीख, बौद्ध, जैन आणि पारसी यांना सीएएन्वये भारताचे नागरिकत्व मिळेल. मात्र, त्यासाठी त्यांना छळाला कंटाळून आपण भारतात आलो आहोत, असे सिद्ध करावे लागेल. त्यांना सहा वर्षांत नागरिकत्व दिले जाईल. सध्या ३१ डिसेंबर, २0१४ पूर्वी भारतात आलेल्या सहा धर्मांच्या लोकांना भारताचे नागरिकत्व दिले जाईल. पूर्वी मुदत १२ वर्षांची होती.सर्वोच्च न्यायालयात आव्हानसीएए कायद्याला सर्वोच्च न्यायालयात आव्हान देण्यात आले आहे. हा कायदा घटनाविरोधी असल्याचा आरोप याचिकांत करण्यात आला आहे. पहिल्या सुनावणीत सर्वोच्च न्यायालयाने कायद्याला स्थगिती देण्यास नकार दिला आहे. केंद्र सरकारला प्रतिज्ञापत्र सादर करण्याचे आदेश न्यायालयाने दिले आहेत. या याचिकेवर २२ जानेवारी रोजी सुनावणी आहे.‘सीएए’ला का होत आहे विरोध?हा कायदा लोकांत धार्मिक आधारावर भेदभाव करतो, हा मुख्य आक्षेप विरोधकांनी घेतला आहे. या तीनच देशांतील अल्पसंख्याकांना नागरिकत्व देण्याची तरतूद का, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. ब्रह्मदेशात रोहिंग्या मुस्लिमांचा छळ होतो. श्रीलंकेत तामिळ नागरिकांना छळाचा सामना करावा लागतो. श्रीलंकेतील तामिळ हिंदू असूनही त्यांना भारताचे नागरिकत्व देण्याची तरतूद सीएएमध्ये नाही. हा कायदा मुस्लीमविरोधी असल्याची चर्चा देशभर पसरली आहे. आपले नागरिकत्व हिरावले जाईल का, या भीतीने मुस्लीम समाज या कायद्याविरुद्ध रस्त्यावर उतरल्याचे दिसून आले. पुराव्याअभावी नागरिकत्व पडताळणीत नापास झाल्यास काय, असा प्रश्न आहे. आसामात बांगलादेशातून हिंदूही मोठ्या प्रमाणात घुसखोरी करीत असतात. घुसखोरांमुळे आसामी भाषक अल्पसंख्य होण्याची भीती आहे. त्यामुळे आसामात सीएएला सर्वाधिक विरोध होत आहे. ईशान्येतील आसाम, मेघालय, त्रिपुरा आणि मिझोराम या राज्यांतील जो आदिवासीबहुल भाग घटनेच्या सहाव्या अनुसूचित समाविष्ट असेल, तेथे सीएए लागू होणार नाही. इनर-लाइन परमिट व्यवस्था असलेल्या अरुणाचल प्रदेश, नागालँड आणि मिझोराम या राज्यांतही सीएए लागू होणार नाही. इनर-लाइन परमिट व्यवस्था असलेल्या ईशान्येतील राज्यांना सीएए लागू नसल्यामुळे तेथील घुसखोर आसामात घुसून नागरिकत्व मिळवू शकतात, अशी भीती आसामवासीयांना वाटत आहे.एनपीआर म्हणजे काय?‘एनपीआर’साठी केंद्र सरकारने ३,९४१.३५ कोटी रुपये मंजूर केले आहेत. एनपीआर म्हणजेच नॅशनल पॉप्युलेशन रजिस्टर अर्थात राष्ट्रीय लोकसंख्या नोंदणी. यात रहिवाशांची नोंद असते.या आधी २०१० मध्ये पहिल्यांदा एनपीआर राबविण्यात आले. दर दहा वर्षांनी ते राबविण्यात येईल. एनपीआरअंतर्गत गाव, उपनगर, उपजिल्हा, जिल्हा, राज्य व राष्ट्रीय पातळीवर नागरिकांचा डाटा संकलित केला जातो. नागरिकत्व (नागरिक नोंदणी व राष्ट्रीय ओळखपत्र देणे) नियम-२००३ अन्वये हा उपक्रम राबविला जातो.एनपीआरखाली नोंदणी करणे प्रत्येक रहिवाशासाठी बंधनकारक आहे. एनपीआर नोंदणीसाठी कोणताही पुरावा अथवा बायोमेट्रिक तपशिलाची गरज नाही. रहिवाशांचा डाटाबेस तयार करणे हा याचा उद्देश आहे. आसाममध्ये एनआरसी प्रक्रिया राबविण्यात आलेली असल्यामुळे एनपीआर राबविण्यात येणार नाही. उरलेल्या देशात एनपीआर राबविले जाईल.एनआरसी म्हणजे नॅशनल रजिस्टर आॅफ सिटिझन्स. ‘राष्ट्रीय नागरिकत्व रजिस्टर’ असे त्यास मराठीत म्हणता येईल. एनआरसी म्हणजे देशात राहणाऱ्यांच्या नागरिकत्वाची पडताळणी. ही प्रक्रिया प्रथम आसाममध्ये राबविण्यात आली.काही अनुत्तरीत प्रश्नएनआरसीची हीच प्रक्रिया देशात राबविली जाणार आहे की, काही वेगळी पद्धत अवलंबिली जाईल, याबाबत स्पष्टता झालेली नाही. नागरिकत्व सिद्ध करण्यासाठी कोणती कागदपत्रे द्यावी लागणार, हेही स्पष्ट नाही.

टॅग्स :citizen amendment billनागरिकत्व सुधारणा विधेयकNational Register of Citizensराष्ट्रीय नागरिकत्व नोंदयादी