शहरं
Join us  
Trending Stories
1
Vaibhav Suryavanshi : १४ वर्षांच्या पोराचा धुमाकूळ! सिक्सर मारत ठोकली IPL मधील विक्रमी सेंच्युरी
2
पाकिस्तानवर मोठा प्रहार करा! पहलगाम हल्ल्यानंतर जगभरातील भारतीयांची निषेध आंदोलने
3
विद्यार्थ्यांच्या मनामनात रुजणार भारतीय संविधानाची मूल्ये; नागपूर विद्यापीठाने तयार केला अभ्यासक्रम
4
आनंदाच्या भरात पायाला लागलंय ते विसरला! वैभवच्या शतकी खेळीला द्रविडनं अशी दिली दाद (VIDEO)
5
वेटिंगवाल्या प्रवाशांचा चक्क लिनन बॉक्समधून प्रवास! रेल्वे पोलिसांनी सहा जणांना केली अटक
6
IPL 2025 : वैभव सूर्यंवशीच्या ऐतिहासिक खेळीच्या जोरावर २०० पारच्या लढाईत राजस्थानचा 'रॉयल' विजय
7
विविध रेल्वे गाड्यांमधून दारूच्या एकूण १० हजार बाटल्या जप्त! मद्य तस्करीविरोधात मोठी कारवाई
8
लातूर जिल्ह्यातील हाडोळती येथे युवकाच्या खून प्रकरणी न्यायालयाकडून दाेघांना पोलीस काेठडी
9
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
10
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
11
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
12
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
13
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
14
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
15
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
16
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
17
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
18
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय
19
मुलगी आयएएस अधिकारी झाली, आनंदोत्सवात वडिलांना ह्रदयविकाराचा झटका
20
युरोपात ब्लॅकआउट! फ्रान्स, स्पेनसह अनेक देशांमध्ये वीजपुरवठा खंडित; विमान, मेट्रोसेवा ठप्प

दोषी पोलिसांवर काय कारवाई केली?, बिल्किस बानोप्रकरणी सुप्रीम कोर्टाचे गुजरात सरकारला आदेश

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 24, 2017 04:52 IST

नवी दिल्ली : बहुचर्चित बिल्किस बानो प्रकरणात दोषी ठरवलेल्या पोलीस अधिकाºयांवर काय कारवाई केली, अशी विचारणा सर्वोच्च न्यायालयाने गुजरात सरकारला केली.

नवी दिल्ली : बहुचर्चित बिल्किस बानो प्रकरणात दोषी ठरवलेल्या पोलीस अधिका-यांवर काय कारवाई केली, अशी विचारणा सर्वोच्च न्यायालयाने गुजरात सरकारला केली. गुजरात दंगलीच्या काळात ३ मार्च २००२ रोजी घडलेल्या या घटनेतील दोषींच्या कारवाईबाबत ४ आठवड्यांत माहिती द्यावी, असेही म्हटले आहे.सरन्यायाधीश दीपक मिश्रा, न्या. अजय खानविलकर व धनंजय चंद्रचूड यांच्या खंडपीठाने सामूहिक बलात्कारातील या पीडितेला अधिक भरपाईसाठी नव्याने याचिका दाखल करण्याचे आदेश दिले.मुंबई उच्च न्यायालयाने ४ मे रोजी या प्रकरणात १२ जणांना दोषी ठरवण्याचा व जन्मठेपेची शिक्षा देण्याचा निर्णय कायम ठेवला. त्याचवेळी पाच पोलीस व दोन डॉक्टरांना निर्दोष ठरवले. नरपत सिंग, इद्रिस अब्दुल सय्यद, बिकाभाई पटेल, रामसिंग भभोर, सोमभाई गोरी, अरुण कुमार (डॉक्टर) व संगीता कुमार प्रसाद (डॉक्टर) यांना दोषी ठरवले. कर्तव्यात कसूर करणे व पुराव्यात फेरफार करणे या आरोपाखाली त्यांना दोषी धरले.विशेष न्यायालयाने २१ जानेवारी २००८ रोजी ११ जणांना जन्मठेप ठोठावली. त्याला त्यानंतर त्यांनी मुंबई उच्च न्यायालयात आव्हान दिले होते. सीबीआयनेही उच्च न्यायालयात स्वतंत्र याचिका दाखल करून कठोर शिक्षेची मागणी केली होती.>काय आहे नेमके प्रकरण?अहमदाबादजवळील रणधीकपूर येथे बिल्किस बानोच्या कुटुंबीयांवर हल्ला केल्याचा आरोप होता. त्यात ७ जणांना ठार मारले होते. घटनेच्या वेळी पाच महिन्यांची गर्भवती असलेल्या बिल्किस बानोवर सामूहिक अत्याचार करण्यात आला होता. या खटल्यास अहमदाबादेत सुरुवात झाली. तथापि, साक्षीदारांना धोका होऊ शकतो व सीबीआय पुराव्यांमध्ये फेरफार करू शकते, अशा शंका बिल्किस बानोने उपस्थित केल्यामुळे सर्वोच्च न्यायालयाने हा खटला आॅगस्ट २००४ मध्ये मुंबईत हलवला होता.

टॅग्स :Courtन्यायालय