शहरं
Join us  
Trending Stories
1
रिझर्व्ह बँकेचा 100, 200 रुपयांच्या नोटांबद्दल महत्त्वाचा निर्णय, सर्वसामान्यांना मिळणार दिलासा
2
परप्रांतीय प्रियकराच्या मदतीनं पतीचा काढला काटा; हत्येनंतर अपघाताचा रचला बनाव, पण...
3
‘पीओके’मधील दहशतवादी नेटवर्कवर भारत करणार प्रहार; उच्चस्तरीय विचारविनिमय सुरू; ४२ सक्रिय दहशतवादी तळ केंद्राच्या रडारवर
4
रिस्क घेतली अन् दीड कोटीची सॅलरी सोडून 'तो' भारतात आला; १२ जणांच्या साथीनं उभारला उद्योग
5
आजचे राशीभविष्य, २९ एप्रिल २०२५: सार्वजनिक क्षेत्रात मानहानी होण्याची शक्यता
6
तीन देशांत एकाच वेळी वीज गायब; सर्व काही थांबले; देशभरातील वाहतूक सिग्नलवर परिणाम
7
१६ पाकिस्तानी यूट्युब चॅनेलवर सरकारची बंदी; केंद्रीय गृहमंत्रालयाच्या शिफारशींनुसार बंदी
8
त्यांची जबाबदारी माझ्यावर होती, मी माफी कशी मागू, शब्द नाहीत; मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांनी दिली कबुली
9
नौदलाच्या ताफ्यात येणार फ्रान्सची २६ राफेल विमाने; ६४ हजार कोटींच्या खरेदी करारावर देशांच्या स्वाक्षऱ्या
10
गूढ कायम.. खरं, खोट्याचा होईना उलगडा; डॉ. वळसंगकरांच्या आत्महत्येला दहा दिवस ओलांडले
11
‘म्हाडा’चे ५ हजार घरांचे दिवाळी गिफ्ट; जुन्या इमारतीचाही पुनर्विकास होणार
12
१९ चाळींचा पुनर्विकास एमएमआरडीए करणार; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत महत्त्वपूर्ण निर्णय
13
‘लिव्ह इन’, उत्तराखंड आणि समान नागरी संहिता
14
बुलेट ट्रेन २०२८ अखेरीस मुंबईतून धावणार सुसाट, नवी मुंबई विमानतळ गेम चेंजर ; मुख्यमंत्री फडणवीस
15
मुलांचा ताबा देताना धर्म विचारात घेतला जाऊ शकत नाही : हायकोर्ट
16
कान टोचले, बरे झाले ! केंद्राने विशेष पत्रक काढून माध्यमांना काही मार्गदर्शक सूचना दिल्या
17
पाण्यासाठी भारत-पाक युद्ध पेटण्याची वेळ येऊन ठेपली ?
18
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!

डिलीट केलेल्या फेसबुक पेजमध्ये काय? संसदेतील घुसखोरांचा तपशील मागविला

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 19, 2023 07:07 IST

लोकमत न्यूज नेटवर्क नवी दिल्ली : संसद सुरक्षा भंग प्रकरणात अटक केलेल्या सहा आरोपींची सोशल मीडिया खाती आणि नंतर ...

लोकमत न्यूज नेटवर्कनवी दिल्ली : संसद सुरक्षा भंग प्रकरणात अटक केलेल्या सहा आरोपींची सोशल मीडिया खाती आणि नंतर हटवलेले फेसबुक पेज ‘भगतसिंग फॅन क्लब’ याचा तपशील दिल्ली पोलिसांनी ‘मेटा’कडून मागविला आहे, असे सूत्रांनी सांगितले. याच पेजवरून सर्व आरोपी संपर्कात आले होते.

१३ डिसेंबरच्या घटनेसाठी कोणाकडून पैसे मिळाले आहेत का? हे पाहण्यासाठी दिल्ली पोलिसांच्या विविध पथकांनी रविवारी आरोपींच्या कुटुंबीयांशी संपर्क साधला आणि त्यांच्या बँक खात्यांचा तपशील गोळा केला. नीलम देवी आणि सागर शर्मा यांची बँक पासबुक अनुक्रमे हरयाणाच्या जिंद आणि उत्तर प्रदेशातील लखनौ येथील त्यांच्या घरातून जप्त करण्यात आली, असे सूत्रांनी सांगितले.

दिल्ली पोलिसांच्या गुप्तचर पथकाने फेसबुक, इन्स्टाग्राम आणि व्हॉट्सॲपची मालकी असलेल्या ‘मेटा’ला आरोपींच्या सोशल मीडिया खात्यांमध्ये प्रवेश करण्यासाठी पत्र लिहिले आहे आणि फेसबुक पेज ‘भगतसिंग फॅन क्लब’ जसे की सदस्यांची संख्या इत्यादी तपशील मागितले आहेत. 

जाळलेल्या मोबाइलचे भाग फॉरेन्सिककडे...पोलिसांच्या म्हणण्यानुसार, संसदेच्या सुरक्षा भंगाच्या कटाचा मास्टरमाईंड ललित झा घटनेनंतर राजस्थानच्या नागौरमध्ये लपून बसला होता. तेथेच त्याने आपला मोबाइल फोन फेकून दिला आणि इतर आरोपींचे जाळून टाकले. झा याने दिलेल्या माहितीनुसार, पोलिसांनी नंतर तुटलेल्या आणि जाळलेल्या मोबाइल फोनचे तुकडे जप्त केले. त्यातून डेटा पुन्हा मिळवता येईल का? हे पाहण्यासाठी हे भाग फॉरेन्सिक विभागाकडे पाठविण्यात आले आहेत.

टॅग्स :Parliamentसंसदlok sabhaलोकसभा