शहरं
Join us  
Trending Stories
1
झोपेत बायकोने नवऱ्याच्या अंगावर टाकलं उकळतं पाणी; जीव वाचवण्यासाठी पळताच अ‍ॅसिड टाकून जाळले
2
स्टीलच्या ग्लासात सुतळी बॉम्ब ठेवून फोडला; २० वर्षीय युवक जीवाला मुकला, कुठे घडला भयानक प्रकार?
3
WI vs BAN Super Over : ९ चेंडूंची सुपर ओव्हर! ३ फुकटच्या धावा; तरी वेस्ट इंडिजसमोर बांगलादेशची फजिती
4
भाजपा मंत्र्यांच्या समर्थकांची गुंडगिरी; युवकाला नाक घासून माफी मागायला लावली, पोलिसही हतबल
5
Womens World Cup : लाजिरवाण्या पराभवासह पाक संघ OUT; सेमीसह फायनल भारतात खेळवण्याचा मार्ग मोकळा!
6
सुवर्णाची झळाळी, शिर्डीत लक्ष्मीपूजनाचा सोहळा; साईमंदिरात दिवाळी, साई मूर्तीवर अडीच कोटींचे अलंकार
7
पाकिस्तानात मोठा हल्ला, २५ सैनिक मारले गेले; TTP चा खैबर पख्तूनख्वा इथल्या लष्करी तळावर कब्जा
8
एका रात्रीत मोठा गेम! महायुतीचेच ३ माजी आमदार भाजपा फोडणार?; स्थानिक कार्यकर्तेच संतापले
9
क्रिकेटमधील पराभव जिव्हारी लागला, १०० च्या स्पीडने कार पळवली; दिवाळीची खरेदी करणाऱ्यांना चिरडले
10
ट्रेनमधील पांढऱ्या बेडशीट्स विसरा; भारतीय रेल्वे आता देणार खास प्रिंटेड कव्हर ब्लँकेट्स !
11
Mumbai: व्हॅनमधून रडण्याचा आवाज आला, पोलिसांनी पुढं जाऊन पाहिलं तर...; घटनेनं परिसरात खळबळ!
12
दिवाळीत ₹6 लाख कोटींची विक्रमी उलाढाल; भारतीयांची 'Made In India' वस्तूंना पसंती
13
कोण आहे फ्रांसेस्का ऑर्सिनी? ज्यांच्याकडे ५ वर्षाचा ई-व्हिसा असूनही भारतात प्रवेश नाकारला
14
Crime: आधी हात-पाय बांधले, नंतर उशीनं तोंड दाबलं...; व्यसनमुक्ती केंद्रातील घटनेनं खळबळ!
15
ODI Record: वनडेमध्ये आतापर्यंत कधीच 'असं' घडलं नव्हतं, ते वेस्ट इंडीजनं केलं!
16
सोलापूरात भाजपात दुफळी! "बाहेरून येणाऱ्यांनी किमान ३-४ वर्ष पक्षाचं काम करावं, त्यानंतरच.."
17
मोठी बातमी! १२ हजार भावांनी घेतला लाडकी बहीण योजनेचा लाभ; १६४ कोटींचा घोटाळा आला समोर
18
Mumbai Fire: माजी उपमहापौर अरुण देव यांच्या अंधेरी येथील घराला आग
19
२० एकर जमिनीसाठी लेकीने आईचा घेतला बळी, पतीच्या मदतीने मृतदेह रिक्षात भरला अन् तितक्यात...
20
BCCI: "आशिया चषक भारताला न दिल्यास..." बीसीसीआयचा मोहसिन नक्वी यांना इशारा!

"हिंमत असेल तर अटक करा…!;" घणाघाती आरोप करत ममतांचं भाजपला खुलं आव्हान

By श्रीकृष्ण अंकुश | Updated: November 25, 2020 19:49 IST

मुख्यमंत्री ममता बनर्जी यांनी यावेळी भाजप म्हणजे खोटारडेपणाचा कचरा आणि देशाला लाभलेला सर्वात मोठा अभिशाप असल्याचे म्हटले आहे.

कोलकाता -पश्चिम बंगालमध्ये 2021मध्ये विधानसभा निवडणूक होत आहे. मात्र, भाजप आणि सत्ताधारी तृणमूल काँग्रेस यांच्यात आताच शाब्दिक द्वंद्व सुरू झाले आहे.  तृणमूल काँग्रेसच्या प्रमुख ममता बॅनर्जी यांनी बुधवारी बांकुडा येथे रॅली केली. यावेळी त्यांनी भाजपवर घोडेबाजार करत असल्याचा आरोप केला. एवढेच नाही, तर भाजपला आव्हान देत, हिम्मत असेल, तर मला अटक करा. तृणमूल काँग्रेस कारागृहातूनही निवडणूक जिंकेल. असे ममतांनी म्हटले आहे.

भाजप म्हणजे देशाला लाभलेला सर्वात मोठा अभिशाप - मुख्यमंत्री ममता बनर्जी यांनी यावेळी भाजप म्हणजे खोटारडेपणाचा कचरा आणि देशाला लाभलेला सर्वात मोठा अभिशाप असल्याचे म्हटले आहे. एवढेच नाही, तर पक्ष बदलण्यासाठी भाजप तृणमूल काँग्रेसच्या आमदारांना पैशांचे अमिष दाखवत आहे. भाजपमध्ये हिंमत असेल तर त्यांनी मला अटक करावी. मी कारागृहातूनही तृणमूल काँग्रेसला विजय मिळवून देऊ शकते, असेही ममता म्हणाल्या. बंगाल विधानसभेत 294 जागा आहेत. येथे पुढील वर्षी एप्रिल-मे महिन्यात निवडणूक होणार आहे.

भाजप राजकीय पक्ष नाही, खोटारडेपणाचा कचरा -ममता बॅनर्जी यांनी यावेळी भाजपवर आरोप केला, की काही लोक सट्टेबाजांप्रमाणे काम करत आहेत. त्यांना वाटते, की भाजप सत्तेवर येईल. भाजप राजकीय पक्ष नाही. तर खोटारडेपणाचा कचरा आहे. जेव्ह-जेव्हा निवडणुका येतात, तेव्हा-तेव्हा ते, टीएमसी नेत्यांना घाबरवण्यासाठी नारद आणि शारदा घोटाळ्याचा मुद्दा उपस्थित करतात. मात्र, मी भाजप आणि त्यांच्या संस्थांना घाबरत नाही, असेही ममता म्हणाल्या.

पुन्हा आम्हीच मोठ्या बहुमताने सरकार स्थापन करू -"काही लोक भ्रमात आहेत, की भाजप सत्तेत येईल. त्यामुळे ते चान्स घेण्याचा प्रयत्न करत आहेत. मात्र, मी त्यांना स्पष्टपणे सागू इच्छिते, की भजप सत्तेत येणाचा ना चान्स आहे, ना ते ‘बाय चान्स’ सरकार बनवू शकता. पुन्हा आम्हीच मोठ्या बहुमताने सरकार स्थापन करू," असेही ममता म्हणाल्या. पश्चिम बंगालमध्ये 2011पासूनच ममता बॅनर्जी यांच्या नेतृत्वात टीएमसीचे सरकार आहे.

टॅग्स :Mamata Banerjeeममता बॅनर्जीtmcठाणे महापालिकाBJPभाजपाNarendra Modiनरेंद्र मोदीwest bengalपश्चिम बंगाल