शहरं
Join us  
Trending Stories
1
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
2
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
3
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
4
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
5
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
6
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
7
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
8
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
9
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
10
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
11
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
12
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
13
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
14
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
15
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
16
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
17
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
18
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
19
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
20
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
Daily Top 2Weekly Top 5

अल्पसंख्याक विद्यार्थांसाठी वेगळे भोजन सभागृह; ममता बॅनर्जींचे आदेश

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 28, 2019 15:58 IST

यासाठी सरकारी आणि सरकारी अनुदानिक शाळांमध्ये ७० टक्क्यांपेक्षा जास्त अल्पसंख्याक विद्यार्थी असलेल्या शाळांची यादी राज्य सरकारने मागवली आहे.

कोलकाता - देशाच्या राजकरणात केंद्रबिंदू बनलेल्या पश्चिम बंगालमध्ये, राज्य सरकारने घेतलेल्या एका निर्णयाने पुन्हा नवीन वादाला तोंड फुटले आहे. अल्पसंख्याक बहुल सरकारी शाळांमध्ये अल्पसंख्याक विद्यार्थी आणि विद्यार्थिनींसाठी वेगळे भोजन सभागृह बनवावे, असे आदेश ममता बॅनर्जींच्या राज्य सरकारने दिले आहेत. तर दुसरीकडे, भाजपने या निर्णयावरून तृणमूल काँग्रेस सरकारवर टीका केली आहे. 

पश्चिम बंगालमध्ये असलेल्या अल्पसंख्याक  सरकारी शाळांमध्ये अल्पसंख्याक विद्यार्थी आणि विद्यार्थिनींसाठी वेगळे भोजन सभागृह बनवावे असे आदेश पश्चिम बंगालच्या राज्य सरकराने दिले आहे. यासाठी सरकारी आणि सरकारी अनुदानिक शाळांमध्ये ७० टक्क्यांपेक्षा जास्त अल्पसंख्याक विद्यार्थी असलेल्या शाळांची यादी राज्य सरकारने मागवली आहे. राज्य अल्पसंख्याक आणि मदरसा शिक्षण विभागाकडून हे निर्देश देण्यात आले आहेत. मात्र यावर भाजपने आक्षेप घेतला आहे.

शिक्षण घेणाऱ्या मुलांनाही धर्माचे धडे द्यायचे आहे का, धर्माच्या आधारे विद्यार्थ्यांमध्ये भेदभाव का करण्यात येत आहे. विद्यार्थ्यांमध्ये द्वेषभावना पसरवण्यामागे काय हेतू आहे. असे प्रश्न भाजपने उपस्थित केले आहेत. तृणमूल काँग्रेस आणि भाजपमधील एकमेकांवर केलेल्या आरोपाने पश्चिम बंगालचे राजकीय वातावरण ढवळून निघाले आहेत, त्यातच राज्य सरकारने हे आदेश दिल्याने आता नवीन वादाला तोंड फुटले आहे.