शहरं
Join us  
Trending Stories
1
विमान अपघातात सापडलेली भगवदगीता, कृष्ण मूर्ती कोणाची? एअर इंडियाची क्रू मेंबर असलेल्या पनवेलच्या लेकीची...
2
इराणच्या आकाशात इस्रायलची विमाने, गॅस रिफायनरीवर हल्ला; डिफेंस सिस्टीम उध्वस्त
3
आयुष्यात कधीच विमानात बसणार नाही; व्हिडीओ रेकॉर्ड करणाऱ्या आर्यनने घेतली धास्ती, पोलीस चौकशीनंतर...
4
अमेरिकेत मोठी घटना! दोन खासदारांवर घरात घुसून गोळीबार; महिला खासदार, पतीचा मृत्यू
5
नीट-यूजीचा निकाल जाहीर! राजस्थानचा महेश कुमार पहिला, तर महाराष्ट्राचा कृष्णांग जोशी तिसरा
6
एअर इंडियाकडून मदत जाहीर, मृतांच्या नातेवाईकांना २५ लाखांची मदत देणार; टाटा सन्सचेही १ कोटी मिळणार...
7
दुबईतील ६७ मजली गगनचुंबी इमारतीला भीषण आग; ३,८२० रहिवाशांना बाहेर काढले
8
पहिल्या डावात झिरो, तोच फायनलचा हिरो! मार्करम हा शतकातील असा पहिला 'शतकवीर' ज्यानं...
9
उल्हासनगरला पावसाने झोडपले, नाल्यावरील पूल कोसळला 
10
टेम्बा बावुमाच्या कॅप्टन्सीला तोड नाही; आतापर्यंत एक टेस्ट नाही हारला! ऑस्ट्रेलिया तोंड पाडून घरला
11
Ahmedabad Plane Crash : "माणुसकी दाखवा, माझी मुलगी रुग्णालयात..."; विमान अपघातानंतर डॉक्टरची हात जोडून विनंती
12
राज-उद्धव ठाकरे एकत्र आले तर महापालिका निवडणुकीत ५४ टक्के मते मिळतील; सर्व्हे आल्याचा शिवसेना नेत्याचा दावा
13
बलात्कार करणाऱ्याला महिलेने घडवली जन्माची अद्दल; विळ्याने नराधमाचे गुप्तांगच कापले
14
लंच ब्रेक झाला म्हणून २० वर्षीय तरुणी घरी गेली; बेडरुममध्ये तिचा बॉस... 
15
SA Won WTC Final 2025 : 'चोकर्स'चा शिक्का पुसला, द. आफ्रिकेने इतिहास रचला; ऑस्ट्रेलियाला हरवून २७ वर्षांनी जिंकली ICC ट्रॉफी! मार्करमचे धमाकेदार शतक
16
Israel Rran War: 'हल्ले थांबवा नाहीतर तेहरानला आग लावू'; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इराणच्या खोमेनींना इशारा
17
आत्महत्येबाबत इन्स्टावर तरूणाने टाकली पोस्ट; १२ मिनिटांत पोलिसांनी फासावरून खाली उतरवला
18
WTC 2025 Final Prize Money : चांदीची गदा अन् IPL चॅम्पियन्स RCB पेक्षा अधिक रक्कम; दक्षिण आफ्रिकेसह कोणत्या संघाला किती बक्षीस मिळालं?
19
रोज विमाने उडतात, पण या विमानातून आवाजच येत नव्हता...; व्हिडीओ काढणाऱ्या तरुणाच्या काकीला वाटले...
20
इराण-इस्रायल युद्ध लांबलं तर 'या' महत्वाच्या वस्तू महागणार! जाणून घ्या, या देशांकडून काय-काय आयात करतो भारत?

ममता बॅनर्जींना धक्का; कोलकाता घटनेच्या निषेधार्थ खासदाराचा राजीनामा, पक्षावर गंभीर आरोप

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 8, 2024 13:56 IST

West Bengal Mamata Banerjee TMC : कोलकाता बलात्कार अन् हत्या प्रकरणात ममता बॅनर्जींना कोणतीही ठोस कारवाई न केल्याचा आरोप खासदाराने केला आहे.

West Bengal Mamata Banerjee TMC : पश्चिम बंगालमधील सत्ताधारी तृणमूल काँग्रेसला मोठा धक्का बसला आहे. आरजी कार मेडिकल महाविद्यालय आणि हॉस्पिटलमध्ये घडलेल्या पाशवी घटनेच्या निषेधार्थ पक्षाचे राज्यसभा खासदार जवाहर सरकार (Jawhar Sircar) यांनी खासदारपदाचा राजीनामा दिला. त्यांनी मुख्यमंत्री ममता बॅनर्जी (Mamata Banerjee) यांना पत्र लिहून राजीनामा दिल्याची माहिती दिली आहे. तसेच दोषींना कठोर शिक्षा व्हावी, असेही पत्रात म्हटले आहे.

जवाहर सरकार यांनी ममता बॅनर्जी यांना लिहिलेल्या पत्रात म्हटले की, आरजी कार हॉस्पिटलमधील घडलेल्या घटनेमुळे मला खुप वेदना होत आहेत. त्या क्रूर घटनेबाबत मुख्यमंत्री तातडीने काही कठोर कारवाई करतील, अशी अपेक्षा होती. त्या आपल्या जुन्या शैलीत कारवाई करतील असे वाटले होते, पण त्यांनी कोणतेही ठोस पाऊल उचलले नाही. कारवाई करण्यासही उशीर केला. 

जवाहर सरकार पुढे म्हणतात, या प्रकरणात राज्य सरकार जी काही पावले उचलत आहे, ती पुरेशी नाहीत. त्या घटनेनंतर सरकारने भ्रष्ट डॉक्टरांवर आणि दोषींवर ताबडतोब कारवाई केली असती, तर राज्यातील परिस्थिती फार पूर्वीच सामान्य झाली असती.  राज्यात लवकरच शांतता प्रस्थापित व्हावी आणि दोषींना कठोर शिक्षा व्हावी, अशी अपेक्षा करतो. या पत्रात सरकार यांनी पक्षातील भ्रष्टाचाराचा मुद्दाही उपस्थित केला आहे. ते म्हणाले की, पंचायत आणि नगरपालिकांमधील स्थानिक पातळीवरील पक्षाच्या नेत्यांनी प्रचंड संपत्ती जमा केली आहे, त्यामुळे बंगालच्या जनतेचे नुकसान झाले आहे. 

आंदोलनाचा मुख्य प्रवाह अराजकीय आहे, असे माझे मत आहे आणि त्याला राजकीय म्हणत संघर्ष निर्माण करणे योग्य नाही. राज्यातील आंदोलक तरुण-तरणींना राजकारण नको, न्याय हवा आहे. हे आंदोलन जितके महिला प्रशिक्षणार्थी डॉक्टरांसाठी आहे तितकेच राज्य सरकारचे आहे. त्यासाठी सरकारने तातडीने सुधारणा करणे आवश्यक आहे, अन्यथा जातीयवादी शक्ती या राज्याचा ताबा घेतील. मला बंगालचे प्रश्न खासदार म्हणून मांडण्याची संधी दिली त्याबद्दल आभार मानतो, पण आता मला खासदार म्हणून अजिबात राहायचे नाही, असे ते आपल्या पत्रात म्हणाले.

टॅग्स :Mamata Banerjeeममता बॅनर्जीtmcठाणे महापालिकाwest bengalपश्चिम बंगाल