शहरं
Join us  
Trending Stories
1
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
2
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
3
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
4
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
5
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
6
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
7
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
8
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
9
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
10
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
11
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलरचा ट्रेंड; ब्लू, रेड, गोल्डन केसांवरुन जाणून घ्या व्यक्तिमत्वाचं रहस्य
12
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
13
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
14
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
15
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
16
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
17
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
18
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
19
धोक्याची घंटा! तुम्हीही जेवताना फोन वापरताय? एका चुकीमुळे आतड्यांचं होतं गंभीर नुकसान
20
Travel : हिमालयातील निळ्याशार पाण्याचा स्वर्ग! 'चंद्रताल'ला जाण्याचा प्लॅन करताय तर 'हे' नक्की वाचा
Daily Top 2Weekly Top 5

Mamata Banerjee on PM Modi : 'ED-CBIच्या गैरवापरात पंतप्रधान मोदींचा हात नाही'; ममता बॅनर्जींचं आश्चर्यचकित करणारं विधान

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 20, 2022 11:13 IST

खरे तर, सीबीआय आणि ईडी सारख्या केंद्रीय संस्था ​​पश्चिम बंगालमध्ये अनेक प्रकरणांचा तपास करत आहेत. यात तृणमूल काँग्रेसचे अनेक वरिष्ठ नेते आरोपी आहेत.

राज्यातील केंद्रीय संस्थांच्या कारवायांमागे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा हात आहे, असे आपल्याला वाटत नाही, असे पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी म्हटले आहे. एवढेच नाही, तर भाजप नेत्यांचा एक गट आपले हीत साध्य करण्यासाठी या संस्थांचा गैरवापर करत आहे, असा आरोपही ममता बॅनर्जी यांनी केला आहे.

केंद्रीय तपास यंत्रणांच्या "अतिरेका"विरोधात विधानसभेत मांडण्यात आलेल्या एका ठरावावर बोलताना पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी, केंद्र सरकारचा अजेंडा आणि त्यांच्या पक्षाचे हितसंबंध एकत्र येऊ नयेत, याची काळजी घेण्यात यावी, असे आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना केले आहे. भाजपने या प्रस्तावाला विरोध केला होता. यानंतर, हा प्रस्ताव विधानसभेत मंजूर करण्यात आला.

'केंद्र हुकूमशाह सारखे वागत आहे' -बॅनर्जी म्हणाल्या, 'केंद्रातील सध्याचे सरकार एखाद्या हुकूमशाह सारखे वागत आहे. हा प्रस्ताव कुण्या एका विशेष घटनाविरोधात नाही. तर केंद्रीय संस्थांच्या पक्षपाती कामकाजाविरोधात आहे.' तर ईडी आणि सीबीआय विरोधातील अशा प्रकारचा प्रस्ताव विधानसभेच्या नियमांविरोधात आहे, असे भाजपने म्हटले आहे. हा प्रस्तावाच्या बाजूने  189 तर विरोधात 69 मते पडली.

'भाजप नेते रोजच्या रोज देतात धमकी' -खरे तर, सीबीआय आणि ईडी सारख्या केंद्रीय संस्था ​​पश्चिम बंगालमध्ये अनेक प्रकरणांचा तपास करत आहेत. यात तृणमूल काँग्रेसचे अनेक वरिष्ठ नेते आरोपी आहेत. बॅनर्जी म्हणाल्या, 'भाजप नेते रोज विरोधी पक्षातील नेत्यांना सीबीआय आणि ईडीची धमकी देत आहेत. केंद्रीय संस्थांनीही देशात अशा पद्धतीने कामकरणे योग्य आहे? यामागे पंतप्रधान नरेंद्र मोदी असतील, असे मला वाटत नाही. मात्र, काही भाजप नेते अपल्या हितासाठी सीबीआय आणि ईडीचा गैरवापर करत आहेत.'

टॅग्स :Mamata Banerjeeममता बॅनर्जीNarendra Modiनरेंद्र मोदीwest bengalपश्चिम बंगाल