शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
3
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
4
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
5
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
6
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
7
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
8
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
9
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
10
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
11
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
12
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
13
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
14
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
15
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
16
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
17
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
18
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
19
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
20
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
Daily Top 2Weekly Top 5

West Bengal Lockdown: पश्चिम बंगालमध्ये लॉकडाऊन; शाळा-कॉलेज बंद, दिल्ली-मुंबई फ्लाइट आठवड्यातून फक्त दोनदा

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 2, 2022 17:49 IST

West Bengal Corona: कोरोना रुग्णांच्या संख्येतील वाढ आणि ओमायक्रॉन संसर्गाच्या पार्श्वभूमीवर पश्चिम बंगालमध्ये सरकारने हे नियम लागू केले आहेत.

कोलकाता: मागील काही दिवसांपासून होत असलेली कोरोना रुग्णांच्या संख्येतील वाढ आणि ओमायक्रॉन संसर्गाच्या पार्श्वभूमीवर पश्चिम बंगालमध्ये सरकारने कठोर नियम लागू केले आहेत. सोमवार(3 जानेवारी)पासून राज्यातील सर्व शैक्षणिक संस्था बंद ठेवण्याचे आणि कर्मचाऱ्यांची कार्यालयातील उपस्थिती 50 टक्क्यांपर्यंत मर्यादित ठेवण्याचे आदेश देण्यात आले आहेत.

विमानांना दोन दिवस परवानगीयासोबतच राज्य सरकारने दिल्ली आणि मुंबईहून येणाऱ्या विमानांना आठवड्यातून दोनदाच उड्डाण करण्याचे आदेश दिले आहेत. दिल्ली आणि मुंबईमध्ये कोरोना विषाणू आणि ओमिक्रॉन प्रकारांची सर्वाधिक प्रकरणे आहेत. या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने हा निर्णय घेतला आहे. तर, कोलकाता ते ब्रिटनचे साप्ताहिक विमान याआधीच रद्द करण्यात आले आहे.

ममता बॅनर्जींनी रद्द केला कार्यक्रमपश्चिम बंगालमध्ये कोरोनाच्या वाढत्या संसर्गानंतर सद्यस्थितीचा आढावा घेऊन हा निर्णय घेण्यात आला आहे. कोरोना संसर्गामुळे मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी सोमवारी नेताजी इनडोअर स्टेडियमवर होणारा कार्यक्रम रद्द करण्याची घोषणा केली आहे. मुख्य सचिव एचके द्विवेदी यांनी सांगितले की, बंगालमधील सर्व शाळा, महाविद्यालये आणि विद्यापीठे उद्यापासून बंद राहतील. खासगी आणि सरकारी कार्यालयातील उपस्थिती 50 टक्क्यांपर्यंत कमी असेल. तसेच, आठवड्यातून दोन दिवस (सोमवार आणि शुक्रवारी) मुंबई आणि दिल्लीहून उड्डाणे चालतील.

हे निर्बंध लादण्यात आले

  • 3 जानेवारीपासून सर्व शाळा, महाविद्यालये, विद्यापीठे बंद राहणार आहेत.
  • सर्व कार्यालयांमध्ये केवळ 50 टक्के उपस्थितीची परवानगी असेल.
  • सर्व जलतरण तलाव, स्पा आणि ब्युटी पार्लर बंद राहतील.
  • पर्यटन स्थळे, प्राणीसंग्रहालय, सिनेमागृहे बंद राहतील.
  • शॉपिंग मॉल्समध्ये फक्त 50 टक्केच हजेरी लावता येईल.
  • सभा, हॉल आणि कॉन्फरन्समध्ये 50 टक्के उपस्थितीची परवानगी असेल.
  • लोकल गाड्या 50 टक्के क्षमतेने धावतील आणि संध्याकाळी 7 वाजेपर्यंतच चालू राहतील.
  • मेट्रोही 50 टक्के क्षमतेने धावणार आहे.
  • होम डिलिव्हरी करताना प्रोटोकॉल पाळावा लागतो.
  • रात्री 10 ते सायंकाळी 5 वाजेपर्यंत संचारबंदी लागू असेल, 
  • या काळात केवळ अत्यावश्यक सेवांना सूट असेल.
टॅग्स :west bengalपश्चिम बंगालcorona virusकोरोना वायरस बातम्याMamata Banerjeeममता बॅनर्जी