शहरं
Join us  
Trending Stories
1
चिंताजनक! युद्धविरामानंतरही होर्मुझ मार्ग असुरक्षित; सागरी सुरुंग कुठे पेरले? इराणच विसरला
2
“प्रत्येक गोष्टीसाठी कोर्टाची पायरी चढू नका”; सुप्रीम कोर्टाने फेटाळल्या २५ जनहित यचिका
3
"खरातमुळे दिल्लीत आमची चेष्टा होतेय, महाराष्ट्राचं हसू झालंय"; भोंदू बाबाच्या कृत्यांवर सुप्रिया सुळे संतापल्या
4
पतीच्या डोळ्यासमोरच बुडत होती पत्नी, पण...; बोट दुर्घटनेमुळे हसतं-खेळतं कुटुंब झालं उद्ध्वस्त
5
Gold Price Today: महिन्याभरात सोनं १०,१३१ रुपयांनी झालं स्वस्त; चांदी ३२,८९६ रुपयांनी घसरली; पाहा काय आहे नवी किंमत?
6
मराठवाडा हादरला! हिंगोली, परभणी आणि नांदेड जिल्ह्यांना भूकंपाचे सौम्य धक्के; नागरिकांची घराबाहेर धाव
7
कस्टम ऑफिसर बनून फिल्मी स्टाईलने १५ किलो सोन्याची लूट; दीड वर्ष रेकी, रचला भयंकर कट
8
Mathura Boat Tragedy : मथुरा दुर्घटनेआधीचा Video व्हायरल; बोट उलटण्यापूर्वी भजन-कीर्तनात तल्लीन होते भाविक
9
₹७.५ कोटींना खरेदी केलेलं अपार्टमेंट, ८.८७ कोटींना विकून कमावलं १८% प्रॉफिट; इनव्हेस्टमेंटचा 'टायगर' निघाला श्रॉफ
10
“बाकी कोणताच पर्याय नाही, केवळ चर्चा करण्यापुरते जिवंत आहात”; ट्रम्प यांची इराणला उघड धमकी
11
'त्या' १६५ चिमुकल्यांचे रक्ताळलेले दप्तर अन् शूज घेऊन इराण वाटाघाटीला; चर्चेआधीच अमेरिकेची कोंडी
12
EPFO 3.0: बँक खात्याप्रमाणे काढू शकाल PF चे पैसे, किती असेल UPI आणि ATM मधून विड्रॉल लिमिट? 
13
“बारामतीतून उमेदवार मागे घेणे हा शेवट नाही तर आरंभ, काँग्रेस लढवय्या पक्ष”: हर्षवर्धन सपकाळ
14
सिन्नरमध्ये भीषण अपघातात चौघांचा होरपळून मृत्यू; जागरण गोंधळावरून परतताना काळाचा घाला
15
बेकायदेशीर खासगी सावकारांविरुद्ध कठोर कारवाई करा; सर्वोच्च न्यायालयाचे निर्देश
16
"अटी मान्य केल्या तरच चर्चा"; इराणचे शिष्टमंडळ पाकिस्तानात दाखल; अमेरिकेला दिला स्पष्ट इशारा
17
अभिमानास्पद! भारताच्या 'प्रोटोटाइप फास्ट ब्रीडर रिॲक्टर'ची जागतिक स्तरावर प्रशंसा
18
न्यायमूर्ती यशवंत वर्मा यांचा राजीनामा, घरात सापडल्या होत्या जळलेल्या नोटा
19
होर्मुझच्या सामुद्रधुनीवर इराणची पकड कायम, टोल वसुली चालू; ६ जहाजे रवाना
Daily Top 2Weekly Top 5

अनुच्छेद 370 हटवल्यावरून मुख्यमंत्री ममतांचा भाजपवर निशाणा, केलं मोठं विधान

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 14, 2021 20:37 IST

“आम्ही पश्चिम बंगालमध्ये कुणालाही दुफळी निर्माण करू देणार नाही. जर भाजपला वाटत असेल, की ते कुठलाही भाग विकू शकतात, तर ते एवढे सोपे नाही. ते दिल्ली सांभाळू शकत नाही. जे लोक बंगालमध्ये दुफळी निर्माण करण्याचा प्रयत्न करतील त्यांना बंगालचे नागरिकांकडून योग्य उत्तर मिळेल."

कोलकाता - पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी अनुच्छेद 370 हटविल्यावरून भाजपवर निशाणा साधला आहे. अनुच्छेद 370 हटविल्याने काश्मिरी नागरिकांचे स्वातंत्र्य, त्यांच्या मागण्या आणि त्यांचे हित कमकुवत झाले आहे, असे ममतांनी म्हटले आहे. त्या माध्यमांशी बोलत होत्या. 

बंगालमध्ये कुणालाही दुफळी निर्माण करू देणार नाही - मुख्यमंत्री ममता बॅनर्जी सोमवारी माध्यमांशी बोलताना म्हणाल्या, “आम्ही पश्चिम बंगालमध्ये कुणालाही दुफळी निर्माण करू देणार नाही. जर भाजपला वाटत असेल, की ते कुठलाही भाग विकू शकतात, तर ते एवढे सोपे नाही. ते दिल्ली सांभाळू शकत नाही. जे लोक बंगालमध्ये दुफळी निर्माण करण्याचा प्रयत्न करतील त्यांना बंगालच्या नागरिकांकडून योग्य उत्तर मिळेल." एवढ्यावरच ममता थांबल्या नाही, तर एवढ्या मोठ्या निवडणुकीत पराभूत होऊनही त्यांना कसल्याही प्रकारची शरम नाही, असेही ममता म्हणाल्या. 

बंगाल भाजपत मोठी फूट? 74 पैकी फक्त 51 आमदारांनाच राजभवनात नेऊ शकले सुवेंदू

एक देश-एक रेशन कार्ड प्रणालीला विरोध नाही -सर्वोच्च न्यायालयाच्या एक देश एक रेशन कार्ड धोरणाचा स्वीकार करण्यासंदर्भात बंगालच्या मुख्यमंत्री म्हणाल्या, "आम्हाला एक जेश-एक रेशन कार्ड प्रणालीसंदर्भात कसल्याही प्रकारची समस्या नाही. आम्ही तीन महिन्यांतच लागू करू. काही लोकांकडे आधारकार्ड नाही, आम्ही तयार करत आहोत," असेही ममता म्हणाल्या.

भाजप नेते टीएमसीच्या संपर्कात असल्याच्या बातम्या -टीएमसी सोडून भाजपत गेलेले मुकूल रॉय नुकतेच पुन्हा ममता बॅनर्जींसोबत गेले आहेत. भारतीय जनता पक्षाचे आणखी काही नेते टीएमसीच्या संपर्कात असल्याच्या बातम्या आहेत. एकूण परिस्थिती पाहता, भाजपचे अनेक आमदार पुन्हा टीएमसीत जाण्याची शक्यता असल्याचे बोलले जात आहे. मात्र, अशा प्रकारची कुठल्याही प्रकारची बंडखोरी होणार नाही, असे भाजपचे म्हणणे आहे.

टॅग्स :Mamata Banerjeeममता बॅनर्जीBJPभाजपाwest bengalपश्चिम बंगालArticle 370कलम 370