शहरं
Join us  
Trending Stories
1
Baramati By Election 2026: “सुनेत्राकाकींना बिनविरोध निवडून देण्यासाठी सहकार्य करा”; रोहित पवारांचे काँग्रेसला आवाहन
2
मस्साजोग सरपंचपदाची पोटनिवडणूक बिनविरोध होणार? संतोष देशमुखांच्या पत्नी उमेदवारी अर्ज भरणार
3
इस्रायलच्या हल्ल्यांनं लेबनान हादरला, १० मिनिटांत १०० हून अधिक ठिकाणी हल्ले! २५४ जणांचा मृत्यू, अनेक जखमी; इराण म्हणाला...
4
पाकिस्तान खोटारडा निघाला...! सीजफायरच्या नावाखाली इराणचा गेम? की अमेरिकेनं मोडला करार...? लेबनानवरून नवा वाद
5
इंजेक्शन, गर्लफ्रेंड अन् डिजिटल पुरावे; डॉ. कृतिका रेड्डी हत्याप्रकरणात पतीच्या चॅटने फिरली चक्र
6
इराणनं विश्वासघात केला तर, सर्वनाश अटळ! ट्रम्प यांचा इशारा, होर्मुजजवळ अजूनही युद्धनौका तैनात
7
Top Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीची निवडणूक बिनविरोध करावी; शरद पवारांचा सल्ला
8
स्मृती मानधना आणि पलाश मुच्छल यांच्यातील दुरावा मिटला? कुटुंबातील सदस्यांचा एकत्रित फोटो व्हायरल
9
“इराणच्या १० कलमी प्रस्तावाला ट्रम्प यांनी दाखवली केराची टोपली”; व्हाइट हाऊसने सगळे सांगितले
10
"पाकिस्तान विश्वासार्ह नाही!" इस्रायली राजदूताचा अमेरिकेला घरचा आहेर; जेडी व्हॅन्स यांच्या पाकिस्तान दौऱ्यापूर्वीच खळबळ
11
Numerology: नशिबाची साथ हवीय? मग महत्त्वाच्या कामाला जाताना आपल्या जन्मतारखेनुसार वापरा 'हा' खास रंग!
12
पाकिस्तानचा पोपट झाला, युद्धविरामाच्या अटींबाबत शाहबाज शरीफ यांचा दावा जेडी वेन्स यांनी फेटाळला
13
Gold Silver Price Today: बाजार उघडताच सोन्या-चांदीच्या दरात मोठी घसरण; Silver ₹४,७०० नं स्वस्त, Gold चे दर काय?
14
केजचे तहसीलदार राकेश गिड्डे यांचा अपघाती अंत; कार्यक्षम अधिकाऱ्याच्या मृत्यूने बीड जिल्हा सुन्न!
15
३९ दिवसांच्या युद्धानंतर इराण, अमेरिका, इस्रायल... कुणी काय कमावले, काय गमावले?
16
STतील सफाईचा प्रवाशांना भूर्दंड; आधी दरवाढ केली, आता ‘स्वच्छता अधिभार’ लावला, प्रवास महागला
17
Post Office च्या 'या' स्कीममध्ये व्याजाद्वारेच मिळतील ४.४० लाख; ३०० रुपयांच्या बचतीतून तयार होईल १५ लाखांचा फंड
18
Share Market: शेअर बाजारात घसरण: सेन्सेक्स ५०० हून अधिक अंकांनी घसरला, निफ्टी २३,९०० च्या खाली
19
नाशिकमध्ये नामांकित कंपनीतील ८ जणींचा विनयभंग; एकीवर 'अतिप्रसंग'; ६ जणांना अटक
20
एक डॉलर प्रति बॅरल, त्यासोबत..., होर्मुझवरील टोलसाठी इराणने तयार केला असा नियम   
Daily Top 2Weekly Top 5

भाजपाचं नाव 'भारत जलाओ पार्टी' ठेवलं पाहिजे; ममता बॅनर्जींचं प्रत्युत्तर

By जयदीप दाभोळकर | Updated: January 25, 2021 17:35 IST

आपला देशाच्या पंतप्रधानांसमोर अपमान करण्यात आला, ममता बॅनर्जींंच वक्तव्य

ठळक मुद्देयापूर्वी एका कार्यक्रमात जय श्रीरामच्या घोषणेनंतर ममता बॅनर्जींनी व्यक्त केला होता संतापदेशाच्या पंतप्रधानांसमोर आपला अपमान, ममता बॅनर्जींचं वक्तव्य

कोलकात्यात नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या १२५ व्या जयंतीनिमित्त एका कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आलं होतं. या कार्यक्रमात 'जय श्रीराम'च्या घोषणा देण्यात आल्या. मुख्यमंत्री ममता बॅनर्जी व्यासपीठावर भाषण करण्यासाठी जात असताना या घोषणा देण्यात आल्या. त्यामुळे नाराज होत ममता बॅनर्जी यांनी भाषण करण्यास नकार दिला. तसंच त्यांनी ही गर्दी एका खास पक्षाची असल्याचा आरोप भाजपावर केला होता. कोलकाता येथील व्हिक्टोरिया मेमोरियल येथे हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमात पंतप्रधान नरेंद्र मोदी देखील उपस्थित होते. यावेळी देण्यात आलेल्या घोषणाबाजीला ममता बॅनर्जी यांनी कडाडून विरोध दर्शवला होता. दरम्यान, ममता बॅनर्जींनी हा प्रकार म्हणजे बंगालचा आणि नेताजी सुभाषचंद्र बोस यांचा अवमान असल्याचं म्हणत भाजपावर जोरदार टीका केली."व्हिक्टोरिया मेमोरिअल येथे आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत मला अपमान सहन करावा लागला. भाजपानं बंगालच्या प्रतिष्ठित लोकांचा यापूर्वीही अपमान केला आहे. आताही भाजपा तसंच करत आहे. भाजपाचं नाव भारत जलाओ पार्टी असं ठेवलं पाहिजे," असं म्हणत ममता बॅनर्जी यांनी भाजपावर निशाणा शाधला. हुगळीमध्ये आयोजित करण्यात आलेल्या एका कार्यक्रमादरम्यान त्या बोलत होत्या. "आपला शिरच्छेद केला तरी चालेल पण आपण भाजपासमोर कधीही झुकणार नाही," असंही त्या म्हणाल्या. दरम्यान, जर आपल्याला बंदुक दाखवली तर आपण बंदुकीचं संदुक दाखवू शकतो. परंतु आपण राजकारणावर विश्वास करतो, बंदुकीवर नाही, असंही त्या म्हणाल्या. "तुम्ही कोणाला घरी बोलावून त्याचा अपमान कराल का?  ही बंगाल किंवा आपल्या देशाची संस्कृती आहे का? नेताजींच्या सन्मानार्थ घोषणा देण्यात आल्या असत्या तर मला काहीच वाटलं नसतं. परंतु मला डिवचण्यासाठी ज्याचा कार्यक्रमाशी काहीच संबंध नाही त्या घोषणा देण्यात आल्या. माझा देशाच्या पंतप्रधानांसमोर अपमान करण्यात आला," असंही ममता बॅनर्जी म्हणाल्या.

टॅग्स :BJPभाजपाtmcठाणे महापालिकाMamata Banerjeeममता बॅनर्जीprime ministerपंतप्रधानNarendra Modiनरेंद्र मोदी