शहरं
Join us  
Trending Stories
1
"मी तुमची अनेक प्रकरणे पाहिली आहेत; बोललो तर उगाच...", CJI गवईंनी ईडीला फटकारले
2
गायिका मैथिली ठाकूरचा भाजपमध्ये प्रवेश! दुसऱ्या यादीत येणार नाव, कोणत्या मतदारसंघातून लढणार?
3
तो बापाच्या वशिल्यावर टीम इंडियात आलेला नाही, असं का म्हणाले गंभीर? जाणून घ्या त्यामागचं कनेक्शन
4
मनसेचा मविआमध्ये समावेश होणार की नाही? प्रस्तावाबाबत हर्षवर्धन सपकाळ यांनी स्पष्टच सांगितलं  
5
जैसलमेरमध्ये धावत्या बसला भीषण अचानक आग; १०-१२ जणांचा होरपळून मृत्यू झाल्याची भिती
6
घायवळला मोक्का लावला, रोहित पवारांनी तो उठवला; सभापती राम शिंदे यांचा गौप्यस्फोट
7
BJP Candidate list: भाजपने १० विद्यमान आमदारांची तिकिटं कापली, ५ जण आहेत माजी मंत्री; पहिल्या यादीमध्ये कोण?
8
३१ व्या मजल्यावरून पडला, चप्पल, मोबाईल सापडले २४ व्या मजल्यावर, तरुणाच्या मृत्यूचं गुढ वाढलं   
9
लष्कराकडून जेन-Z वर गोळीबार करण्यास नकार, जीव वाचवून राष्ट्रपती देशाबाहेर पसार, या देशात अराजक
10
वेस्ट इंडीजच्या नाकी नऊ आणणाऱ्या रवींद्र जडेजाची सचिन-सेहवागच्या विक्रमाशी बरोबरी!
11
'आयटीआय'मध्ये मंत्र शिकवणार अन् कुंभमेळ्यात पौरोहित्य करणार; नवा अभ्यासक्रम सुरू
12
...अन् हमासने बिपिन जोशीचा मृतदेहच सोपवला, लेकाच्या सुटकेसाठी अमेरिकेचेही दार ठोठावणाऱ्या आईवर मोठा 'आघात'
13
विक्रमी वाढ, चांदी १,९५,००० रुपयांवर, इतिहासात प्रथमच एका दिवसात १५,००० रुपयांनी महागली
14
अखेर मुहूर्त सापडला! वैभव खेडेकरांचा भाजपा प्रवेश झाला, मनसेला फटका, राजकीय समीकरणे बदलणार
15
स्वेटर, कानटोपी, हातमोजे अन् ब्लँकेट...! तयार रहा, ८६ टक्के हिमालयाला बर्फाने आच्छादले
16
Ratnagiri: खेडमध्ये वारकरी गुरुकुलमध्येच मुलींसोबत नको ते 'कृत्य'; कोकरे महाराज आणि कदमवर गुन्हा
17
भूतबाधा उतरवण्याच्या नावाखाली भोंदूबाबाचा महिलेवर बलात्कार; व्हिडिओ रेकॉर्ड करून ब्लॅकमेल!
18
टाटाची दिवाळीपूर्वीच शॉपिंग! जगात दबदबा वाढविण्यासाठी चिनी कंपनीच घेतली विकत
19
असाही असतो बॉस! कामाचा ताण नाही, फक्त मनसोक्त आराम; म्हणाले दिवाळीत २ किलो वजन वाढवून या
20
प्रेमानंद महाराजांना नेमका कोणता आजार झालाय? यात मृत्यूचा धोका आहे का? जाणून घ्या...

VIDEO: देश के गद्दारो को, गोली मारो ***को; भाजपच्या रोड शोमध्ये वादग्रस्त घोषणा

By कुणाल गवाणकर | Updated: January 20, 2021 18:28 IST

भाजप नेते शुभेंदु अधिकारी यांच्या रॅलीमध्ये घोषणाबाजी

हुगळी: पश्चिम बंगालमधील विधानसभा निवडणुकीला अवघ्या काही महिन्यांचा कालावधी शिल्लक राहिला आहे. त्यामुळे बंगालमध्ये राजकीय वातावरण तापलं आहे. भारतीय जनता पक्ष आणि तृणमूल काँग्रेस यांच्यात थेट लढत होत आहे. तृणमूलच्या अध्यक्षा आणि मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्यासमोर सत्ता कायम राखण्याचं आव्हान आहे. तर ममता यांच्या गडाला सुरुंग लावण्यासाठी भाजपनं कंबर कसली आहे. भाजप अध्यक्ष जे. पी. नड्डा आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहांनी गेल्या काही दिवसांत बंगालचे दौरे केले आहेत.राजकीय वातावरण तापलं असताना आता पक्षांकडून वापरल्या जाणाऱ्या भाषेचा दर्जा घसरू लागला आहे. काल तृणमूलच्या रॅलीमध्ये कार्यकर्त्यांनी वादग्रस्त घोषणा दिल्यानंतर आज भाजप कार्यकर्त्यांनी रॅलीमध्ये वादग्रस्त घोषणाबाजी केली. तृणमूलमधून भाजपमध्ये गेलेल्या शुभेंदू अधिकारी यांच्या रॅलीमध्ये या घोषणा देण्यात आल्या. 'देश के गद्दारों को गोली मारो ***को' अशा घोषणा भाजप कार्यकर्त्यांनी दिल्या. हुगळीतल्या चंदननगरमध्ये शुभेंदु अधिकारी यांचा रोड शो होता.काहीच दिवसांपूर्वी ममता बॅनर्जींनी आपण नंदिग्राम विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढवणार असल्याची घोषणा केली. नंदिग्राममध्ये भाजपनं तृणमूलला खिंडार पाडलं आहे. त्याच मतदारसंघातून निवडणूक लढणार असल्याची घोषणा ममता यांनी केली आहे. त्या पार्श्वभूमीवर बोलताना शुभेंदु अधिकारी यांनी नंदिग्राममध्ये भाजपचा विजय निश्चित असल्याचा विश्वास व्यक्त केला. 'भाजपच्या तिकिटावर नंदिग्राममधून लढणाऱ्या उमेदवाराच्या विजयाची जबाबदारी मी घेतो. ममता दीदींनी ६२ हजार मतांवर विश्वास दाखवत निवडणूक लढवण्याची घोषणा केली आहे. पण माझ्याकडे जय श्रीरामची घोषणा करणारे २.१३ लाख लोक आहेत,' असं म्हणत अधिकारी यांनी निवडणुकीचं रणशिंग फुंकलं.

टॅग्स :BJPभाजपाAll India Trinamool Congressआॅल इंडिया तृणमूल काँग्रेसMamata Banerjeeममता बॅनर्जी