शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

ममता बॅनर्जी मुख्यमंत्री पदावर राहणार की जाणार? पश्चिम बंगालमध्ये आज दिदींचं भाग्य ठरणार

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 3, 2021 08:28 IST

टीएमसीच्या सर्वेसर्वा ममता बॅनर्जी भवानीपूर मतदारसंघात भाजपच्या प्रियंका तिब्रेवाल आणि सीपीएमच्या श्रीजीव बिस्वास यांचा सामना करत आहेत.

कोलकाता - पश्चिम बंगालमधील भवानीपूर, समशेरगंज आणि जंगीपूर विधानसभा जागांसाठी झालेल्या पोटनिवडणुकीचा निकाल आज जाहीर होणार आहे. मतमोजणीला सुरुवात झाली आहे. यांपैकी, भवानीपूर विधानसभा मतदारसंघात गुरुवारी झालेल्या पोटनिवडणुकीसाठी 57 टक्के मतदान झाले होते. या ठिकाणी पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जीनिवडणूक रिंगणात आहेत. त्यांना भाजपच्या प्रियांका टिब्रेवाल टक्कर देत आहेत. ममता यांना मुख्यमंत्री पदावर टिकून राहण्यासाठी ही निवडणूक जिंकणे अत्यंत आवश्यक आहे. (West Bengal Bhabanipur Assembly bypoll who winning tmc mamata banerjee bjp priyanka tibrewal)

टीएमसीच्या सर्वेसर्वा ममता बॅनर्जी भवानीपूर मतदारसंघात भाजपच्या प्रियंका तिब्रेवाल आणि सीपीएमच्या श्रीजीव बिस्वास यांचा सामना करत आहेत. या वर्षाच्या सुरुवातीला झालेल्या विधानसभा निवडणुकीत नंदीग्राम मतदारसंघातून पराभूत झालेल्या ममता यांना मुख्यमंत्रीपदावर टिकून राहण्यासाठी ही पोटनिवडणूक जिंकावी लागणार आहे. भवानीपूर हा ममता बॅनर्जी यांचा गड मानला जातो, त्या येथून दोन वेळा आमदार म्हणून निवडून आल्या आहेत.

प्रियंका टिब्रेवाल यांचं कोलकाता उच्च न्यायालयाला पत्र -भवानीपूर विधानसभा मतदारसंघातील भाजपच्या उमेदवार प्रियंका टिब्रेवाल यांनी कोलकाता उच्च न्यायालयाच्या कार्यवाहक मुख्य न्यायाधीशांना पत्र लिहिले आहे. यात, "भवानीपूर विधानसभा मतदारसंघातील पोटनिवडणुकीच्या निकालानंतर कोणत्याही प्रकारचा हिंसाचार होऊ नये, यासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्याची विनंती करण्यात आली आहे". 

टॅग्स :west bengalपश्चिम बंगालMamata Banerjeeममता बॅनर्जीElectionनिवडणूकPoliticsराजकारण