शहरं
Join us  
Trending Stories
1
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
2
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
3
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
4
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
5
धक्कादायक वास्तव! हा बघा मुंबई विद्यापीठाच्या क्रीडा संकुलातील ‘जलतरण तलाव’
6
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
7
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाज यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
8
आठ वर्षांच्या चिमुरडीचा डम्परखाली चिरडून मृत्यू; संतप्त नागरिकांचा रास्ता रोको, चालकाला अटक
9
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
10
पहिल्या पॉड टॅक्सीचे भूमिपूजन; मात्र कुर्ला ते वांद्रे रेल्वे स्थानक प्रवासासाठी २०३१ची प्रतीक्षा
11
‘टनेल बोरिंग’ मशिनवर 'ठाणेकर' उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठेवणार नजर- मुख्यमंत्री फडणवीस
12
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
13
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
14
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
15
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
16
२०१४ मधील पोलिस कोठडी मृत्यू प्रकरणी सात पोलिसांविरुद्ध खुनाचा आरोप कायम
17
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
18
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
19
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
20
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
Daily Top 2Weekly Top 5

काढायला गेला 100 रुपये, खात्यात आढळले 2700 कोटी; वीटभट्टी कामगार काही तासांसाठी झाला कोट्यधीश 

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 4, 2022 06:54 IST

एकाच वेळी खात्यात जमा झालेली एवढी रक्कम पाहून त्याच्याही आनंदाला पारावार उरला नाही. मजुराचा विश्वासच बसेना.

लोकमत न्यूज नेटवर्ककन्नौज : उत्तर प्रदेशात एक वीटभट्टी कामगार अचानक कोट्यधीश झाला. त्याच्या खात्यात एकूण २७०० कोटी रुपये जमा झाले. विशेष म्हणजे हा मजूर दिवसाला ६०० ते ८०० रुपये कमावतो. एकाच वेळी खात्यात जमा झालेली एवढी रक्कम पाहून त्याच्याही आनंदाला पारावार उरला नाही. मजुराचा विश्वासच बसेना. अनेकदा त्याने खाते तपासून खात्री केली. मात्र, मजुराचा हा आनंद फार काळ टिकू शकला नाही. तो बँकेत पोहोचेपर्यंत खात्यात १२६ रुपये शिल्लक होते.

तीन वेळेस तपासले खातेसोमवारी त्यांनी गावातील जन सेवा केंद्रातून आपल्या जनधन खात्यामधील १०० रुपये काढले. काही वेळाने त्यांच्या फोनवर मेसेज आला. ज्यामध्ये २७०० कोटी रुपये खात्यातील शिल्लक रक्कम असल्याचे लिहिले होते.

 बिहारी लाल यांनी ताबडतोब जवळच्या बँक मित्राकडे जाऊन खाते तपासले. बँक मित्रानेही, खात्यात प्रत्यक्षात २७०० कोटी रुपये जमा आहेत, असे सांगितले. तरी त्यांना विश्वास बसत नव्हता.

बिहारीलाल म्हणाले, ‘मी खाते पुन्हा तपासण्यास सांगितले. त्यानंतर त्यांनी तीन वेळेस तपासणी केली. माझा विश्वास बसेना, तेव्हा त्यांनी बँकेचे स्टेटमेंट काढून मला दिले. त्यावर माझ्या खात्यात २७,०७,८५,१३,९८५ कोटी रुपये असल्याचे नमूद होते.

४५ वर्षांचा बिहारी लाल या रोजंदारीवर काम करणाऱ्या मजुरासोबत ही घटना घडली. ते राजस्थानमध्ये एका भट्टीवर काम करतात. पावसाळ्यामुळे वीटभट्टीचे काम बंद असल्यामुळे सध्या ते उत्तर प्रदेशातील कन्नौज जिल्ह्यात आपल्या घरी आहेत. त्यांचे बँक ऑफ इंडियामध्ये जनधन खाते आहे.

काही तासच टिकला आनंद तथापि, त्यांचा आनंद काही तासच टिकला, कारण आपले खाते तपासण्यासाठी बँकेच्या शाखेत पोहोचल्यावर शिल्लक रक्कम फक्त १२६ रुपये आहे, असे त्यांना सांगण्यात आले. 

बँकेने काय म्हटलं? त्यानंतर बँकेचे प्रमुख जिल्हा व्यवस्थापक अभिषेक सिन्हा यांनी पत्रकारांना सांगितले की, खाते तपासले असता त्यात केवळ १२६ रुपये होते. ते म्हणाले, ही स्पष्टपणे बँकिंग त्रुटी असू शकते. बिहारीलाल यांचे खाते काही काळासाठी गोठवण्यात आले असून, ही बाब बँकेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या निदर्शनास आणून दिली आहे.

टॅग्स :atmएटीएमbankबँक