शहरं
Join us  
Trending Stories
1
शरद पवारांच्या बारामतीतील प्रचाराच्या सांगता सभेत अचानक अजितदादांची एंट्री; नेमकं काय घडलं?
2
भाजपा, महायुतीच्या उमेदवारांची उमेदवारी रद्द करा, कारण...; काँग्रेसची निवडणूक अधिकाऱ्यांकडे तक्रार
3
श्रीराम मंदिरात गेल्यामुळे पक्षातून तीव्र विरोध; काँग्रेस नेत्या राधिका खेरा यांचा राजीनामा...
4
देशपांडे लैय भारी! तुषारने पहिल्याच षटकात PBKS च्या स्टार फलंदाजांचे उडवले त्रिफळे, Video 
5
पक्षफुटीनंतर शरद पवारांचे 'ते' शब्द आठवून रोहित पवार गहिवरले; ढसाढसा रडताना पाहून सारेच स्तब्ध
6
“राज ठाकरे ज्यांच्या प्रचारासाठी जातात तो उमेदवार पडतोच”; ठाकरे गटाचा खोचक टोला
7
अगं बाई तुला आम्हीच निवडून आणत होतो; प्रचाराच्या शेवटच्या दिवशी अजितदादांचा सुप्रिया सुळेंवर निशाणा
8
MS Dhoni पहिल्याच चेंडूवर बोल्ड! पंजाब किंग्सच्या गोलंदाजांसमोर CSK ची शरणागती, डाव संपला
9
'सोढी' १० दिवसांपासून बेपत्ता, आदल्या दिवशी नेमकं काय घडलं होतं? वडिलांनी केला खुलासा
10
निवडणुकीच्या तोंडावर मुद्दाम बदनामीचा प्रयत्न, 'त्या' प्रकरणाशी माझा संबंध नाही- सुनिल तटकरे
11
MS Dhoni चा त्रिफळा उडवताच हर्षल पटेलनं केलं असं काही; निराश फॅन्सची जिंकली मनं
12
'...तर मी मोदींचा जाहीर प्रचार करेन'; उद्धव ठाकरेंचं भरसभेत आश्वासन
13
सई ताम्हणकर अन् जितेंद्र जोशी झळकणार एकाच हिंदी सिनेमात, फरहान अख्तरने केली घोषणा
14
जम्मू-काश्मीर: दहशतवादी हल्ल्यात एकुलता एक मुलगा शहीद; चिमुकला पोरका झाला
15
इंग्लंडच्या सर्वात वजनदार व्यक्तीचा मृत्यू, पुढच्या आठवड्यात होता वाढदिवस, वजन होते...
16
६ धावांत ३ बाद! CSK ने गमावल्या धडाधड विकेट्स, राहुल चहरने टिपले सलग बळी, Video 
17
'ही' आहेत जगातील सर्वात उष्ण ठिकाणं, तापमान वाचून बसेल धक्का!
18
‘भाजपाला विरोध करण्यासाठी दहशतवादी कसाबची बाजू घेता? थोडी तरी लाज बाळगा’, बावनकुळेंची वडेट्टीवारांवर टीका
19
CSK च्या प्ले ऑफच्या मार्गात अडथळे; २ मेन गोलंदाज मायदेशात परतले, दीपक चहरवरही प्रश्नचिन्ह
20
T20 वर्ल्ड कपमध्ये विराटला OUT करणं हेच ध्येय; पाकिस्तानी गोलंदाजानं बाळगलं 'स्वप्न'

वेल डन! निर्मला निर्मला सीतारमनजी,अरुण जेटलींकडून कौतुक   

By ऑनलाइन लोकमत | Published: January 04, 2019 8:10 PM

काँग्रेसने राफेल करारावरून केलेले आरोप लोकसभेमध्ये परतवून लावणाऱ्या संरक्षणमंत्री निर्मला सीतारमन यांचे वित्तमंत्री अरुण जेटली यांनी कौतुक केले आहे

ठळक मुद्देकाँग्रेसने राफेल करारावरून केलेले आरोप लोकसभेमध्ये परतवून लावणाऱ्या संरक्षणमंत्री निर्मला सीतारमन यांचे वित्तमंत्री अरुण जेटली यांनी कौतुक केले आहेवेल डन! निर्मला सीतारमनजी, तुम्ही सरकारविरोधातील खोटा प्रचार संसदेत हाणून पाडलात. आम्हाला तुमचा अभिमान आहे.", असे जेटलींनी ट्विटमध्ये म्हटले

नवी दिल्ली - राफेल विमान करारावरून सध्या संसदेमध्ये सत्ताधारी भाजपा आणि मुख्य विरोधी पक्ष असलेल्या काँग्रेसमध्ये रणकंदन माजले आहे. दरम्यान, काँग्रेसने राफेल करारावरून केलेले आरोप लोकसभेमध्ये परतवून लावणाऱ्या संरक्षणमंत्री निर्मला सीतारमन यांचे वित्तमंत्री अरुण जेटली यांनी कौतुक केले आहे. निर्मला सीतारमन यांचे  लोकसभेतील भाषण ऐकल्यानंतर अरुण जेटली यांनी ट्विटरवरून त्यांची प्रशंसा केली. वेल डन! निर्मला सीतारमनजी, तुम्ही सरकारविरोधातील खोटा प्रचार संसदेत हाणून पाडलात. आम्हाला तुमचा अभिमान आहे.", असे जेटलींनी ट्विटमध्ये म्हटले आहे.  

दरम्यान, लोकसभेत राफेल संबंधीच्या प्रश्नाला उत्तर देताना निर्मला सीतारमन यांनी काँग्रेसवर जोरदार हल्ला चढवला. काँग्रेस सरकारला संरक्षण विभागाच्या गरजा कधीही समजल्या नाहीत. यासाठी त्यांनी आपल्या शेजारी देशांकडून धडा घ्यावा, असा सल्ला संरक्षणमंत्री निर्मला सीतारामन यांनी राफेल डीलवर भाष्य करताना दिला. आम्ही संरक्षणासाठी डील करतो. ते संरक्षणाचं डील करतात, अशी खरमरीत टीका सीतारामन यांनी काँग्रेसवर केली. राफेल डीलसाठी 8 वर्षे का लागली आणि यानंतरही एकही राफेल विमान भारतात का आणता आलं नाही?, असे प्रश्न संरक्षणमंत्र्यांनी काँग्रेसला विचारले. संसदेत गेल्या काही दिवसांपासून संसदेत राफेल डीलचा मुद्दा गाजतो आहे. काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधींनी हा मुद्दा सतत लावून धरला आहे. परवा राहुल गांधींनी राफेल डीलवरुन थेट पंतप्रधान मोदींना लक्ष्य केलं. राफेल डीलबद्दल मोदींनी 20 मिनिटं चर्चा करावी, असं आव्हान राहुल यांनी दिलं होतं. राहुल गांधी आणि काँग्रेसच्या आरोपांना आज संरक्षणमंत्री निर्मला सीतारामन यांनी उत्तर दिलं. मी आणि सरकार राफेल डीलसंबंधीच्या प्रत्येक प्रश्नाचं उत्तर द्यायला तयार आहे. मात्र आमच्या उत्तरांची काँग्रेसला भीती वाटते, असा टोला त्यांनी लगावला. 

टॅग्स :Rafale Dealराफेल डीलNirmala Sitaramanनिर्मला सीतारामनArun Jaitleyअरूण जेटली