नवी दिल्ली - राफेल विमान करारावरून सध्या संसदेमध्ये सत्ताधारी भाजपा आणि मुख्य विरोधी पक्ष असलेल्या काँग्रेसमध्ये रणकंदन माजले आहे. दरम्यान, काँग्रेसने राफेल करारावरून केलेले आरोप लोकसभेमध्ये परतवून लावणाऱ्या संरक्षणमंत्री निर्मला सीतारमन यांचे वित्तमंत्री अरुण जेटली यांनी कौतुक केले आहे. निर्मला सीतारमन यांचे लोकसभेतील भाषण ऐकल्यानंतर अरुण जेटली यांनी ट्विटरवरून त्यांची प्रशंसा केली. वेल डन! निर्मला सीतारमनजी, तुम्ही सरकारविरोधातील खोटा प्रचार संसदेत हाणून पाडलात. आम्हाला तुमचा अभिमान आहे.", असे जेटलींनी ट्विटमध्ये म्हटले आहे.
वेल डन! निर्मला निर्मला सीतारमनजी,अरुण जेटलींकडून कौतुक
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 4, 2019 20:25 IST
काँग्रेसने राफेल करारावरून केलेले आरोप लोकसभेमध्ये परतवून लावणाऱ्या संरक्षणमंत्री निर्मला सीतारमन यांचे वित्तमंत्री अरुण जेटली यांनी कौतुक केले आहे
वेल डन! निर्मला निर्मला सीतारमनजी,अरुण जेटलींकडून कौतुक
ठळक मुद्देकाँग्रेसने राफेल करारावरून केलेले आरोप लोकसभेमध्ये परतवून लावणाऱ्या संरक्षणमंत्री निर्मला सीतारमन यांचे वित्तमंत्री अरुण जेटली यांनी कौतुक केले आहेवेल डन! निर्मला सीतारमनजी, तुम्ही सरकारविरोधातील खोटा प्रचार संसदेत हाणून पाडलात. आम्हाला तुमचा अभिमान आहे.", असे जेटलींनी ट्विटमध्ये म्हटले