कोलवडी येथे शंभुराजांच्या पालखीचे स्वागत
By admin | Updated: March 19, 2015 22:36 IST
लोणी कंद : हर हर महादेव, छत्रपती संभाजीमहाराज की जय, जय भवानी, जय शिवाजी, असा जयघोष, सडा रांगोळ्याच्या पायघड्या आणि कोलवडी गावच्या भजनी मंडळाचे साथसंगत अशा उत्साही वातावरणात छत्रपती संभाजीमहाराज पालखी सोहळ्याने आज सायंकाळी मुळा-मुळा नदी पार करून कोलवडीत दाखल झाली.
कोलवडी येथे शंभुराजांच्या पालखीचे स्वागत
लोणी कंद : हर हर महादेव, छत्रपती संभाजीमहाराज की जय, जय भवानी, जय शिवाजी, असा जयघोष, सडा रांगोळ्याच्या पायघड्या आणि कोलवडी गावच्या भजनी मंडळाचे साथसंगत अशा उत्साही वातावरणात छत्रपती संभाजीमहाराज पालखी सोहळ्याने आज सायंकाळी मुळा-मुळा नदी पार करून कोलवडीत दाखल झाली. धर्मवीर छत्रपती संभाजीमहाराज पालखी समितीचे अध्यक्ष पै. संदीपअप्पा भोंडवे यांच्या मार्गदर्शनाखाली हा तीन दिवसीय पालखी सोहळा आयोजित करण्यात आला आहे. बुधवारी (दि.१८) पुरंदर किल्ल्यावरून मजल दर मजल करीत आज पुण्यतिथीच्या पूर्वसंध्येला हवेली तालुक्यातील पूर्व भागात आली. कोलवडी भजनी मंडळाने थेऊरकडे सामोरे जात भक्तिभावाने स्वागत केले. शहनशाह वल्ली महाराज यांच्या मंदिरासमोरील मैदानात पालखी विसाव्यासाठी थांबली. या वेळी सरपंच बबनराव गायकवाड, उपसरपंच शशिकांत मदने, शंभुभक्त सुभाष गायकवाड, शिवव्याख्याने मच्छिंद्र गायकवाड आदींसह ग्रामस्थांनी स्वागत केले. छत्रपती संभाजीराजाचा शौर्य नेत्रदीपक इतिहास व राजांचा पालखी सोहळा पाहून अबालवृद्धांनी दर्शनाचा लाभ घेतला. शिवव्याख्याते गणेशजी फडताळे यांनी शंभुचरित्र सांगितले. तुळापूरचे माजी सरपंच ज्ञानेश्वर शिवले, राजेंद्र सातव (वाघोली) पांडुरंग आरगडे (वढू खुर्द) जनार्दन लांडगे (लोणी), उत्तमराव गायकवाड (सरपंच वडकी), रवींद्र कंद (लोणीकंद), तान्हाजी चौधरी, सचिन पलांडे (मुखई), आत्माराम वाळके पाटील (पेरणे), विपुल शितोळे सरदार (न्हावी सांगवी), विजय ढमढेरे (तळेगाव ढमढेरे) आदींसह शंभू भक्त सहभागी झाले होते. फोटो : छत्रपती संभाजीमहाराज पालखी थेऊरकडे मार्गस्थ होताना.