शहरं
Join us  
Trending Stories
1
शिवसेना-मनसेची ताकद मुंबईत जास्त; राज ठाकरेंच्या दाव्यावर CM फडणवीसांनी आकेडवारीच दिली
2
पहिल्यांदाच सुप्रीम कोर्टासमोर EVM मधील मतमोजणी झाली; पराभूत उमेदवार बनला 'विजयी', गावकरी अवाक्
3
ट्रम्प यांच्या नाकावर टिच्चून आली...! अ‍ॅप्पल, टेस्लानंतर या कंपनीची भारतात एन्ट्री, बिग टेकने घोषणा केली...
4
किश्तवाड येथे धरालीसारखी दुर्घटना, ढगफुटी होऊन आला पूर, १० जणांचा मृत्यू
5
राहुल गांधींवर खोटी साक्ष दिल्याचा आरोप, सावरकरांच्या पणतूने  कोर्टात दिलेल्या अर्जाने अडचणी वाढणार? 
6
गोकुळाष्टमीच्या मराठी शुभेच्छा: Messages, WhatsApp Status ला शेअर करा;कृष्ण भक्तांना द्या हार्दिक शुभेच्छा!
7
सचिन तेंडुलकरहून ५ वर्षांनी मोठी अंजली; आता अर्जुनची होणारी पत्नीही मोठीच...किती आहे अंतर?
8
बाजारात संमिश्र कल! विप्रो-इन्फोसिस वधारले; पण, टाटासह 'या' स्टॉक्समध्ये मोठी घसरण
9
मतदार यादीतून काढलेल्या ६५ लाख लोकांची नावे सार्वजनिक करा; SC चे निवडणूक आयोगाला निर्देश
10
Rapido देणार Zomato, Swiggy ला टक्कर, पोहोचवणार जेवण; काय आहे कंपनीचा प्लान?
11
'अमेरिकाच नाही, संपूर्ण जग तुमचे ऐकेल', गडकरींनी भारत विश्वगुरु बनण्याचा मास्टर प्लान सांगितला
12
रणबीर कपूरच्या 'रामायण'मुळे कंपनीची चांदी! शेअरमध्ये १०% वाढ, ३ महिन्यात ६२ टक्के परतावा
13
ट्रम्प यांनी डेड इकॉनॉमी म्हटलेलं, आता अमेरिकेच्याच एजन्सीनं भारताचं रेटिंग केलं अपग्रेड
14
किश्तवाड ढगफुटी: फारुख अब्दुल्ला म्हणाले, "संपूर्ण देशाने देवाकडे प्रार्थना करावी, बचाव कार्यही कठीण!"
15
'लव्ह अँड वॉर', 'अल्फा'च नाही तर आलिया भट आणखी एका सिनेमाच्या तयारित, वाचा सविस्तर
16
गोकुळाष्टमी स्पेशल: गोकुळाष्टमीला करा सात्त्विक चवीचा पंचामृत केक; घरचे बालगोपाळ होतील खुश
17
नाशिकच्या दिंडोरी येथे जोरदार हादरा, २५ किमी परिसरात मोठा आवाज; नागरिक घाबरले, नेमकं काय घडले?
18
"मूल जन्माला घाला आणि ६ लाख रुपये मिळवा"; चीनला टक्कर देत 'या' देशाने केली मोठी घोषणा!
19
इथेनॉलनंतर आता डिझेलमध्ये बायोफ्युएल मिसळणार; गडकरींनी वादाच्या पार्श्वभूमीवर केली घोषणा
20
२ मुलांना घेऊन आईनं मारली नदीत उडी; पतीच्या निधनानंतर दीराशी केले होते लग्न, मात्र...

वजनदार झेप!

By admin | Updated: June 6, 2017 06:23 IST

आपल्या सामर्थ्याचे दर्शन घडवीत भारताने सोमवारी आतापर्यंतच्या सर्वांत मोठ्या उपग्रहाचे यशस्वी प्रक्षेपण करून इतिहासाचे नवे पान लिहिले.

श्रीहरीकोटा (आंध्र प्रदेश) : एकेकाळी भारताला अंतराळ तंत्रज्ञान देण्यास नकार देणाऱ्या देशांना आपल्या सामर्थ्याचे दर्शन घडवीत भारताने सोमवारी आतापर्यंतच्या सर्वांत मोठ्या उपग्रहाचे यशस्वी प्रक्षेपण करून इतिहासाचे नवे पान लिहिले. भारतीय अवकाश संशोधन संस्थेने (इस्रो) श्रीहरीकोटातील सतीश धवन स्पेस सेंटर येथून स्वदेशी बनावटीच्या 3136 किलो वजनाच्या ‘जी सॅट -१९’ उपग्रहाचे ‘जीएसएलव्ही मार्क ३’ या रॉकेटच्या साहाय्याने श्रीहरीकोटातून यशस्वी प्रक्षेपण केले. 200 हत्तींएवढे वजन  या उपग्रहाचे वजन पाच लोडेड बोइंग जम्बो जेटएवढे किंवा पूर्ण वाढ झालेल्या २०० हत्तींइतके आहे.शास्त्रज्ञांनी या ‘जीएसएलव्ही मार्क३’ला बाहुबली म्हटले आहे. या यशाचे महत्त्व का?भारताला २३०० किलोपेक्षा जास्त वजनाचे उपग्रह अवकाशात सोडण्यासाठी यापूर्वी दुसऱ्या देशांवर अवलंबून राहावे लागत होते. आता भारताला ४००० किलोंचे उपग्रहही अवकाशात सोडता येणार आहेत. त्यामुळे या क्षेत्रात देशाला स्वयंपूर्णता मिळणार आहे. जीसॅट १९ उपग्रहामुळे संपर्क तंत्रज्ञान क्षेत्रात क्रांती होणार आहे. तसेच भारतातील इंटनेटचा वेग वाढण्यास मदत होणार आहे. आजचा दिवस ऐतिहासिक आहे. हा पहिलाच प्रयत्न होता आणि तो यशस्वी झाला आहे. या प्रक्षेपणासाठी पूर्ण टीमने अविरतपणे काम केले त्याबद्दल मी टीमचे अभिनंदन करतो. - ए. एस. किरण कुमार, इस्रोचे अध्यक्ष इस्रोच्या या यशाबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी, राष्ट्रपती प्रणव मुखर्जी, काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांनी टीममधील सर्व सदस्यांचे अभिनंदन केले आहे.