शहरं
Join us  
Trending Stories
1
विदर्भात भाजपची हुरडा पार्टी; मुनगंटीवार यांनी शाब्दिक हल्ला चढवल्याने सुरू झाला नवा वाद
2
एपस्टीन फाइल्सवरून जनतेचा रोष वाढला, ट्रम्प प्रशासनाने कोणते फोटो प्रसिद्ध केले आणि कोणते लपवून ठेवले?
3
मुंबईचा ‘ब्रेन’, पुण्याचे ‘मार्केट’ अन् सातारा-सांगलीतले ‘अड्डे’
4
Today's Horoscope: आजचे राशीभविष्य, २३ डिसेंबर २०२५: विवाहेच्छुकांचे विवाह ठरतील, मितभाषी राहून मतभेद दूर करू शकाल
5
बांगलादेशात आणखी एका नेत्याची निर्घृण हत्या; आसाममध्ये हाय अलर्ट, सीमेवर अधिक दक्षता
6
संपादकीय: एप्स्टीन फाइल्स, भारत अन् न झालेला राजकीय भूकंप!
7
कोकाटे यांची आमदारकी तूर्त वाचली; सर्वोच्च न्यायालयाकडून २ वर्षांच्या शिक्षेला स्थगिती 
8
पार्थ पवार यांच्या अमेडिया कंपनीला आणखी एक झटका; मुद्रांक शुल्क सवलतीचे इरादा पत्र अखेर केले रद्द 
9
पालिकेसाठी ठाकरे बंधूंमधील युतीची आज घोषणा? काही जागांबद्दल एकमत होत नव्हते...
10
गांधी-नेहरूंच्या डोक्यावर खापर फोडून काय होणार?
11
आता मिशन महापालिका मैदान तयार : आजपासून अर्ज भरण्यास सुरुवात; इच्छुकांची मोर्चेबांधणी 
12
केंद्राच्या योजनांतून महाराष्ट्राला १.४७ लाख कोटी; उत्तर प्रदेश व दिल्लीपाठोपाठ राज्याचा तिसरा क्रमांक
13
वायुप्रदूषण नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कारवाई का नाही? पालिका आयुक्त, एमपीसीबी अधिकाऱ्यांना हायकोर्टात हजर हाेण्याचे निर्देश
14
‘त्या’ आयपीएस अधिकाऱ्यांच्या बदल्या लगेच करण्याचे आदेश; राज्य निवडणूक आयोग दोन दिवसांत घेणार आढावा
15
विश्वचषक गमावल्यानंतर निवृत्तीचा विचार होता : रोहित; असे वाटले की, या खेळाने माझ्याकडून सर्वकाही हिरावून घेतले आहे
16
 आणखी किती हिंमत हवी...! पुतीनसमोर पत्रकारानं मैत्रिणीला केलं प्रपोज अन्..
17
कांजूर डम्पिंगच्या दुर्गंधीवर तोडगा काढा; मुंबई उच्च न्यायालयाचे निर्देश; स्वच्छ हवेत श्वास घेणे काळाची गरज : महत्त्वपूर्ण निरीक्षण
18
बापरे, पश्चिम रेल्वेवर एकदाचाच ३० दिवसांचा मेगाब्लॉक! १०० लोकल रद्द झाल्याने हाल 
19
आता लोकलच्या दारात लटकता येणार नाही; प्रयोग सुरु, कारण...
20
हाण की बडीव! रुग्णालयात डॉक्टर-रुग्ण भिडले, एकमेकांच्या जीवावर उठले; लाथाबुक्क्यांनी मारहाण
Daily Top 2Weekly Top 5

आम्ही काम करतो, रील बनवत नाही, काँग्रेसची ‘झूठ की दुकान’; अश्विनी वैष्णव यांचा हल्लाबोल

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 2, 2024 05:35 IST

वैष्णव यांनी आपले वेगळे रूप दाखवत २००४ ते २०१४ या दहा वर्षांच्या काळातील यूपीए सरकारला रेल्वेशी संबंधित सर्व १० महत्त्वाच्या पैलूंवर पूर्णपणे अपयशी ठरवले.

हरीश गुप्ता, लोकमत न्यूज नेटवर्क, नवी दिल्ली : लोकसभेत गुरुवारी रेल्वे मंत्रालयाशी संबंधित अनुदानाच्या मागण्यांवरील चर्चेला उत्तर देताना वेगळ्या अश्विनी वैष्णवांचा उदय झाल्याचे पाहायला मिळाले. वैष्णव हे मोदी सरकारमध्ये रेल्वे, आयटी आणि माहिती आणि प्रसारण या तीन प्रमुख खात्यांची जबाबदारी सांभाळणारे सौम्य, मृदुभाषी आणि शिष्टाचार पाळणारे मंत्री मानले जातात. परंतु, सर्व प्रकारच्या चिथावणीखोर प्रश्नांना उत्तरे देताना त्यांनी गुरुवारी संसदेत आवाज वाढवत आधीच्या ‘यूपीए’ सरकारची पोलखोल केली. आम्ही काम करतो, रील बनवत नाही, असेही त्यांनी यावेळी सुनावले.

वैष्णव यांनी गुरुवारी आपले वेगळे रूप दाखवत २००४ ते २०१४ या दहा वर्षांच्या काळातील यूपीए सरकारला रेल्वेशी संबंधित सर्व १० महत्त्वाच्या पैलूंवर पूर्णपणे अपयशी ठरवले. यूपीएच्या काळातील १० वर्षांची मोदी सरकारच्या १० वर्षांशी तुलना करताना वैष्णव आपल्या नेहमीच्या मवाळ शब्दात चर्चेला उत्तर देत होते. प्रत्येक सरकार आपले काम करीत असल्याने आपण वादाचे राजकारण आणत नसल्याचे त्यांनी सदस्यांना सांगितले. पण, फरक एवढाच आहे की मोदी सरकारच्या काळात योजना ‘मिशन मोड’मध्ये आणि कालबद्ध पद्धतीने राबविल्या जातात.

रेल्वेसाठी विक्रमी तरतूद

तपशील देत वैष्णव यांनी दावा केला की गेल्या काही वर्षांत रेल्वेसाठी विक्रमी तरतूद करण्यात आली. यावर त्यांनी वारंवार बाके वाजवून आणि सदस्यांना तसे करण्यास सांगून विरोधकांवर चांगलीच कुरघोडी केली. काँग्रेसची ‘झूठ की दुकान’ (खोट्याचे दुकान) यापुढे चालणार नाही, असे ते ठामपणे म्हणाले.

मोदी सरकारने रेल्वेसाठी हे केले...

यूपीए सरकार रेल्वेमध्ये भरती, आधुनिकीकरण, नवीन तंत्रज्ञान यामध्ये कसे अपयशी ठरले याचे सविस्तर विवेचन त्यांनी केले. आता रेल्वे चालकांना एसी विश्रांती कक्षासह अनेक सुविधा देण्यात आल्या आहेत. यूपीएच्या काळात दरवर्षी सरासरी अपघातांची संख्या १७१ होती, ती आता ६८ टक्क्यांनी कमी झाली. यूपीएच्या काळात रेल्वेच्या फक्त ४.४१ लाख मागण्या पूर्ण केल्या गेल्या, तर मोदी सरकारच्या काळात ५.०२ लाख मागण्या पूर्ण झाल्या, असे ते म्हणाले. 

टॅग्स :Ashwini Vaishnawअश्विनी वैष्णवIndian Railwayभारतीय रेल्वेlok sabhaलोकसभाParliamentसंसद