शहरं
Join us  
Trending Stories
1
Pahalgam Terror Attack: लष्कराची मोठी कारवाई! आणखी दोन दहशतवाद्यांची घरे स्फोटके लावून पाडली
2
पाकिस्तानच्या नापाक कारवाया थांबत नाहीत, २४ तासांत दुसऱ्यांदा नियंत्रण रेषेवर गोळीबार, भारतीय सैन्याने दिले चोख प्रत्युत्तर
3
"हे काही टीव्ही शोज नाहीयेत...", अभिनेत्री शिवानी सुर्वेनं प्रसारमाध्यमांना फटकारलं
4
PPF ची 'ही' ट्रिक अनेकांना माहीत नाही, बनेल १ कोटींचा फंड, वर्षाला मिळू शकतं ७ लाखांपेक्षा अधिक व्याज
5
भारताची धास्ती घेत पाक लष्कराची सीमेवर मोठ्या प्रमाणात जमवाजमव; सैनिकांची संख्या वाढवली
6
मोठी बातमी: एल्फिन्स्टन ब्रिज सोमवारपर्यंत बंद होणार नाही; नागरिकांच्या आंदोलनाची थेट मुख्यमंत्र्यांनी घेतली दखल!
7
भारत-पाकमध्ये पाण्यावरून युद्ध होईल? तणाव वाढला; पाकिस्तानात हाहाकार, कारण...
8
भारताकडून पाकिस्तानला पाण्याचा थेंबही मिळणार नाही; केंद्र सरकारनं आखली रणनीती
9
अजित पवार यांचा अधिकाऱ्यांना सज्जड दम; सांगितलेली कामे केली नाहीत, तर पुढच्या बैठकीला..
10
आजचे राशीभविष्य, २६ एप्रिल २०२५: शक्यतो आज आर्थिक देवाण-घेवाण करू नका
11
अखेर पाक म्हणाला, होय, आम्ही दहशतवाद्यांना पोसले; संरक्षणमंत्री ख्वाजा आसिफ यांची कबुली
12
एकही पाकिस्तानी भारतात राहणार नाही याची खात्री करा; शाहांचा सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना फोन
13
पाकिस्तानी नागरिकांवर महाराष्ट्रात वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना आदेश
14
राहुल गांधी यांना सर्वोच्च न्यायालयाने फटकारले; "स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल..."
15
संसदेने मंजूर केलेला कायदा संवैधानिक, स्थगिती देऊ नका; केंद्र सरकारची मागणी
16
भारतात द्वेषाचा वणवा पेटवण्याचं एक षड्‌यंत्र; ‘बदला’ घेण्याची घाई नको, ‘धडा’ शिकवला पाहिजे
17
नरेंद्र मोदी यावेळी बालाकोटच्याही पुढे जाणार?; पुढच्या दोन आठवड्यांत आणखी कठोर पावले
18
हम सब एक है! अतिरेकी व त्यांच्या सूत्रधारांचा कायमस्वरूपी बंदोबस्त करण्याची मागणी
19
"आणखी किती वेळ सहन करणार..."; चिठ्ठी लिहून नवी मुंबईतील विकासकानं संपवलं आयुष्य
20
मेमध्ये जिल्हा समित्या, जूनमध्ये महामंडळे; भाजपाच्या वरिष्ठांचा कार्यकर्त्यांना शब्द

बंगालमध्ये टीएमसी करु शकते नरसंहार; मंत्री निर्मला सीतारामन यांनी व्यक्त केली चिंता

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 19, 2019 15:42 IST

पराभव समोर दिसत असल्याने टीएमसी कार्यकर्ते घाबरले आहेत. त्यामुळे त्यांच्याकडून हिंसेचा वापर केला जात आहे. तसेच टीएमसीच्या हिंसाचाराविरोधात भाजपा पुन्हा केंद्रीय निवडणूक आयोगाकडे तक्रार करणार आहे

नवी दिल्ली - लोकसभा निवडणुकीचा प्रचार संपून मतदानाच्या शेवटच्या टप्प्याला सुरुवात झाली आहे. मात्र देशभरात निवडणुकीत गाजलेल्या पश्चिम बंगालमधील निवडणुकीचं राजकारण आणखी तापू शकतं. कारण मतदानाच्या दिवशीही भाजपा आणि टीएमसीच्या कार्यकर्त्यांमध्ये वाद घडल्याचे प्रकार घडले आहेत. डायमंड हार्बर लोकसभा मतदारसंघाचे भाजपा उमेदवार निलंजन रॉय यांच्या गाडीवर टीएमसीच्या कार्यकर्त्यांनी हल्ला केला. तसेच मतदारांनाही मतदान करण्यापासून रोखल्याचा आरोप भाजपाने केला आहे. पश्चिम बंगालमध्ये आज 9 जागांसाठी मतदान होत आहे. मात्र 6 लोकसभा जागांवर हिंसक घटना घडल्याने निवडणुकीचं वातावरण चिंतेत टाकणारे आहे. 

केंद्रीय मंत्री निर्मला सीतारामन यांनी पश्चिम बंगालमधील मतदानावर भाष्य करताना तेथे घडत असलेल्या हिंसाचारावर चिंता व्यक्त केली आहे. यावेळी बोलताना निर्मला सीतारामन म्हणाल्या की, भाजपा उमेदवारांवर तसेच कार्यकर्त्यांवर राजरोसपणे टीएमसी कार्यकर्त्यांकडून हल्ले केले जात आहेत. पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री इंच-इंच बदला घेण्याची भाषा करतात, त्यामुळे बंगालमधील मतदान संपल्यानंतर टीएमसीद्वारे नरसंहार होण्याची भिती त्यांनी व्यक्त केली. तसेच निवडणुकीची आदर्श आचारसंहिता संपेपर्यंत केंद्रीय सुरक्षा दल पश्चिम बंगालमध्ये तैनात ठेवावे अशी मागणीही निर्मला सीतारामन यांनी केली आहे.   

पराभव समोर दिसत असल्याने टीएमसी कार्यकर्ते घाबरले आहेत. त्यामुळे त्यांच्याकडून हिंसेचा वापर केला जात आहे. तसेच टीएमसीच्या हिंसाचाराविरोधात भाजपा पुन्हा केंद्रीय निवडणूक आयोगाकडे तक्रार करणार आहे असंही निर्मला सीतारामन यांनी सांगितले. पश्चिम बंगालमध्ये सत्ताधारी तृणमूल काँग्रेस व भाजप यांच्यातील टोकाच्या दुश्मनीमुळे झालेल्या हिंसाचाराची गंभीर दखल घेत निवडणूक आयोगाने वातावरण आणखी चिघळू नये यासाठी तेथील लोकसभा निवडणुकीच्या सातव्या आणि शेवटच्या टप्प्याचा प्रचार ठरल्या वेळेच्या एक दिवस आधीच बंद करण्याचा आदेश बुधवारी दिला होता. आजवरच्या कोणत्याही निवडणुकीत आयोगाला असे टोकाचे पाऊल उचलावे लागण्याची ही पहिलीच वेळ आहे.

भाजपा अध्यक्ष अमित शहा यांच्या रॅलीवेळी भाजपा आणि तृणमूल काँग्रेसच्या कार्यकर्त्यांदरम्यान तुफान राडा झाला होता. यावेळी दोन्ही बाजुने दगडफेक करण्यात आली. अमित शहांचा ट्रक जात असताना त्यावर काठ्या भिरकावल्याने तणाव निर्माण झाला होता. पश्चिम बंगालमध्ये भाजपा आणि तृणमूल काँग्रेस यांच्यामध्ये जोरदार टक्कर सुरु आहे. 

 

टॅग्स :Lok Sabha Election 2019लोकसभा निवडणूक २०१९Nirmala Sitaramanनिर्मला सीतारामनtmcठाणे महापालिकाWest Bengal Lok Sabha Election 2019पश्चिम बंगाल लोकसभा निवडणूक 2019